Iyatta Dahavi Aashwasak ChitraMarathi Swadhyay | आश्वासक चित्रस्वाध्याय इयत्ता दहावी
प्रश्न (१) कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.
उत्तर :
कवितेचा विषय |
कवितेतील पात्र |
कवितेतील मूल्य |
आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
भविष्यातील सी-पुरुप समानतेचे आश्चासक चित्र |
मुलगी, मुलगा |
स्त्री-पुरुष समानता |
1.जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. 2.भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हात असेल दोघांचाही ज्यावर विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन. |
प्रश्न (२) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.
(१) तापलेले ऊन ---------
उत्तर: भविष्यातील धगधगते वास्तव होय.
(२) आश्वासक चित्र -----
उत्तर: भविष्यात स्त्री-पुरुष समानता वास्तवात येईल, याचे आश्वासन होय.
प्रश्न (३) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.
उत्तर:
(अ) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
(आ) उंच उडवलेला चेंड्ू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
प्रश्न (४) चौकट पूर्ण करा.
कवयित्रीच्या मनातील आशावाद -
उत्तर:
भविष्यात स्त्री-पुरुषांमध्ये
परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल. |
प्रश्न (५) कवितेतील खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
(अ) मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर
उत्तर:
सहकार्य |
(आ) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
उत्तर:
आत्मविश्वास |
(इ) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी
उत्तर:
समंजसपणा |
प्रश्न (६) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.
उत्तर:
आशयसौंदर्य :
कवयित्री नीरजा यांनी 'आश्चासक चित्र' या कवितेमधून स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरीत्या
कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकांतून
योग्यपणे दाखवली आहे .
काव्यसौंदर्य : भातुकलीतले जग हे स्वप्राळू असते. त्यातला संसार हा
लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात.
त्यामुळे भातुकलीच्या स्वप्राळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य
स्वीकारावे लागेल. स्त्री-पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल, तर समजूतदारपणाने व सहकार्याने
ते जगात वावरतील. स्त्री-पुरुष परस्परांची कामे मिळून करतील, असे भविष्यकालीन आशावादी चित्र
उपरोक्त ओळीतून साकारले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ
चिंतनाची प्रचिती येते. 'स्त्री- पुरुष समानता' हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे.
भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र 'हातात हात असेल' या वाक्यखंडातून
प्रत्ययकारीरीत्या प्रकट झाले आहे. स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दांत
व्यक्त झाली आहे.
आश्वासक चित्र स्वाध्याय १०वी | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय 9 | आश्वासक चित्र या धड्याचे प्रश्न उत्तर
(आ) ‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
Aashwasak Chitra swadhyay pdf | Swadhyay class 10 marathi chapter 9 | Aashwasak Chitra question answer
(इ) कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
उत्तर : 'आश्वासक चित्र' या कवितेमध्ये नीरजा यांनी
आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग यांविषयी दृढविश्वास व्यक्त करताना मुलीच्या
तोंडी हे उदगार लिहिले आहेत.
भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून
झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत, हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरची
बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा
तिला हिणवतो की, तू पाल्याची भाजीच कर, चेंडू उडवणे तुला जमणार नाही. तेव्हा मुलगी त्याला
अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की, मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते. तू माझे
काम करशील का? मुलीच्या उद्गारांतून कवयित्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद
केले आहे.
(ई) ‘स्त्री-पुरुष समानते’बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
उत्तर :
कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन 'आश्वासक चित्र' रंगवले आहे. कवितेतील प्रसंगावरून मुलगी ही समाजात दुय्यम स्थान मिळणाऱ्या घटकाचे म्हणजे स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते, तर मुलगा हा पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिथित्व करतो हे दिसून येंते, मात्र स्त्री आता बदलू पाहत आहे. स्त्रियांची अशी समजली जाणारी कामे करण्यासोबतच तिचे क्षितिज विस्तारून पुरुषांची समजली जाणारी कामेही ती सहजगत्या करू लागली आहे. कवितेतील मुलगी भातुकली व चेंडू दोन्ही खेळून दाखवते व स्त्रीच्या याच कर्तृत्ववान व आत्मविश्वासपूर्ण रूपाचे प्रतिनिधित्व करते.