बालसाहित्यिका-गिरिजा कीर (स्थूलवाचन) स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Balsahitika girija kir Swadhyay Iyatta Dahavi

इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय बालसाहित्यिका-गिरिजा कीर या धड्याचे प्रश्न उत्तर Balsahitika girija kir swadhyay 10th std marathi diges
Admin

Iyatta Dahavi Vishya Marathi Balsahitika girija kir Swadhyay | बालसाहित्यिका-गिरिजा कीर (स्थूलवाचन)  स्वाध्याय इयत्ता दहावी


प्रश्न (१) आकृत्या पूर्ण करा.


साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये.

अ) कथा

१) माणुसकीचे दर्शन घडते

२) कथा वाचकांना खिळवून ठेवतात.

३) वास्तववादी चित्रणावर भर

 

इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय  बालसाहित्यिका-गिरिजा कीर  या धड्याचे प्रश्न उत्तर  Balsahitika girija kir  swadhyay 10th std marathi diges

आ) चरित्रे

१) प्रत्येक चरित्रात महत्वाचा विचार मांडलेला आहे.

२) मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा .

३) सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी.

 

बालसाहित्यिका-गिरिजा कीर  स्वाध्याय १०वी | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय
बालसाहित्यिका-गिरिजा कीर  या धड्याचे प्रश्न उत्तर | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी


प्रश्न (२) टिपा लिहा.

 

(अ) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष.

उत्तर:

बालकांसाठी देखील गिरीजाबाईंनी लक्षणीय साहित्य निर्मिती केली.

बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी सध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरीजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात, असा समज असतो, गिरीजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व तांच्या गरजा यांना प्राधन्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे, असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात.

 

(आ) ‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.

उत्तर:

‘कुणालाही दु:खी ठेवू नये’ असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. ढब्बूने तो शिरोधार्य मानला. व्यायांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला. पण घरातली मंडळी खूप कातावली, आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच. त्यांना तर तरी दुखीः का ठेवावे, असा व्यापक विचार त्याने केला. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात, तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संकुचित विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे, असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतातच किंवा फार फार झाले तर नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी इत्यादी. जात-धर्म यांचा विचार करू नये, असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो.

 

प्रश्न (३) ‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.

उत्तर:

आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधु तयार होतो. तो एका गृहस्थाकाचे पाकीट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो  व्याकूळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचातरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे, तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई असते. त्या व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो,  दुर्सार्याच्या मनाचा विचारच करीत नाही, हे मधूच्या लक्षात येते. यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते.


Balsahitika girija kir  swadhyay pdf | Balsahitika girija kir  question answer



प्रश्न (४) साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर:

कलाकृतीचा आशय , कथानक तसेच व्यक्तिरेखा आपल्या मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्या कलाकृतीच्या स्वभावात प्रेक्षकांना तसेच वाचकांना भारावून टाकण्याची शक्ती असायला हवी.  लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय आणि प्रभावी असयला हवी. कथानक हे वाचकांची किंवा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे हवे.

आपल्या समोरची कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा-प्रतीके इत्यादी आहेत का, हेसुद्धा पाहिले पाहिजे. कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. कथा कादंबरी वा नाटक अस कोणताही साहित्यप्रकार असला तर्हिती त्यातून व्यापक मानवी  मुल्ये प्रकट व्हायला हवीत. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. इत्यादी गोष्टी साहित्यकृतीचा आस्वध घेताना लक्षात घ्यायला हव्यात.


************

10th marthi Balsahitika girija kir  swadhyay

Class 10 marathi chapter  question answer

Balsahitika girija kir kruti

 

बालसाहित्यिका-गिरिजा कीर कृती

इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download

दहावी मराठी बालसाहित्यिका-गिरिजा कीर स्वाध्याय


Post a Comment