खजूर फळाची माहिती मराठी | Date Information in Marathi
आपल्या परिसरात आढळणाऱ्या झाडांपैकी खजूर हे फळझाड सुद्धा आपल्या परिसरात आढळते.
इंग्रजी नाव : Date
शास्त्रीय
नाव: Phono-enix
dactyli fer
हिंदी नाव:
खजुर
खजूर झाडाचे वर्णन :
खजुराचे
झाड हे थोडेफार नारळाच्या आणि सुपारीच्या झाडाशी मिळतेजुळते असते.खजुराचे झाड ६०
ते ७० फुट इतके उंच वाढते. याचे खोड सुपारीच्या झाडासारखे सरळ वाढते. सुपारीच्या
झाडाप्रमाणे या झाडाच्या शेंड्याला फक्त फांद्यांचा झुपका असतो. या झाडाच्या
खोडावर गळून गेलेल्या पानांमुळे खाचा तयार झालेलयास असतात.
Date Information in Marathi Esay | Date information in marathi pdf | Date Information
खजुराच्या झाडाचे खोड हे मऊ व पोकळ असते. या झाडाची पाने टणक व टोकाला अणकुचीदार असतात, ही पाने ३ ते ४ फूट लांब असतात, या झाडाला येणारी ओली फळे म्हणजे खजूर . खजुराची फळे वाळवल्या नंतर त्याला ‘खारीक’ असे म्हणतात . ज्याचा वापर आपण सुखा मेवा म्हणून करतो.
खजुराच्या झाडाची लागवड :
खजुराचे
झाड हे वालुकामय प्रदेशात वाढते. हा वृक्ष वालुकामय प्रदेशात वाढणारा असला तरी
ठराविक प्रदेशात व काही प्रमाणात पाणी दिल्यास तेथे चांगल्या प्रकारे वाढतो.
खजुराचे औषधी उपयोग :
- खजुराचा उपयोग आयुर्वेदात केला जातो.
- डोकेदुखी , पित्तनाशक, हिवताप, मुलांची सर्दी तसेच मूळव्याधीवर खजुराचा उपयोग होती.
खजुराचे इतर उपयोग :
उपवास असेल
तेव्हा खजूर वापरले जातात, तसेच तान्ह्या मुलांना बाळगुटी देताना
खारकेचा म्हणजेच सुकवलेल्या खजुरांचा उपयोग केला जातो. बाळंतीण बाईला खारकेची खीर
करून देतात. तसेच पौष्टिक फळ म्हणून खारीक व खजुराचा उपयोग करतात.
देवपूजेसाठीसुद्धा खारकेचा उपयोग केला जातो.
खजुराची इतर माहिती :
खजुराचे उत्पादन हे पश्चिम आशिया आणि भूमध्य सागरी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भारतात प्रामुख्याने हिलावी, जाहिदी , खुदाची इत्यादी जातीच्या खाजुरांची झाडे आढळतात.
*********