पेरू फळाची माहिती मराठी | Guava Information in Marathi

Guava Information Guava Information in Marathi पेरू झाडाविषयी माहिती पेरू या फळाविषयी माहिती.Peruchya zadachi Mahiti
Admin

पेरू फळाची संपूर्ण माहिती | Peru Falachi Mahiti

 

            पेरूचे झाड सर्वत्र आढळते. पेरू हे फळ लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत साऱ्यांनाच खायला आवडतात.

 

पेरू फळाच्या जाती :

पांढरा आणि तांबडा पेरू अशा याच्या दोन जाती आहेत.

पेरू झाडाची माहिती मराठी | पेरू च्या झाडाची माहिती | Peruchya zadachi Mahiti

पेरूच्या झाडाचे वर्णन :

पेरूचे  झाड उंचीने लहान असते. या झाडाचे  खोड एक वीतभर रुंद, पांढरट रंगाचे असते. या खोडाचे पापुद्रे निघून, ते आपोआप गळतात. पेरूची पाने हिरव्या रंगाची असून त्यावर शिरा असतात. ही पाने फांदीवर एका आड एक येतात. पानांना छोटेसे देठ असते.

पेरूच्या झाडाला पंढरी फुले येतात. पेरू हे फळ कच्चे असताना हिरव्या रंगाचे असते आणि पिकल्यावर या फळाचा रंग पिवळा होतो. पेरूच्या आतील गर पांढऱ्या किंवा गुलाबी लालसर रंगाचा असतो. पेरूची फळे गोड असतात. तर काही फळांना गोड चव नसते.


पेरूचे औषधी उपयोग :

अजीर्ण होणे व पोटदुखी यांवर पेरूचा उपयोग होतो. पेरूमध्ये 'बी' 'सी' व्हिटॅमिन्स् असतात. तोंडाचे चट्टे, दंतविकार, पेरूमुळे रक्त वाढण्यास मदत होते.


पेरू फळाचे वैशिष्ट्य :

पेरू या फळात अगदी बारीक पांढऱ्या बिया असतात. या बियांसहित व वरच्या सालीसहित हे फळ खाल्ले जाते.

पेरू फळाची इतर माहिती :

या झाडाचे खोड चिवट आणि बळकट असते. पेरूच्या झाडाला सतत पाणी द्यावे लागत नाही, पोपट पक्षाचे पेरू हे आवडते फळ आहे. पेरू दिसले की पोपटांचे थवेच्या थवे या झाडांकडे झेपावतात. पेरूची कोशिंबीर आणि वड्या पण करतात. पेरू खाणे माणसाला प्रकृतीच्या दृष्टीने उपयुक्त आहे.. ही झाडे लावल्या- पासून अडीच ते तीन वर्षांनी त्याला फळे येऊ लागतात. 

पेरू या  फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकरी पेरूच्या बागा तयार करून उत्पादन घेतात. तसेच दारासमोर अंगणात- सुद्धा ही झाडे लावतात.


Guava Information in Marathi Esay
Guava information in marathi pdf

पेरू झाडाची माहिती मराठी
पेरू च्या झाडाची माहिती
Peruchya zadachi Mahiti

Post a Comment