13] Information about Zebra in Marathi | झेब्रा संपूर्ण माहिती
मराठी
नाव : झेब्रा
हिंदी
नाव : जैब्रा
इंग्रजी
नाव : ZEBRA
झेब्रा
हा जंगलात राहणारा प्राणी आहे. हा प्राणी घोड्याच्या जातीतील आहे. हा प्राणी अगदी
निरुपद्रवी आहे.
झेब्रा प्राण्याचे वर्णन :
झेब्र्याला चार पाय असतात. त्यांच्या अंगावर उभे काळे- पांढरे पट्टे
असतात. झेब्र्याचे कान छोटे असतात; पण ते सतत उभे असतात. झेब्र्याला एक शेपटी असते.
त्याच्या डोक्यापासून ते जवळ- जवळ पाठीवरील खांद्यापर्यंत आयाळ असते. त्याच्या
आयाळातील ' केस ताठ व आखूड असतात.
झेब्रा प्राण्याचे अन्न :
हा प्राणी गवत, झाडाचा पाला, फळे इ. खातो. हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे.
झेब्रा प्राण्याची इतर माहिती :
झेब्रा प्राण्याला फक्त वाघ आणि सिंह यांच्याकडूनच धोका असतो. झेब्रा
या प्राण्याचा स्वभाव भित्रा आहे. झेब्रा हा प्राणी एकटा न राहता वीस-पंचवीसच्या
संख्येने एकत्र राहतो. जंगलात उंच-उंच गवत असेल त्या भागातच झेब्रा हा प्राणी
राहतो. या प्राण्याला मिळालेले आणखी वरदान म्हणजे तो ताशी सत्तर ते पंचाहत्तर
किमी. वेगाने पळू शकतो. त्याच्या जोरावरच तो वाघ-सिंह यांचा हल्ला परतवून लावू
शकतो.
थोड्या-फार प्रमाणात झेब्र्याचा उपयोग सामान वाहून नेण्यासाठी केला जातो. हा प्राणी आफ्रिका खंडात जास्त प्रमाणात आढळून येतो. झेब्रा चरण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडतो.