१०. आप्पांचे पत्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Aapanche Patr Swadhyay Iyatta Dahavi

Aapanche Patra swadhyay pdf Swadhyay class 10 Aapanche Patra question answer दहावी मराठी आप्पांचे पत्र स्वाध्याय आप्पांचे पत्र स्वाध्याय १०वी
Admin

Iyatta Dahavi Aapanche Patra Marathi  Swadhyay | वस्तू स्वाध्याय इयत्ता दहावी


प्रश्न (१) कारणे लिहा.


(अ) आजची मुले सुदैवी आहेत, कारण .................

उत्तर:

आजची मुले सुदैवी आहेत, कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात.


(आ) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण.............

उत्तर:

पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण

पुस्तकाच्या पानात डोक्याचे खादय असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते.

 

 

Aapanche Patra swadhyay pdf Swadhyay class 10  Aapanche Patra question answer दहावी मराठी आप्पांचे पत्र  स्वाध्याय  आप्पांचे पत्र  स्वाध्याय १०वी

प्रश्न (२) आकृती पूर्ण करा.

 

पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा.

 

पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा.

 

 

 

 

खेळपट्टीची काळजी घेणारा

 

नर्स

 

शिपाई

 

 

 

 

 

 

 

 

त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो.

 

 

नर्सचे काम डॉक्टरांच्या

कामाइतकेच महत्त्वाचे असते.

 

चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो.

 

 

वृक्षसंवर्धनाचे फायदे

उत्तर:

१)    वृक्षांची सावली मिळते.

२)   जमिनीखालील पाणी पातळी टिकवून ठेवतात.

३)   वृक्ष हवा शुद्ध ठेवतात.

४) फळे, फुले, लाकूड, औषधे देतात.


प्रश्न (३) योग्य पर्याय निवडा.


(अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त

(१) हृदयाची धडधड वाढते.

(२) कपाळावरच्या आठ्या वाढतात.

(३) विद्यार्थ्याचे गुण वाढतात.

(४) विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.

उत्तर: (२) कपाळावरच्या आठ्या वाढतात.

 

(आ) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा

(१) तो रोज उपस्थित असतो.

(२) तो सर्वांची काळजी घेतो.

(३) तो चांगलं काम करतो.

(४) तो सर्वांशी चांगले बोलतो.

उत्तर: (३) तो चांगलं काम करतो.


प्रश्न (४) आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

 (अ) आप्पांचे शिक्षणप्रेम-

उत्तर:

मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात, ते खिडकीतून ऐकत असतो


(आ) स्वच्छता-

उत्तर:

आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो.


 प्रश्न (५) चौकटी पूर्ण करा.

आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा

उत्तर:

१)    लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे.

२)   कोणतेही काम मन लावून करावे.

३)   जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे.

४) इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे.


प्रश्न (६) खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा.

(क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.) 

(अ) ती लगबगीने घरी पोहोचली.

उत्तर: लगबगीने


(आ) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.

उत्तर: सहज


(इ) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.

उत्तर: आज

 

प्रश्न (७) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये  शोधा.

(वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला 'शब्दयोगी अव्यय' म्हणतात) 


(अ) पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली.

उत्तर: वर


(आ) तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.

उत्तर: समोर


(इ)        छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता. 

उत्तर: बरोबर

 

(ई) परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.

उत्तर: मुळे


10th marthi Aapanche Patra swadhyay | Class 10 marathi chapter 10 uestion answer | 10th std marathi digest


प्रश्न (८) स्वमत.


(अ) ‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.

उत्तर :

दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे, हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते.

आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल, वेगळ्या शब्दांत, 'लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.' वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.

 

(आ) ‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी  आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.

उत्तर :

परीक्षेचा निकाल लागला की परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळाले यावरून लोक आपली परीक्षा करतात. वास्तविक, परीक्षेत मिळालेल्या गुणांना जीवनात एवढे मोठे महत्त्व नसते. महत्त्व असते आपल्या अंगच्या गुणांना, या गुणांनीच माणूस मोठा होत असतो. डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलामच काय पण जेवढी जेवढी जगात थोर माणसे झाली, ती काही दहावीत प्रथम आलेली माणसे नव्हती. पण त्यांचीच छायाचित्रे घराघरात लागली आहेत. म्हणून आप्पा म्हणतात की जग तुम्हाला परीक्षेत किती गुण मिळाले ते विचारतील, पण मी मात्र तुम्ही किती गुणी आहात, ते सांगेन.


इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय १०
आप्पांचे पत्र  या धड्याचे प्रश्न उत्तर | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी


(इ) आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.

उत्तर : आप्पांच्या आमच्याकडून चार अपेक्षा आहेत.

पहिली अपेक्षा म्हणजे पुस्तकाची पानं आणि झाडाची पानं दोन्ही आम्ही प्रेमाने बघितली पाहिजेत. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अभ्यासही करू आणि वृक्षलागवडीच्या उपक्रमात सहभागही घेऊ.

आप्पांची दुसरी अपेक्षा म्हणजे आमच्यापैकी बरेच जण परदेशात जाणार आहेत. त्यातला एकजण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसला पाहिजे. यासाठी आम्ही परदेशात जाओ न जाओ, कोणत्याही एका कलेत प्रावीण्य मिळवू.

तिसरी अपेक्षा म्हणजे आमच्यापैकी एकाने तरी लिहिलेले पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात दिसले पाहिजे. आमच्यापैकी लेखनकलेचे जे भोक्ते असतील, ते हे काम अवश्य करतील किंवा आम्ही ज्या कलेत प्रावीण्य मिळवू त्याच संदर्भात त्यावर ग्रंथ लिहू.

चौथी अपेक्षा म्हणजे आप्पाला आमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचे आहे. याचा अर्थ शिक्षणानंतर नोकरीच केली पाहिजे, असे नाही, उत्तम शेतीही करता येते व नावही मिळवता येते. शेती व्यवसायाकडे वळण्याचा आम्हीही विचार करू.


********



Post a Comment