15] Information about Rhinoceros in Marathi | गेंडा संपूर्ण माहिती
मराठी
नाव : गेंडा
हिंदी
नाव : गैंडा
इंग्रजी
नाव : RHINOCEROS
जंगलात अनेक प्राणी आढळतात. त्यांपैकी गैंडा हा प्राणी सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा असतो.
गेंडा प्राण्याचे वर्णन :
गेंडा
या प्राण्याला चार छोटे पाय असतात. याचा रंग मातकट असतो. त्याचे पोट अनेकदा
जमिनीवर टेकत असते. गेंड्याच्या नाकावर सुमारे एक फूट लांब शिंग असते. गेंड्याची
कातडी जाड-टणक असते.
गेंडा प्राण्याचे अन्न:
हा प्राणी झाडाचा पाला, तसेच चारा व गवत पण खातो.
गेंडा प्राण्याचे इतर वर्णन :
गेंडा हा प्राणी दिसायला ओबडधोबड असतो; परंतु त्याची कातडी मऊ व तुकतुकीत असते. काही
गेंड्यांच्या नाकावर एकापेक्षा जास्त शिंगे असू शकतात. शिंगांचा उपयोग गेंडा
संरक्षणासाठी करतो.
गेंडा प्राण्याची इतर माहिती :
गेंडा हा प्राणी अंगाने अवाढव्य असल्यामुळे त्याची चाल पण धीमी असते.
हा प्राणी बुद्धीने मंद; परंतु स्वभावाने रागीट असतो. गेंड्याची कातडी जाड असली तरी उन्हाचे
चटके त्याला सहन होत नाहीत म्हणून हा प्राणी पाणथळ व दलदलीच्या जागेजवळच आढळतो. गेंड्याची
श्रवणशक्ती फार तीक्ष्ण असते. त्यामुळे शत्रूची चाहूल लागली तर तो झाडाझुडपात
किंवा उंच गवतात जाऊन लपून बसतो. गेंड्याचे आयुष्यमान १०० वर्षांपर्यंत असते.
गेंड्यांची मादी एकावेळी एकाच पिलाला जन्म देते. नाकावर शिंग असल्यामुळे हा प्राणी
आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ चाल करून जातो.
गेंडा हा प्राणी भारतात काझीरंगा अभयारण्य (आसाम) तसेच मेघालय, मणिपूर, बांगलादेश, बिहार इ. प्रांतांत आढळून येतो. गेंड्याच्या कातडीच्या अनेक वस्तू बनवितात. शिकारीमुळे गेंडा या प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे.
✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒