कवठ फळाची माहिती मराठी | Wood Apple Information in Marathi
कवठ हे निसर्गात अनेक मोठ्या झाडांपैकी एक झाड आहे.
कवठ झाडाचे वर्णन :
कवठ
हे झाड ४० ते ५० फूट इतके उंच वाढते.
पानांचा रंग पांढरट हिरवागार असतो. या झाडाला टोकदार काटे असतात. कवठ या फळाचे
आवरण खूप कठीण असते. कवठाची झाडे सर्व देशांत आढळतात.
Wood Apple Information in Marathi Esay Wood Apple information in marathi pdf Wood Apple Information कवठ फळाची संपूर्ण माहिती
कवठ फळझाडांची लागवड :
कवठाचे
झाड मध्यम कोरडे तसेच कोरड्या हवामानात पण वाढू शकते. कवठाच्या स्वतंत्र बागा
नसतात. कवठ हे क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा चांगले वाढते. या झाडांच्या बिया
पेरल्यापासून रोपे उगवण्यासाठी सुमारे १८ ते २० दिवसांचा कालावधी लागतो, या झाडाची वाढ हळूहळू होते. या झाडाची लागवड केल्यानंतर ६-७ वर्षांनी फळे
येतात, तर कलम केलेल्या झाडांना ३ वर्षांनी फळ येते. या
झाडाचे फूल पांढरे व सुवासिक असते.
कवठाची फळे :
दसऱ्यापासून
पाडव्यापर्यंत कवठाच्या फळांचा हंगाम चालू राहतो. एका झाडाला १५० ते २०० फळे
येतात. कवठ हे फळ गोलाकार व कठीण कवचाचे असते. फळात पिवळसर बदामी गर असतो. त्यात बिया
रुतून बसलेल्या असतात.
कवठ फळाचे औषधी उपयोग :
कवठ हे औषधी फळ आहे. कच्च्या कवठाचा उपयोग अतिसार व जुलाब कमी होण्यासाठी होतो. गर वाळवून त्यात मध मिसळूनही देतात. पिकलेल्या कवठाचे चूर्ण अजीर्णावर वापरतात. कवठाचा पाला व फळ हे पित्तशामक असते. गोम, गांधील- माशी किंवा विंचू चावल्यास त्यावर कवठाचा गर लावल्यास वेदना कमी होतात. कवठाच्या पानांपासून तयार केले जाणारे तेल हे औषधी असते.
कवठ झाडाची इतर माहिती :
कवठाच्या झाडापासून डिंक मिळतो. या झाडाच्या पाने व बियांपासून सुगंधी द्रव्ये तयार करतात. या झाडाचे लाकूड टणक व कठीण असते; याचा उपयोग इमारती व शेतीची अवजारे इ. बनवण्यासाठी केला जातो, तसेच जळण म्हणून होतो. पूर्ण पिकलेल्या फळांतील बी लगेच पेरणीसाठी वापरतात. जास्त जुने बी लागवडीयोग्य राहत नाही. या झाडाची लागवड योग्य प्रकारे केली तर याच्या फळांचा उपयोग विक्रीसाठी करता येतो. कमी खर्चात अधिक लाभ देणारे कवठ हे झाड आहे.
कवठ या फळाविषयी माहिती. कवठ झाडाची माहिती मराठी Kavath zadachi Mahiti
*********