६.वस्तू स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Vastu Swadhyay Iyatta Dahavi

Vastu swadhyay pdf Swadhyay class 10 marathi chapter 6 दहावी मराठी वस्तू स्वाध्याय वस्तू स्वाध्याय १०वी वस्तू या धड्याचे प्रश्न उत्तर मराठी
Admin

Iyatta Dahavi Vastu Marathi  Swadhyay | वस्तू स्वाध्याय इयत्ता दहावी

 

प्रश्न (१) आकृत्या पूर्ण करा.


वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये

उत्तर:

 १) वस्तू सेवक असतात.

२)   वस्तूंना स्वच्छता आवडते.

३)   माणसासारखे लाडावणे.


वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्ट

उत्तर:

१)    जीव

२)   मन


Vastu  swadhyay pdf Swadhyay class 10 marathi chapter 6 दहावी मराठी वस्तू स्वाध्याय वस्तू स्वाध्याय १०वी  वस्तू या धड्याचे प्रश्न उत्तर मराठी


कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप

उत्तर:

१)    वस्तू सुखावतात .

२)   वस्तू लाड करून घेतात.

 

इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय 6


प्रश्न (२) कारणे लिहा.


(अ) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण............

उत्तर: वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत.

 


(आ) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण............

उत्तर: वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण त्यांचे आयुष्य संपते.

 

प्रश्न (३) काव्यसौंदर्य.

 

(अ) कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.


वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते

असल्यासारखे वागलो तर वस्तू

प्रचंड सुखावतात.

उत्तर:

आशयसौंदर्य : ‘वस्तू’ या कवितेत कवी द.भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे.

काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने            वागतात, वस्तूंना कसेही हाताळतात. माणसाच्या या वस्तूंप्रती केल्या जाणाऱ्या कठोर कृत्यावर भाष्य करताना कवी म्हणतात, कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात.

भाषिक सौंदर्य : मुक्तशैलीत केलेल्या या रचनेमधून कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी सध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवींनी दिला आहे.

 

(आ) ‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.

उत्तर:

द.भा.धामणस्कर यांनी ‘वस्तू’या कवितेमध्ये वस्तूंना कसे जोपासावे त्यांना कसे हाताळावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे.

कवी म्हणतात की, वस्तुनाही जीव आणि मन आहे, असे समजून आपण त्यांच्याशी वागतो, तर वस्तूंना परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखाद्या लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले अस्वच्छ हात वस्तूंना लावू नयेत कारण वस्तूंनाही स्वच्छतेची फार आवड असते. महात्मा गांधींचे वाचन आहे के ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे’, म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही. आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे. ‘वस्तूंना असते आवड स्वच्ह राहण्याची’ या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टीकोन दिलेला आहे.


10th marthi Vastu  swadhyay | Class 10 marathi chapter 6 question answer | 10th std marathi digest


(इ) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा.

उत्तर:

मी रोज शाळेत जाताना माझ्या शाळेच्या कपड्यांना इस्त्री करून मगच ते घालून टापटीप शाळेत जात असे. एक दिवस शाळेच्या कपड्यांची इस्त्री करत असताना शाळेच्या शर्टाची पुढील बाजू इस्त्री करून झाली आणि अचानक इस्त्री बंद पडली. आमच्या घरी एकच इस्त्री होती आणि माझ्या शाळेचा दुसरा ड्रेस धुवायला टाकलेला होता. त्या दिवशी मला शाळेत एका बाजूला इस्त्री असलेला आणि दुसऱ्या बाजूला इस्त्री नसलेला शर्ट घालून शाळेत जावे लागले होते.

 

(ई) तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.

उत्तर:

तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत असेल, ते ते मला कधीच आवडणार नाही. कारण शाळा ही जरी सगळ्यांची असली तरी माझं माझ्या शाळेवर खूप प्रेम आहे. शाळा हे विद्येचे मंदिर आहे. त्या ठिकाणी असणारी प्रत्येक वस्तू ही ज्ञानदानासाठी आहे. तसेच आम्हाला सर्वांना उपयोगी पडणारी आहे. जर कोणी तेथील वस्तूंचे नुकसान करीत असेल तर मला राग येईल. परंतु मी त्यांना सर्वप्रथम त्या वर्गमित्राला तसे न करण्याबाबत समजावेन. तरीही त्याने नाही ऐकले तर मी माझ्या वर्गशिक्षकांकडे त्याची तक्रार करेन.

 -----***-----

उपक्रम :

(१) तुमच्या घरातील आजी, आजोबा, पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा.

उत्तर-

1)  पाटा-वरवंटा :- पुरणाची दाळ व इतर भिजवलेल्या दाळी वाटण्यासाठी.


2)  जातं :- गहू, ज्वारी, दाळी इत्यादी धान्य दळण्यासाठी.


3)  रेडिओ :बातम्या, गाणी व इतर कार्यक्रम ऐकण्यासाठी.


4) गंगाळ तांब्याचे किंवा पितळीचे गंगाळ गोलाकार आकाराचे असायचे. त्याला दोन्ही बाजूंनी रण्यासाठी दोन कड्या असायच्या.अंघोळ करण्यासाठी गंगाळाचा उपयोग व्हायचा.

 

कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.


उत्तर:

कंदील: फार दिवसांनी भेट झाली आपली! कशी आहेस तू?

विजेरी: मी बरी आहे. पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज उरली नाही.

कंदील: असे का म्हणतेस? तुझे नि माझे एकच तर कार्य आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे

विजेरी: ते ठीक आहे. पण तू अगदी जुनापुराणा झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी

पाहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो.

कंदील: हो. पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद तेवतो!

विजेरी: तू तर उगाचच मिणमिणतोस. माइया प्रकाशाचा झगमगाट तर बघ, कशी लखलखते मी!

कंदील: अग, तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की तुझा खेळ' समाप्त!

मी तर अखंड तेवत राहतो.

विजेरी: तुलाही तेल लागतंच की ! तेल घाला, वात ठेवा. ती भिजवा. तेव्हा कुठे तू पेटतोस!

कंदील: माझ्याकडे तेल आहे. खरंच ! तेलाला स्नेह म्हणतात. फार प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंध आहे.

विजेरी: हो. पण काळ बदलला. आता तुझी गरज नाही.

कंदील: असे म्हणू नकोस ! प्रकाश देणे आपले व्रत आहे. आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे.आपल्या कार्याचा विसर पड देता कामा नये !


*****

Vastu  swadhyay pdf download

Vastu  question answer

Post a Comment