9 class science question answer Mahiti Sanpreshn Tantradnyan | इयत्ता नववी सामान्य विज्ञान माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा
१. संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचूशकतो तर ...... मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.
उत्तर : संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण
वाचूश कतो तर इंटर्नल/प्रायमरी मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.
कारण
प्रक्रिया सी.पी.यू. मध्ये केल्या जातात. प्रायमरी मेमरी ही सी.पी.यू. मध्ये असते.
2.
शास्त्रज्ञांच्या शोधाबद्द्ल चित्रे तसेच व्हिडीओंचेसादरीकरण
करताना .........चा वापर करता येईल.
उत्तर : शास्त्रज्ञांच्या शोधाबद्द्ल चित्रे तसेच व्हिडीओंचेसादरीकरण करताना मायक्रोसॉफ्ट
पॉवरपॉइंट चा वापर करता येईल.
कारण
पॉवरपॉइंटमध्ये एकाच स्लाइडवर मजकूर, चित्रे, व्हिडिओ घेता येतात.
3. प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक
माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी.......वापरतात.
उत्तर : प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या
संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ़्ट
एक्सेल वापरतात.
कारण
मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये विविध प्रकारचे आलेख, चार्ट्स तयार करण्याची
सोय असते.
4. पहिल्या पिढीतील संगणक ..........मुळे बंद पडत
होते.
उत्तर : पहिल्या पिढीतील संगणक उष्णता निर्मिती मुळे बंद पडत होते.
कारण पहिल्या
पिढीत निर्वात नलिका वापरल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असे. विजेच्या
जादा वापरामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होऊन निर्वात नलिका तापल्याने
निकामी होत. परिणामी संगणक पटकन बंद पडत.
5. संगणकास
........ दिला नसेल तर त्याचे कार्य चालणार
नाही.
उत्तर : संगणकास विद्युत पुरठा दिला नसेल
तर त्याचे कार्य चालणार नाही.
कारण संगणक हे
इलेक्ट्रॉनिक साधन असून त्याचे कार्य सुरू राहण्यासाठी विद्युत पुरवठ्याची
आवश्यकता असते.
प्रश्न 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर :
विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील
माहिती संप्रेषणाची भूमिका
1) विज्ञान तंत्रज्ञानामुळे विज्ञान विषय शिकणे अधिक सुलभ व समृद्ध झाले आहे.
2) सिम्युलेशनच्या मदतीने धोकादायक व महागडे प्रयोग विद्यार्थ्यांना करून
दाखवण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.
3) विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रयोगाची कृती स्वतः करण्यास व पाहण्यात
उपयुक्त ठरत आहे.
विज्ञान आणि
तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्त्व
१) शास्त्रीय
माहिती जमा करण्यासाठी
आंतरजाल, न्यूजग्रूप, ब्लॉग, यूट्यूब
यांसारख्या आधुनिक साधनांच्या मदतीने शास्त्रीय माहिती उपलब्ध होते. उदा.
श्वसनसंस्था
2) सादरीकरण
पॉवरपॉइंटच्या मदतीने प्रेझेंटेशन तयार करून सादरीकरणाद्वारे वैज्ञानिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतात. उदा. बेडकाचा जीवनक्रम
3) अंदाज वर्तवण्यासाठी
शास्त्रीय
माहितीवर प्रक्रिया करून अंदाज वर्तवण्यासाठी उपयोग होतो.
उदा.
हवामानाचा अंदाज
4) अध्ययनास सहकार्य
सहकारी, तज्ज्ञ, शिक्षक, शास्त्रज्ञ
यांच्या मदतीने शिकण्याची संधी मिळते.
आ. संगणकातील
कोणकोणत्या अॅप्लीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला? कशाप्रकारे?
उत्तर :
विज्ञानाचा
अभ्यास करताना अनेक अप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यापैकी पुढील
अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर मला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला.
1. मायक्रोसॉफ्ट वर्ड
प्रात्यक्षित
कार्याचे तसेच प्रोजेक्टचे लेखन कार्य करण्यासाठी.
2. मायक्रोसॉफ्ट एक्सेल
प्रयोगाचे गणन
करण्यासाठी व आलेख काढण्यासाठी.
3. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट
आकर्षक, मनोरंजक सादरीकरण तयार करण्यासाठी.
4. ब्राऊझर्स
अनेक
ब्राऊझर्सपैकी मला क्रोम ब्राऊझरचा नियमित उपयोग होतो. विविध वेबसाइटवरील माहिती
शोधणे,
विज्ञान विषय घटकाशी निगडित माहितीचे संकलन करणे इत्यादी माहिती या
ब्राऊझरच्या साह्याने मला मिळवता येते.
5. यूट्यूब
यूट्यूबवर
उपलब्ध असलेल्या विविध व्हिडिओंच्या साह्याने विविध घटकांवरील माहिती प्रत्यक्षपणे
सहज पहायला मिळते.
इ. संगणकाचे कार्य
कशा पध्द्तीने चालते?
उत्तर :
संगणकाचे
कार्य तीन टप्प्यांमध्ये चालते.
इनपुट -------प्रोसेस -------आऊटपुट
1) इनपुट डिव्हाइसमार्फत संगणकास माहिती पुरवली जाते.
2) पुरवलेल्या माहितीवर सीपीयूमध्ये बसवलेला प्रोसेसर प्रक्रिया करतो.
3) प्रक्रिया झाल्यावर तयार झालेले उत्तर आऊटपुट डिव्हाइसेसमार्फत वापरकर्त्यास मिळते.
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा इयत्ता नववी स्वाध्याय pdf | इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय | माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा प्रश्न उत्तरे
ई. संगणकातील
विविध सॉफ्ट्वेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
उत्तर :
1) अथिकृत परवानाधारक सॉफ्टवेअरचा परवानगी घेऊनच वापर करावा.
2) फ्रीवेअर सॉफ्टवेअरशिवाय इतर परवानाधारक अधिकृत सॉफ्टवेअरच
इन्स्टॉल
करावे.
3) अधिकृत स्त्रोताद्वारे माहिती अॅक्सेस करावी. इतरांच्या फाइल्स त्यांच्या
परवानगीशिवाय
अॅक्सेस करू नयेत.
4) सायबर लॉचा भंग होणार नाही यादृष्टीने अधिकृत मार्गानेच वैध
सॉफ्टवेअरची
खरेदी करून त्याचा वापर करावा.
उ. माहिती
संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत? विज्ञानाच्या संदर्भात
त्यांचा वापर कसा केला जातो?
उत्तर :
दूरध्वनी, मोबाईल, संगणक, रेडिओ, दूरदर्शन, आंतरजाल, ई-मेल,
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने
आहेत.
1) मोबाईल
विज्ञान
विषयक व्याख्याने, शैक्षणिक संस्थांना भेटी यांचे
ध्वनिमुद्रण व चित्रीकरण करून ते पुन्हा ऐकले व पाहिले जाते. विज्ञान विषयक माहितीची
देवाण-घेवाण करण्यासाठी याचा वापर केला जातो.
2) संगणक
विज्ञानविषयक
माहिती साठवून ठेवणे, सादरीकरण, आलेख निर्मिती
इत्यादींसाठी संगणक या साधनाचा वापर केला जातो.
3) आंतरजाल (इंटरनेट)
संगणक
व आंतरजालाद्वारे विज्ञान विषयक माहिती मिळवणे. विविध वेबसाईट्सना भेटी देणे व
आवश्यक माहिती व चित्र कॉपी करून घेणे. वैज्ञानिक प्रयोग व कृतींचे निरिक्षण करणे.
प्रश्न 3.
गतीचे नियम पाठातील पृष्ठ क्र.4 वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व अॅन्थनी यांच्या गतीचा
अंतर - काल आलेख Spreadsheet चा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही
कोणती काळजी घ्याल.
उत्तर :
1) X = काल आणि Y = अंतर दाखवू.
2) सारणीमध्ये घड्याळी वेळ दिली आहे. त्याऐवजी तासामध्ये
0, 0.5, 1,
1.5, 2, 2.5, याप्रमाणे कालावधी घेऊ.
3) वर्कशीटमध्ये माहिती भरून झाल्यानंतर आलेख काढावयाचा सर्व मजकूर शिर्षकासह
निवडू.
4) इन्सर्ट टॅबवर क्लिक करून इन्सर्ट चार्टवर क्लिक करू.
5) Line हा चार्ट प्रकार व Line With Markers नमुना निवडू.
प्रश्न 4.
संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे?
उत्तर :
क्र. |
तपशील |
पहिली पिढी |
दुसरी पिढी |
तिसरी पिढी |
चौथी पिढी |
पाचवी पिढी |
१. |
कालखंड |
1946 ते 1959 |
1959 ते 1963 |
1963 ते 1971 |
1971 ते 1990 |
1990 ते आजपर्यंत |
२. |
मुख्य घटक |
निर्वात नलिका |
टान्झिस्टर्स |
इंटिग्रेटेड सर्किटस् |
मायक्रोप्रोसेसर
|
पॅरलल प्रोसेसिंग, नेटवर्किंग |
३. |
इनपुट डिव्हाइस |
पंचकार्ड |
पंचकार्ड |
कीबोर्ड |
कीबोर्ड, माउस |
कीबोर्ड, माउस, स्केंनर व इतर |
४. |
थंड करण्यासाठी ACची गरज |
होय |
होय |
होय |
नाही |
नाही |
५. |
भाषा |
मशीन लँग्वेज |
मशीन अर्सेब्ली लँग्वेजेस COBOL |
हाप सेव्हल प्रोसेसिंग लग्वेज, Operating System
|
Graphical User Interface
|
Graphical User Interface
|
प्रश्न 5. तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल.
उत्तर :
स्वतःजवळची
असणारी माहिती इतरांना देण्यासाठी पुढील माहिती संप्रेषण साधनांची मदत घेऊ.
1) संगणक व नेटवर्किंग या साधनांच्या मदतीने ब्लॉग, फोरम,
चॅटिंग, ईमेल व इतर सोशल मिडिया जसे फेसबुक,व्हाट्सएप इत्यादींच्या माध्यमातून.
2) दूरध्वनी व मोबाईल या साधनांच्या मदतीने संभाषणात्मक तसेच मजकूर व्हिडिओ
स्वरूपात माहितीची देवाणघेवाण
3) दूरदर्शन या साधनाच्या माध्यमातून चर्चा, वाद-विवाद
यांमध्ये सहभागी होऊन माहितीची देवाण-घेवाण करता येते.
4) मोबाईल व संगणकावर यूट्यूब चायनलच्या माध्यमातून
5) संगणकावर skype वगैरेच्या साह्याने.
प्रश्न 6.
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील
किमान तीन घटकांवर Powerpoint
Presentations तयार करा. ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघतक्ता तयार
करा.
उत्तर :
1) घटक निवडून त्यासाठीच्या लिखित स्लाइडस् कागदावर तयार करून ठेवू.
2) आवश्यक चित्रे आंतरजालावरून डाऊनलोड करून आकृत्या, तक्ते
हे एका फोल्डरमध्ये योग्य क्रम लावून सेव्ह करून ठेवू.
3) होम टॅब वरून न्यू स्लाईड पर्यायावर क्लिक करून आवश्यकतेनुसार योग्य प्लेस
होल्डरची स्लाईड निवडू.
4) योग्य मजकूर व चित्र अॅड करून स्लाइडचे फॉरमेंटींग करू.
5) प्रत्येक स्लाईडला योग्य व आकर्षक ट्रांझिशन्स व अॅनिमेशन इफेक्ट देवू,
सांगितल्या प्रमाणे तुम्ही स्वतः पाठ्यपुस्तकातील तीन घटकांवर पॉवरपॉईंट
प्रेझेंटेशन तयार करा.
प्रश्न 7.
संगणकाचा वापर करत असताना तुम्हांला कोणकोणत्या
तांत्रिक अडचणी आल्या? त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय केले ?
उत्तर :
संगणकाचा वापर
करत असताना मला खालील तांत्रिक अडचणी आल्या.
आलेली
अडचण
1)
पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार करत असताना अचानक वीज खंडित झाल्यामुळे
तयार केलेली सर्व माहिती नष्ट झाली.
केलेले
उपाय
संगणकात
माहिती भरत असताना वरचेवर तयार केलेली माहिती सेव्ह केली. तसेच संगणकाला यू.पी.एस. जोडून घेतले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला
तरी काही काळ माहिती सेव्ह करणे शक्य झाले.
आलेली
अडचण
2) फोटो अपलोड करीत असताना फोटो अपलोड होत नव्हता.
केलेला
उपाय
फोटोची साईज व
फॉरमॅट बदलला.
आलेली
अडचण
3) अभ्यासक्रमाशी संबंधित व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ स्पष्ट दिसत नव्हता.
केलेला
उपाय
व्हिडिओच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन उभ्या डॉट्सला टच करून व्हिडिओची Quality वाढवून घेतली.
**********