Iyatta Dahavi Gavatache Pate Marathi Swadhyay | गवताचे पाते स्वाध्याय इयत्ता दहावी
प्रश्न १) आकृत्या पूर्ण करा.
१) रूपक कथेची वैशिष्ट्ये
उत्तर:
१) रूपक कथा आकाराने लहान
२) अर्थघनत्व
३) आशय समृद्धी
४ सूचकता
५) नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता
६) वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ
प्रभावीपणे सूचित होतो.
(२) रूपक कथेची वैशिष्ट्ये
उत्तर:
१) स्वप्नाळू
२) अरसिक
३) किरकिरा
४) चिडखोर
(३) पानाची स्वभाव वैशिष्ट्ये
उत्तर:
१) उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते.
२) गवतपात्याला क्षुद्र मानते.
(४) गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह
उत्तर:
१) चिमणे
२) चिडखोर
३) बिब्बा
४) क्षुद्र
५) अरसिक
६) चिमुकले
प्रश्न (२) कारणे लिहा.
(अ) झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या
पानाकडे तक्रार केली, कारण ...........
उत्तर: झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता.
Gavatache Pate swadhyay pdf
Swadhyay class 10 marathi chapter 7
10th std marathi digest
(आ) ‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान
म्हणाले, कारण ...........
उत्तर: ‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे
पान म्हणाले, कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी 'आ' सुद्धा केला
नव्हता.
(इ) वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात
झाले, कारण
...........
उत्तर: वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात
झाले, कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू
होती.
प्रश्न (३) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
(अ) बेजबाबदारपणा-
उत्तर: जबाबदार ,जबाबदार, जबाब, जर, दार, बाब, बाज.
(आ) धरणीमाता-
उत्तर: धरणी, माता, धर, रणी, मार, रमा, तार
(इ) बालपण-
उत्तर: बाल, पण, लप, बाप.
प्रश्न (४) खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.
कुंभकोणम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत
शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार
नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि णाला गुरुजी
तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग
पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या
मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य
वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास
रामानुजन होय.
उत्तर:
कुंभकोणम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत
शिक्षक समजावून सांगत होते, एखादया संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो. तेव्यात
एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला,
"गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे." ते म्हणाले, "तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग
पाहू!" यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, "सर, न्याल शून्याने भागले तर?" त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना
त्याच्या द्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ
गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले 'श्रीनिवास रामानुजन' होय.
इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download
दहावी मराठी गवताचे पाते स्वाध्याय
प्रश्न (५) खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?
(अ) ज्ञानी X सुज्ञ
(आ)निरर्थक X अर्थपूर्ण
(इ) ऐच्छिक X अनिवार्य
(ई) दुर्बोध X सुबोध
उत्तर:
प्रश्न (६) स्वमत.
(अ) ‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे.
आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी. परीक्षेत
जास्तीत जास्त गुण मिळवावेत ... वगैर वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी
त्यांच्या असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले
आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले
आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच
चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक
पिढीत ते आणि तसेच घडत राहते.
(आ) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते ?
उत्तर:
मी जर गवताच्या पात्याच्या जागी असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे
उत्तर दिले असते:
"अहो आजोबा, आपण उगाच भांडतोय. त्याच काय
झाल, मी अगदी गाढ
झोपेत होतो आणि तुम्ही खाली येताना आवाज झाला, त्यामुळे माझी झोपमोड झाली. त्यामुळे मला तुमचा खूप राग
आला आणि तुम्हाला रागाने काहीही बोललो, त्याबद्दल माफ करा ह मला. तुम्हीसुद्धा मला चिडखोर आणि
अरसिक म्हटले तर मला वाईट वाटले, पण थोडा विचार केल्यावर लक्षात आले, कि, आपण उगाच भांडतो आहोत ज्या ठिकाणी आज तुम्ही आहात त्याच ठिकाणी उद्या
कदाचित मी पण असेन. आपण दोघेही वयाच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहोत, त्यामुळे आपल्याला स्वतःचे
म्हणणे खरे वाटते. पण आपले दृष्टीकोन वेगवेगळे असल्यामुळे आपले विचार सुद्धा
वेगवेगळे आहेत. मात्र, समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून सुद्दा आपण विचार केला तर बरेच
प्रश्न सुटतील. उगाच स्वतःचेच म्हणणे खरे हा विचार आपण सोडून द्यायला हवा.काय
म्हणता?
(इ) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.
उत्तर:
हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर
एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. त्यांचा तो पट ... पट ... पट ... असा
कर्णकटू आवाज तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते
जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, "अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात! लागलंबिगलं
तर नाही ना ?" पानाला बरे वाटले.
प्रेमळपणे म्हणाले, "काय रे बाळा? तुला त्रास झाला का रे? "छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?" काय सांगू बाळा ! इतका झकास
तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय
झाले ना! काय करणार? "असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात
तुम्ही!" हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने
! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या
चिमुकल्या पाण्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते
धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे
झाडांवर पाने सळसळत होती ... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती! ते गवताचे
पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला, पटापट जायला हवं.एखाद्या
आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित.
प्रश्न (७) खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
‘‘...एक विचारू?’’
उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले.
‘‘हं.’’
‘‘मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय... पण..’’
‘‘पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?’’
‘‘...हो.’’
‘‘अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..’’
‘‘पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?’’
‘‘हो! आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर
दिसतात...’’
...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या
दिसला!
(टीप - रूपक कथेचा भावार्थ परीक्षेकरिता समाविष्ट केलेला असल्याने
तोही पाठाचा भाग म्हणून अभ्यासावा.
उत्तर:
जुन्या पिढीतील मोठ्या माणसांना दुसरे
कुणी आपल्यासारखे मोठे व्हावे हे खपत नाही. नव्या पिढीला मात्र मोठे होण्याची
महत्वाकांक्षा असते. धूर्त मनसे त्यांना जाणीवपूर्वक आपल्या आश्रयाखाली वाढवतार
आणि त्यांनी मोठे होऊ नये याची व्यवस्था करतात. जुन्याचा हा कावा लक्षात आलेला एक
सुधारक लाकूडतोड्या त्या मोठ्या माणसावर चालून जातो.
Gavatache Pate swadhyay pdf download
मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी