1] Information about Lion in Marathi | सिंहाची संपूर्ण माहिती
मराठी नाव : सिंह
हिंदी नाव : शेर
इंग्रजी नाव : LION
अनेक जंगली प्राणी आहेत; त्यांतील एक प्राणी म्हणजे सिंह होय. सिंहाच्या एका
डरकाळीच्या प्रचंड आवाजाने जंगल दणाणून जाते.
सिंहाचे वर्णन :
सिंहाला चार पाय, दोन डोळे, दोन कान आणि एक शेपटी असते. सिंहाचे अंग पिवळसर, मजबूत, पीळदार आणि तुकतुकीत असते. सिंहाचे
डोळे लालसर आणि चमकदार असतात. सिंहाचे दात करवतीसारखे असतात. सिंहाच्या पायाला पंजे
म्हणतात. पंजाला धारदार नखे असतात.
सिंहाचे अन्न :
सिंह हा प्राणी पूर्णपणे मांसाहारी
आहे. शेळी, बकरी, छोटे प्राणी यांचे मांस हे सिंहाचे अन्न होय.
सिंहाची वैशिष्ट्ये :
सिंहाला मानेभोवती आयाळ असते. सिंहाचे
शरीर लांब असते. त्यामुळे तो लांबवर उडी (झेप) मारू शकतो. सिंहाने आपल्या जबड्यात
एखादा प्राणी पकडला तर तो प्राणी कितीही धडपड केली तरी सुटत नाही. सिंहाची लांबी
जास्तीत जास्त ११ फूट ५ इंच असू शकते.
सिंहाची इतर माहिती :
सिंहाचा पंजा हा वजनदार असतो. पंजाची नखे
चार-पाच इंच लांबीची असतात. सिंहाचे दात इतके बळकट असतात की भली मोठी शेळी, बकरी दातात धरून कुंपणावरून तो
उडी मारू शकतो. हा प्राणी रुबाबदार दिसतो. त्याची चाल ऐटबाज असते. तो चालताना
जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा त्यात एक मोठा आत्मविश्वास दिसतो, त्यालाच 'सिंहावलोकन' म्हणतात. सिंहाचे वजन किमान ४००
ते ५०० पौंड च्या दरम्यान असते.
सिंह हा प्राणी जंगलाचा राजा म्हणून
ओळखला जातो. सिंहाची राणी सिंहीणसुद्धा रुबाबदार दिसते, ती ताकदवान असते. तिची अंगकांती
चमकदार असते. सिंहाला आयाळ असते, सिंहिणीला आयाळ नसते.
सिंहिणीला एका वेळी तीन-चार पिले होतात; त्यांना 'छावे' असे म्हणतात. सिंहीण आपल्या
छाव्यांचे पालनपोषण करते, त्यांना शिकार कशी करायची, तिचा पाठलाग कसा करायचा, हे शिकवते, सिंहाचे छावे हे साहसी, पराक्रमी, धाडसी व निर्भय असतात.
सिंह इतर प्राण्यांनी मारलेली शिकार
कधीच खात नाही. सिंह आपली शिकार आपणच करतो. जंगलच्या या राजा-राणीचे वागणेसुद्धा
रुबाबदार व राजेशाही थाटाचे असते. हा प्राणी आपणहून कुणालाही त्रास देत नाही. हा
प्राणी शत्रूशी समोरासमोर सामना करतो.
सिंह हा आपल्या भारत देशाचे भूषण आहे. देवीचे वाहन म्हणून तो पूजनीय आहे. सिंह हा प्राणी कळपाने राहतो. एकेका कळपात ८ ते १० सिंह-सिंहिणी राहतात. सिंह हा प्राणी डरकाळी फोडतो त्या वेळी १-२ वेळा घशातून गुरगुरल्यासारखा आवाज काढतो. गुजरात राज्यातील गीरचे जंगल सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात सिंहाची संख्या घटत आहे.