6.वनस्पतींचे वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान। Vanaspatinche Vargikarn 9vi

वनस्पतींचे वर्गीकरण प्रश्न उत्तरे वनस्पतींचे वर्गीकरण स्वाध्याय Swadhyay Vanaspatinche Vargikarn Vanaspatinche Vargikarn Swadhyay Prashn Uttare
Admin

9 class science question answer Vanaspatinche Vargikarn | इयत्ता नववी सामान्य विज्ञान वनस्पतींचे वर्गीकरण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

 

प्रश्न 1. ‘अ’ ‘ब’ व ‘क’ या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा.

उत्तर :


‘अ’ स्तंभ

‘ब’ स्तंभ (उत्तरे)

‘क’ स्तंभ (उत्तरे )

थॅलोफायटा

या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात

शैवाल

ब्रायोफायटा

या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते.

मॉस

टेरिडोफायटा

पाणी व अन्न वहनासाठी ऊती असतात

नेचे

अनावृत्तबीजी

बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते

सायकस

आवृत्तबीजी

फळांच्या आत बिया तयार होतात

चिंच
















वनस्पतींचे वर्गीकरण  प्रश्न उत्तरे  वनस्पतींचे वर्गीकरण स्वाध्याय  Swadhyay Vanaspatinche Vargikarn   Vanaspatinche Vargikarn Swadhyay Prashn Uttare


प्रश्न 2. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा  व विधानांची कारणमीमांसा स्पष्ट करा.

(आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, बिजाणू, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, युग्मक)

 


अ. मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने...........या वनस्पतींचे असते.

उत्तर : मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतींचे असते.

            कारण थॅलोफायटा या विभागात शैवाल या वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. शैवाल ही वनस्पती जलीय असून तिचे शरीर तंतूंचे बनलेले असते. म्हणून थॅलोफायटा हे उत्तर बरोबर आहे.

 

आ. वनस्पतीसृष्टीचे उभयचर............. गटाला म्हटले जाते.

उत्तर : वनस्पतीसृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा गटाला म्हटले जाते.

            ब्रायोफायटा गटातील वनस्पती ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. म्हणून या वनस्पतींना उभयचर म्हटले जाते. म्हणून बायोफायटा हे उत्तर अचूक आहे.

 

इ. टेरीडोफायटा वनस्पतीमध्येअलैंगिक प्रजनन हे ......... निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे ............निर्मितीद्वारे होते.

उत्तर : टेरीडोफायटा वनस्पतीमध्येअलैंगिक प्रजनन हे बिजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.

            टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस बीजाणू तयार होतात. यांच्या सहाय्याने वनस्पती तयार होणार्या बीजाणूंद्धारे अलैंगिक प्रजनन करतात. ही पद्धत ज्या वेळी पाण्याची कमतरता असेल त्या वेळी वापरली जाते. परंतु सर्व परिस्थिती अनुकूल असेल तर वनस्पती लैंगिक प्रजनन युग्मके तयार करुन प्रजनन करतात.

 

ई. नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या  बीजाणूपत्रांवर येणारी ........... ही वनस्पती आहे.

उत्तर: नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या  बीजाणूपत्रांवर येणारी अनावृत्तबीजी ही वनस्पती आहे.

केवळ अनावृत्तबीजी वनस्पतींच्याच विभागात नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. त्यामुळे अनावृत्तबीजी हे उत्तर अचूक आहे.

 

Swadhyay Vanaspatinche Vargikarn | Vanaspatinche Vargikarn Swadhyay Prashn Uttare 


प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

 

अ. बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर :

1. ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात.

2.बीजपत्री वनस्पतींमध्ये सर्व शरीररचना दिसून येतात. जसे मूळ, खोड, पाने इत्यादी.

3. या वनस्पती बहुवार्षिक, द्विवार्षिक किंवा वार्षिक असतात.

4. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो.

5. बिया रुजतांना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो.

6. बिया फळांमध्येझाकलेल्या नसणे किंवा असणे ह्या वैशिष्ट्यांवरून बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग केले आहेत.

 

आ.एकबीजपत्री व द्‌विबीजपत्रीमधील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

एकबीजपत्री

द्‌विबीजपत्री

1. प्रत्येक बीजात एकच बीजपत्र असते.

1. प्रत्येक बीजात दोन बीजपत्रे असतात.

2. वनस्पतींना तंतूमुळे असतात.

2. सोटमूळ हे ठळक आणि प्राथमिक असते.

3. वनस्पतीची खोडे नाजूक असतात.

3. बहुतेक वनस्पतीत खोड मजबूत आणि कठिण असते.

4. त्रिभागी फुल असते.

4. चर्तुभागी किंवा पंचभागी फूल असते.

5. उदा.: मका, केळी, गहू.

5. उदा.: सूर्यफुल, मोहरी , वाल.



इ. नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर :

1. नेचे म्हणजे फर्न्स. ही वनस्पती बागेमधील शोभिवंत झुडपांपैकी एक वनस्पती आहे.

2. नेचे वनस्पतील मूळ, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव असतात.

3. नेचे या वनस्पतीला फुले-फळे येत नाहीत. ही अपुष्प वनस्पती आहे.

4. नेचे वनस्पतील पानांच्या मागील बाजूस तयार होणार्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते.

5. हे अलैंगिक प्रजनन असते , लैंगिक प्रजनन हे युग्मके तयार करुन होते.

 

ई. स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा.

उत्तर :


9 class science question answer Vanaspatinche Vargikarn | इयत्ता नववी सामान्य विज्ञान वनस्पतींचे वर्गीकरण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

1. अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा गटातील स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे.

2. या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात. या वनस्पती फक्त पाण्यात जगू शकतात.

3. या वनस्पतींचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते. हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश-संश्लेषण करतात.

4. या बहुपेशीय शरीरात सर्पिल भासणारा हरित लवक असतो. याच्या मधोमध पायरेनॉईड या पिष्टमय पदार्थाच्या गुठळ्या असतात. त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते.

5. खंडीभवन पद्धतीने स्पायरोगायरा वाढतात.

 

उ. ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा

उत्तर :

1. ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते कारण त्या ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते.

2.या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात.

3. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते.

4.ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते. 5.या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.

6.पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात.

7. उदा. मॉस (फ्युनारिआ), मर्केंशिया, अॅन्थॉसिरॉस, रिक्सिया, इत्यादी

 


प्रश्न 4. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढून त्याविषयी  स्पष्टीकरण लिहा.

मर्केंशिया, फ्युनारिया, नेचे, स्पायरोगायरा.

उत्तर :


1.मर्केंशिया


Swadhyay Vanaspatinche Vargikarn   Vanaspatinche Vargikarn Swadhyay Prashn Uttare

1. ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते कारण त्या ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते.

2. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते.

3.ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते. 4.या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.

5.अनुकूल परिस्थितीत वृंत आणि त्यावरची संपुटिका दिसते. संपुटिकेतून बीजाणूनिर्मिती होते. त्यामुळे मर्केंशिया अलैंगिक प्रजनन करु शकते.


 

2.फ्युनारिया



1. ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते .

2. फ्युनारिया या वनस्पतीला मॉस असे देखील म्हटले जाते.

3. ही वनस्पती उभयचर आहे.  

4. या वनस्पती ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते.

3.ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते. 4.या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.

5.अनुकूल परिस्थितीत वृंत आणि त्यावरची संपुटिका दिसते. संपुटिकेतून बीजाणूनिर्मिती होते. त्यामुळे फ्युनारिया अलैंगिक प्रजनन करु शकते. याशिवाय यांच्या लैंगिक प्रजनन देखील होते.


वनस्पतींचे वर्गीकरण  इयत्ता नववी स्वाध्याय pdf | इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय


3.नेचे


Vanaspatinche Vargikarn Vanaspatinche Vargikarn Swadhyay Prashn Uttare



1. नेचे म्हणजे फर्न्स. ही वनस्पती बागेमधील शोभिवंत झुडपांपैकी एक वनस्पती आहे.

2. नेचे वनस्पतील मूळ, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव असतात.

3. नेचे या वनस्पतीला फुले-फळे येत नाहीत. ही अपुष्प वनस्पती आहे.

4. नेचे वनस्पतील पानांच्या मागील बाजूस तयार होणार्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते.

5. हे अलैंगिक प्रजनन असते , लैंगिक प्रजनन हे युग्मके तयार करुन होते.

 

4.स्पायरोगायरा.


वनस्पतींचे वर्गीकरण  प्रश्न उत्तरे वनस्पतींचे वर्गीकरण स्वाध्याय


1. अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा गटातील स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे.

2. या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात. या वनस्पती फक्त पाण्यात जगू शकतात.

3. या वनस्पतींचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते. हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश-संश्लेषण करतात.

4. या बहुपेशीय शरीरात सर्पिल भासणारा हरित लवक असतो. याच्या मधोमध पायरेनॉईड या पिष्टमय पदार्थाच्या गुठळ्या असतात. त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते.

5. खंडीभवन पद्धतीने स्पायरोगायरा वाढतात.

 


प्रश्न 5. परिसरात उपलब्ध असणारी एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मूळासहित उपलब्ध करून  दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा.

उत्तर :

1) एकबीजपत्री वनस्पती कांदा

शास्त्रीय नाव : Allium cepa

मूळ : तंतुमय मुळे

खोड : भूमिगत, कंदाच्या स्वरूपात

पाने : पोकळ नलिकेसमान, पात्यासारखी एकबीजपत्री वनस्पती कांदा

फुले : पूर्ण व द्विलिंगी, निदलपुंज व दलपुंज दोन्ही एकाच परिदलपुंज या स्वरूपात. प्रत्येकी तीन याप्रमाणे दोन थरांत त्यांची रचना दिसून येते.

पुंकेसर (पुमंग) : परिदलपुंजावर चिकटलेले एकूण सहा पुंकेसर असतात.

स्त्रीकेसर (जायांग) : त्रिभागी, अंडाशय वरच्या पातळीवर कांद्याचे रोप छोटे असून त्याचा कंद भूमिगत असतो.

 

2) द्विबीजपत्री वनस्पती- जास्वंद

 

शास्त्रीय नाव : Habiscus rosasinensis

मूळ : ठळक, प्राथमिक मूळ सोटमूळ

पाने : साधी, जाळीदार, शिराविन्यास असलेली पाने द्विबीजपत्री वनस्पती- जास्वंद

निदलपुंज : पाच हिरव्या रंगाच्या निदलांचा एकमेकांना बद्ध असलेला निदलपुंज

दलपुंज : पाच लाल रंगाच्या सुट्या पाकळ्यांचा दलपुंज द्विबीजपत्री वनस्पती- जास्वंद

पुंकेसर (पुमंग) : पुंकेसर, परागकोश आणि वृंत यांचा बनलेला आहे. अनेक पुंकेसर एकत्र येऊन परागनलिका तयार होते. वृक्काच्या आकाराचे परागकोश वृतांच्या टोकावर दिसतात.

स्त्रीकेसर (जायांग) : कुक्षी, कुक्षीवंत आणि अंडाशयापासून स्त्रीकेसर बनलेला असतो. एकूण 5 स्त्रीकेसर दिसून येतात.

 


प्रश्न 6. वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा  विचार केला जातो? ते सकारण लिहा.

उत्तर :

1) वनस्पतींच्या दोन उपसृष्टी आहेत. जर वनस्पतीला फुले, फळे व बिया येत नसतील तर ती अबीजपत्री वनस्पती असते. जर फुले, फळे व बिया येत असतील तर ती बीजपत्री वनस्पती असते.

2) वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते. अवयव नसल्यास ती थॅलोफायटा विभागात येते.

3) पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्था आहेत किंवा नाहीत हे पाहिले जाते. जर त्या वनस्पतीत स्वतंत्र वहन ऊती असतील तर ती वनस्पती टेरिडोफायटा विभागात समाविष्ट केली जाते. जर स्वतंत्र वहन ऊती नसतील तर मूलाभ आणि पानांसारखे अवयव असतील तर त्या वनस्पतीचा समावेश ब्रायोफायटा विभागात केला जातो .

4) जर बीवर फळाचे आवरण असेल तर ती आवृत्तबीजी वनस्पती होते. जर बीवर फळाचे आवरण नसेल तर ती अनावृतबीजी वनस्पती ठरते.

5) जर वनस्पतीमध्ये बी धारण करण्याची क्षमता नसेल तर तिचा टेरिडोफायटा विभागात समावेश केला जातो पण बी येत असेल तर ती बीजपत्री ठरते.

6) बीजपत्रांच्या संख्येवरून आवृत्तबीजी वनस्पतींचे दोन गट वेगळे केले जातात. बीजांमध्ये जर एकच बीजपत्र असेल तर ती एकबीजपत्री आणि दोन बीजपत्रे असतील तर ती द्विबीजपत्री ठरते.


*********

Post a Comment