पपई फळाची माहिती मराठी | Papaya Fruit Information in Marathi

Papaya Information in Marathi Esay Papaya information in marathi pdf Papaya Fruit Information Fruit Information in Marathi पपई फळाची संपूर्ण माहिती. प
Admin

 पपई ची संपूर्ण  माहिती मराठी | Papai Information in Marathi

            आपल्या परिसरात आढळणारे आणखी एक फळझाड म्हणजे पपई होय. पपई हे फळ सर्वांनाच आवडते.


पपई या फळाविषयी माहिती. | पपई झाडाची माहिती मराठी | पपई च्या झाडाची माहिती

 पपईच्या झाडाचे  वर्णन :

                पपईचे झाड हे साधारणपणे आठ ते दहा फुट इतके उंच असते. पपई च्या झाडाचे  याचे खोड सरळ वाढते. खोडाचा रंग पिवळट पांढरा असतो. हे झाड भरभर वाढते, पपई च्या झाडाची पाने हिरव्या रंगाची असून छत्रीसारखी चारी बाजूला पसरलेली असतात, पानांना लांब देठ असते. हे देठ पिवळट पांढऱ्या रंगाचे असते. झाडाच्या खोडाच्या वरच्या बाजूला फळे लागतात, पपई हे फळ कच्चे असताना हिरव्या रंगाचे असते आणि पिकल्यावर या फळाचा रंग पिवळा होतो. पपई च्या फळाचा आतील गार पिवळसर नारिंगी रंगाचा असतो. या फळाच्या आतमध्ये खूप बिया असतात, या बियांचा  रंग काळा असतो.


Papaya Information in Marathi Esay | Papaya information in marathi pdf | Papaya Fruit Information

पपईच्या झाडाचे वैशिष्ट्य :

            पपईच्या झाडांना फांद्या नसतात. खोडालाच लांब देठ असलेली पाने येतात. या पानांच्या कडेने नक्षी असते.


पपई फळाचे औषधी उपयोग :

        पपई खाल्ल्याने अन्नपचन चांगल्या प्रकारे होते. पपई हे फळ पित्तनाशक म्हणून उपयुक्त आहे. त्वचेचे रोग, गजकर्ण यांवर कच्चा पपई चा चिक उपयोगी ठरतो. खोकला, पोटाचे विकार, टी.बी. यांसारख्या विकारांवर पपई गुणकारी आहे. कच्च्या पपई ची भाजी खाल्ल्यास यकृताचे विकार बरे होतात.  पपईच्या सेवनाने शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते.


पपई फळाची इतर माहिती :

            पपई हे फळ अतिउष्ण आहे. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. कच्च्या पपई च्या फळाची भाजी करतात. पिकलेली पपई चवीला गोड, रुचकर असते, बहुतेक शेतकरी पपईच्या बागा करतात. पपईला बाजारपेठेत भरपूर मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले अर्थार्जन होते. हल्ली पपईची झाडे दारातसुद्धा लावली जातात.

 *********

Papaya Information in Marathi Esay
Papaya information in marathi pdf
Papaya Fruit Information
Fruit Information in Marathi
पपई फळाची संपूर्ण माहिती.
पपई झाडाविषयी माहिती
पपई या फळाविषयी माहिती.
पपई झाडाची माहिती मराठी
पपई च्या झाडाची माहिती
Papai zadachi Mahiti

Post a Comment