9 class science question answer Aaml Aamlari v Kshar | इयत्ता नववी सामान्य विज्ञान आम्ल, आम्लारी व क्षार स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न 1. गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
अ. क्लोराइड, नायट्रेट, हायड्राइड, अमोनिअम
उत्तर : अमोनिअम
कारण इतर सर्व ॲनायन आहेत.
आ. हायड्रोजन क्लोराइड, सोडिअम हायड्रॉक्साइड, कॅल्शिअम ऑक्साइड, अमोनिआ
उत्तर : हायड्रोजन क्लोराइड
कारण इतर सर्व आम्लारीधर्मी संयुगे आहेत.
इ. अॅसेटिक अॅसिड, कारबॉनिक अॅसिड, हायड्रोक्लोरीक अॅसिड, नायट्रिक अॅसिड.
उत्तर : अॅसेटिक अॅसिड
कारण इतर सर्व अकार्बनीॲसिड आहेत.
ई. अमोनियम क्लोराइड, सोडिअम क्लोराइड, पोटॅशिअम नायट्रेट, सोडिअम सल्फेट.
उत्तर : अमोनियम क्लोराइड
कारण इतर सर्व उदासिन क्षार आहेत.
उ. सोडिअम नायट्रेट, सोडिअम कार्बोनेट, सोडिअम सल्फेट, सोडिअम क्लोराइड
उत्तर : सोडिअम कार्बोनेट
कारण इतर सर्व उदासिन क्षार आहेत.
ऊ. कॅल्शिअम ऑक्साइड, मॅग्नेशिअम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड, सोडिअम ऑक्साइड
उत्तर : झिंक ऑक्साइड
कारण इतर सर्व आम्लारिधर्मी ऑक्साईडे आहेत.
ए. स्फटिकरूप मोरचूद, स्फटिकरूप मीठ, स्फटिकरूप फेरस सल्फेट, स्फटिकरूप सोडिअम कार्बोनेट
उत्तर : स्फटिकरूप मीठ
कारण इतर सर्व स्फटिकजल आहेत.
ऐ. सोडिअम क्लोराइड, पोटॅशिअम हायड्रॉक्साइड, अॅसेटिक अॅसिड, सोडिअम अॅसिटेट.
उत्तर : अॅसेटिक अॅसिड
कारण इतर सर्व विद्युत अपघटनी पदार्थ आहेत.
प्रश्न 2. पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
अ. कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले.
उत्तर : कॉपर सल्फेटच्या द्रावणाची संहती कमी झाली व ते विरल द्रावण झाले. तसेच निळा रंग थोडा फिकट झाला.
आ. सोडिअम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनॉलफ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले.
उत्तर : सोडिअम हायड्रॉक्साइडच्या 10
मिली द्रावणात फिनॉलफ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले तर द्रावणाला गुलाबी रंग येतो.
इ.10 मिली विरल नायट्रिक अॅसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2/3 कण टाकून हलवले.
उत्तर : 10 मिली विरल नायट्रिक
अॅसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2/3 कण टाकून हलवले तर कॉपर नायट्रेटचे द्रावण तयार
होते व हायड्रोजन वायू मुक्त होतो.
ई. 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH
मिळवून हलवले.
उत्तर : 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH
मिळवून हलवले तर लाल लिटमस निळा झालेला दिसतो.
उ. विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये
मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले.
उत्तर : विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले तर मॅग्नेशिअम क्लोराईड व पाणी तयार होते.
त्यात मॅग्नेशिअम ऑक्साईड हे आम्लारीधर्मी आहे. त्यामुळे उदासिनीकरण होते. मॅग्नेशिअम ऑक्साईड व विरल
NaOH ची अभिक्रिया होत नाही कारण ते दोन्हीही आम्लारिधर्मी आहेत.
ऊ. विरल HCl मध्ये झिंक ऑक्साइड मिळवले तसेच
विरल NaOH मध्ये झिंक ऑक्साइड मिळवले.
उत्तर :
१) विरल HCl मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तर झिंक क्लोराईड आणि पाणी तयार होते.या अभिक्रीयेमध्ये
झिंक ऑक्साईड हे अम्लारीधर्मी आहे.
२) विरल NaOH मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तेव्हा सोडीअम झिंकेट व पाणी तयार होते. या अभिक्रीयेमध्ये
झिंक ऑक्साईड हे आम्लधर्मी आहे.
३) म्हणजे झिंक ऑक्साईड हे उभयधर्मी ऑक्साईड
आहे.
ए. चुनखडीवर विरल HCl टाकले.
उत्तर : चुनखडीवर विरल HCl टाकले तर कॅल्शिअम क्लोराईड व पाणी तयार होते व कार्बनडायऑक्साईड वायू मुक्त होतो.
या अभिक्रियेत चुनखडी ही आम्लारिधर्मी आहे.
ऐ. परीक्षानळीत मोरचुदाचे खडे तापवले व थंड झाल्यावर त्यात पाणी मिळवले.
उत्तर : मोरचुदाचे खडे तापवले असता स्फटिक
संरचना मोडून रंगहीन पांढरे चूर्ण तयार होते व पाण्याचे बाष्प होऊन निघून जाते व थंड
झाल्यावर या चूर्णात पाणी टाकले असता पुन्हा निळ्या रंगाचे मोरचूद तयार होते. हे सर्व भौतिक बदल आहेत.
ओ. विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून वीजप्रवाह जाऊ दिला.
उत्तर : विरल H2SO4 मध्ये H+ आणि SO4 - हे आयन विचरणामुळे तयार होतात. या आयनांव्दारे विद्युतधारा वाहून नेली जाते. यात ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो. तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो
प्रश्न ३. खालील ऑक्साइडचे तीन गटात वर्गीकरण करून त्यांना नावे द्या. CaO,MgO, CO2, SO3, Na2O, ZnO,Al2O3, Fe2O3
उत्तर :
1) आम्लारिधर्मी ऑक्साइड : CaO, MgO, Fe2O3 ,
2) आम्लधर्मी ऑक्साइड : CO2 , SO3, Na2O
3) उभयधर्मी ऑक्साइड: ZnO, Al2O3
आम्ल, आम्लारी व क्षार प्रश्न उत्तरे | आम्ल, आम्लारी व क्षार स्वाध्याय
प्रश्न 4. इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.
अ. सोडिअम व क्लोरीनपासून सोडिअम क्लोराइडची निर्मिती
उत्तर :
सोडिअमच्या अणूमध्ये बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो.
तो देऊन सोडिअम चा धन आयन बनतो. याच वेळी क्लोरिनच्या
बाह्यतम कक्षा हा इलेक्ट्रॉन स्वीकारुन क्लारीनच्या अणूच्या बाह्यतम कक्षेतील अष्टक
पूर्ण होते. क्लोरीन चा ऋण आयन तयार होतो. साडिअम चा धन आयन व क्लारीन चा ऋण आयन यांच्यातील विद्युत स्थितीक आकर्षणामुळे
त्यांमध्ये रासायनिक बंध तयार होऊन सोडिअम क्लोराईड ची निर्मिती होते.
आ. मॅग्नेशिअम व क्लोरीनपासून मॅग्नेशिअम क्लोराइडची निर्मित
उत्तर :
मॅग्नेशिअमच्या अणूमध्ये बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. ते देऊन मॅग्नेशिअमचा धन प्रभार असलेला
धन आयन बनतो. क्लोरीन अणूच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. क्लोरीनचा एक अणू 1 इलेक्ट्रॉन स्वीकारून बाह्यतम कक्षेत अष्टक पूर्ण करून क्लोराईडचा ऋण आयन तयार
होतो.
एका मॅग्नेशिअमच्या अणूकडून दिलेले 2 इलेक्ट्रॉन क्लोरीनचे
2 अणू स्वीकारून दोन क्लोरीनचे ऋण आयन तयार होतात. मॅग्नेशिअमचा धन आयन व क्लोरीनचा ऋण आयन यांमधील विद्युत स्थितिक आकर्षणामुळे
त्यांमध्ये आयनिक बंध तयार होऊन मॅग्नेशिअम क्लोराईड तयार होते.
आम्ल, आम्लारी व क्षार इयत्ता नववी स्वाध्याय pdf | इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय
प्रश्न 5. खालील संयुगे पाण्यात विरघळल्यास
त्यांचे विचरण कसे होते ते रासायनिक
समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी
की जास्त ते लिहा हायड्रोक्लोरिक आम्ल, सोडिअम क्लोराइड, पोटॅशिअम हायड्रॉक्साइड, अमोनिआ, अॅसेटिक आम्ल, मॅग्नेशिअम क्लोराइड, कॉपर सल्फेट.
उत्तर :
1) हायड्रोक्लोरिक
आम्ल:
HCl → H+ + Cl –
विचरणाचे
प्रमाण जास्त
2) सोडिअम क्लोराइड:
NaCl → Na+ + Cl –
विचरणाचे प्रमाण
जास्त
3) पोटॅशिअम हायड्रॉक्साइड:
KOH → K+ + OH –
विचरणाचे
प्रमाण जास्त
4) अमोनिआ:
NH3 → NH4+ + OH –
विचरणाचे
प्रमाण कमी
5) अॅसेटिक आम्ल:
CH3COOH → CH3COOH- + H +
विचरणाचे
प्रमाण कमी
6) मॅग्नेशिअम क्लोराइड:
MgCl2 → Mg 2+ + 2Cl-
विचरणाचे
प्रमाण कमी
7) कॉपर सल्फेट:
CuSO4 → Cu 2+ + SO42-
विचरणाचे प्रमाण कमी
प्रश्न 6. पुढील द्रावणाची संहती ग्रॅम/लीटर व मोल/लीटर हया एककांमध्ये व्यक्त करा.
अ. 100 मिली द्रावणात 7.3 ग्रॅम HCl
आ. 50 मिली द्रावणात 2 ग्रॅम NaOH
इ. 100 मिली द्रावणात 3 ग्रॅम CH3 COOH
ई. 200 मिली द्रावणात 4.9 ग्रॅम H2SO4
द्राव्य |
द्राव्याच्या राशी |
द्राव्याचे आकारमान |
द्रावणाची संहती |
||||
A नाव |
B रेणूसुत्रे |
C रेणुवस्तुमान(u) |
D ग्रॅम(g) |
E = D/C मोल |
F लीटर (L) |
G = D/F ग्रॅम / लीटर (g/L) |
H = E/F रेणूता (मोल) |
हायड्रोक्लारीक आम्ल |
HCl |
36.5u |
7.3g |
0.2 mol |
100ml |
73 g/L |
2 mol/L |
सोडिअम हायड्रॉक्साईड |
NaOH |
40u |
2g |
0.05 mol |
50ml |
40 g/L |
1 mol/L |
ॲ सेटिक आम्ल |
CH3COOH |
60u |
3g |
0.05 mol |
100ml |
30 g/L |
0.5 mol/L |
सल्फुरिक आम्ल |
H2SO4 |
98u |
4.9g |
0.05 mol |
200ml |
24.5 g/L |
0.25 mol/L |
प्रश्न 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. आम्लारिधर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचेवर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा.
उत्तर :
आम्लाच्या एका रेणूच्या विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे
आम्लाची आम्लारिधर्मता होय.
एक आम्लारिधर्मता असणारे आम्ल: HCL, HNO3
द्विआम्लारिधर्मता असणारे आम्ल : H2SO4,
H2CO3
त्रिआम्लारिधर्मता असणारे आम्ल : H3BO3,
H3PO4
आ. उदासिनीकरण
म्हणजे काय? दैनंदिन जीवनातील उदासिनीकरणाची दोन उदाहरणे लिहा.
उत्तर :
आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता, क्षार व पाणी
तयार होते. या अभिक्रियेला उदासिनीकरण म्हणतात.
आम्ल + आम्लारी ⟶ क्षार + पाणी
HCl (aq) + NaOH (aq) ⟶ NaCl(aq) + H2O
दैनंदिन जीवनातील उदाहरणे
1. जठरात तयार होणारे हायड्रोक्लारीक
आम्ल अन्नाचे पचन करण्यासाठी मदत करते. मात्र या आम्लाचे प्रमाण
जास्त झाल्यास पोटात दुखू लागते, मळमळते यामुळे अपचन होते.
हे टाळण्यासाठी आम्ल प्रतिबंधाचा वापर करतात. आम्लप्रतिबंधामूळे
जठरात तयार झालेल्या अधिक आम्लाचे उदासिनीकरण होते.
२. सकाळी दात घासण्यापूर्वी
लाळेचे pH 7 पेक्षा कमी असते, म्हणजे आम्लधर्मी
असते. म्हणून ही आम्लारी असून दात स्वच्छ होउुन तोंडातल्या लाळेमध्ये
असणार्या अधिक आम्लाचे उदासिनीकरण होते. यामुळे दाताची झीज थांबते.
इ. द्रावणाचा सामूमोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात ते लिहा.
उत्तर :
1. द्रावणाचा सामू मोजण्यासाठी सामू मापनश्रेणी
वापरली जाते.
2. सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत
म्हणजे सामूमापक हे विद्यूत साधन वापरले जाते.
3. वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा त्यापासून
बनवलेल्या कागदी दर्शकपट्टीकेचा वापर करून सामू ठरवता येतो.
ई. पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजे काय ते सांगून विद्युतअग्र अभिक्रिया लिहून स्पष्ट करा.
उत्तर :
आम्लयुक्त किंवा आम्लारियुक्त पाण्यातून
विद्युतधारा जाऊ दिली असता त्याचे पृथक्करण होऊन ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो
व धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. यालाच पाण्याचे विद्यूत
अपघटन म्हणतात.
⟶ऋणाग्र
अभिक्रिया : 2H2O + 2e- H2(g) + 2
OH- (aq)
⟶धनाग्र
अभिक्रिया : 2H2O O2 (g) + 4
H- (aq) + 4e-
Swadhyay Aaml Aamlari v Kshar | Aaml Aamlari v Kshar Swadhyay Prashn Uttare
प्रश्न 8. खालील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
अ. HCl च्या द्रावणातNaOH चे द्रावण मिळवले.
उत्तर : HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले असता रासायनिक अभिक्रिया होऊन सोडिअम क्लाराईड व पाणी तयार होते. ही उदासिनीकरणाची अभिक्रिया आहे.
HCl(aq) + NaOH(aq) ⟶ NaCl(aq) + H2O(l)
(हायड्रोक्लारीक आम्ल) (aq) + ( सोडीअम हायड्रॉक्साईड )
(aq) ⟶ ( सोडीअम क्लोराईड) (aq) + (
पाणी) (aq)
आ. विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले.
उत्तर :
विरल H2SO4 मध्यो जस्ताचे चूर्ण मिळवल्यास, जस्ताची विरल सल्फुरिक
आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो व झिंक सल्फेट तयार होते.
Zn + H2SO4 ⟶ ZnSO4 (aq) + H2 (g)
इ. कॅल्शिअम ऑक्साइड मध्ये विरल नायट्रिक अॅसिड मिळवले.
उत्तर :
कॅल्शिअम ऑक्साइड मध्ये विरल नायट्रिक
अॅसिड मिळवले असता, कॅल्शिअम नायट्रेट व पाणी तयार होते.
CaO + 2HNO3 ⟶ Ca ( NO3)2
(aq) + H2O
ई. KOH च्या द्रावणामधून
कार्बन डायऑक्साइड वायू सोडला.
उत्तर :
KOH च्या द्रावणामधून कार्बन
डायऑक्साइड वायू सोडला तर, पाटॅशिअम कार्बोनेट व पाणी तयार होते.
CO2(g) + 2KOH(aq) ⟶ K2CO3(aq) + H2O
उ. खाण्याच्या सोड्यावर विरल HCl ओतले.
उत्तर :
खाण्याच्या सोड्यावर विरल HCl ओतले तर, सोडिअम क्लोराईड तयार होते व कार्बनडायऑक्साईड
वायू मुक्त होतो.
NaHCO3(s) + HCl (aq) ⟶ NaCl(aq) + H2O(l) + CO2(g)
प्रश्न 9. फरक लिहा.
अ.आम्ल व आम्लारी
उत्तर :
आम्ल |
आम्लारी |
1. आम्ले चवीला आंबट असतात. |
1. आम्लारी चवीला तुरट असतात |
2. आम्लामध्ये निळा लिटमस कागद लाल होतो. |
2. आम्लारीमध्ये लाल लिटमस कागद निळा होतो. |
3. आम्लात एक किंवा जास्त आयन असतात. |
3. आम्लारीत एक किंवा जास्त
आयन असतात. |
4. अधातूंच्या ऑक्साईड पासून आम्ले तयार होतात. |
4. धातूंच्या ऑक्साईडपासून आम्लारी तयार होतात. |
5. उदा. : HCl , H2SO4 |
5. उदा. : NaOH, Ca(OH)2 |
आ. कॅटायन व ॲनायन
उत्तर :
कॅटायन |
ॲनायन |
1. कॅटायन म्हणजे धनप्रभारीत आयन होत. |
1. ॲनायन म्हणजे ऋणप्रभारीत आयन होत. |
2. विद्युतधारेच्या प्रभावामुळे कॅटायन ऋणाग्राकडे आकर्षिले जातात. |
2. विद्युतधारेच्या प्रभावामुळे ॲनायन धनाग्राकडे आकर्षिले जातात. |
3. सामान्यत: धातूंचे व हायड्रोजनचे आयन हे कॅटायन असतात. |
3. सामान्यत: अधातूंचे आयन हे ॲनायन असतात. |
4. उदा. : Na+ , H+ |
4. उदा. : Cl- , Br- , So42- |
इ. ऋणाग्र व धनाग्र
उत्तर :
ऋणाग्र |
धनाग्र |
1.ऋणप्रभारित इलेक्ट्रोडला ऋणाग्र म्हणतात. |
1धनप्रभारित इलेक्ट्रोडला धनाग्र म्हणतात. |
2. कॅटायन ऋणाग्राकडे आकर्षिले जातात. |
2. ॲनायन धनाग्राकडे आकर्षिले जातात. |
3. ऋणाग्राकडून इलेक्ट्रॉन दिले जातात. |
3. धनाग्रापाशी इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात. |
प्रश्न 10. खालील पदार्थांच्या जलीय द्रावणाचे
वर्गीकरण सामूप्रमाणे 7, 7 पेक्षा जास्त व 7 पेक्षा कमी या गटांत करा.
मीठ, सोडिअम अॅसिटेट,
हायड्रोजन क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड,
पोटॅशिअम ब्रोमाइड, कॅल्शिअम हायड्रॉक्साइड,
अमोनिअम क्लोराइड, व्हिनेगार, सोडिअम कार्बोनेट, अमोनिआ, सल्फर
डायऑक्साइड
उत्तर
सामू | पदार्थांचे द्रावण |
7 | मीठ |
पेक्षा जास्त | सोडिअम अॅसिटेट, पोटॅशिअम ब्रोमाइड, कॅल्शिअम हायड्रॉक्साइड, सोडिअम कार्बोनेट, अमोनिआ. |
7 पेक्षा कमी7 | हायड्रोजन क्लोराइड, अमोनिअम क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड, व्हिनेगार, सल्फर डायऑक्साइड. |
********