सुपारी फळाची माहिती मराठी | Areca nut Information in Marathi
सुपारी हे फळ कोकण किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणावर आढळते.
सुपारीच्या झाडाचे वर्णन :
सुपारीचे झाड हे सरळ उंच वाढते. सुपारीच्या झाडाला फांद्या नसतात, खोड सरळ वाढते. सुपारीच्या झाडाची ३० ते ३५ इतकी उंची असते. याच्या पानांना झावळ्या म्हणतात. झावळ्या फक्त शेंड्याला असतात. सुपारीची फळे ही खोडालाच लागतात. पोफळी किंवा सुपारी या नावाने देखील ओळखले जाते. सुपारीची फळे घडांनी लागतात. फळे कोवळी असताना हिरवी आणि पिकल्यावर केशरी रंगाची दिसतात. फळे पिकल्यावर वाळवून सोलतात. सोललेली सुपारी पांढरी असते व शिजल्यावर लालसर होते.
सुपारीचे प्रकार :
लाल सुपारी व पांढरी सुपारी असे सुपारीचे दोन प्रकार पडतात.
Areca nut information in marathi pdf \ Areca nut Information \ सुपारी फळाची संपूर्ण माहिती. \ सुपारी झाडाविषयी माहिती
सुपारीचे धार्मिक महत्त्व :
लग्न-
समारंभ , सत्यनारायण पूजा, होम-हवन, वास्तुशांती
वगैरे पूजेच्या वेळी गणपतीची प्रतिमा म्हणून लाल सुपारीची पूजा केली जाते. सवाष्ण
बायकांची ओटी भरताना सुपारीचा वापर करतात.
सुपारीचे इतर उपयोग :
सुपारीचा
उपयोग खाण्यासाठी, तसेच मसाला सुपारीसाठी करतात. कुटलेली
सुपारी पावडर (पूड) बाजारात विकत मिळते.
सुपारीच्या झाडाची इतर माहिती :
सुपारीची झाडे कोकण, गोवा, केरळ या ठिकाणी भरपूर प्रमाणात आढळतात.
सुपारीचे झाड चिवट असते. या झाडाच्या वाढीसाठी समुद्रकिनारपट्टीचे उष्ण व दमट आणि खारे हवामान आवश्यक असते. सुपारी शिजवताना वर येणारा तवंग चिकट असतो
या चिकट पदार्थाचा वापर होड्यांना वंगण केला जातो. होड्यांना हा तवंग बाहेरून लावला
जातो. त्यामुळे लाकडावर खाऱ्या पाण्याचा परिणाम होत नाही. समुद्रकिनारपट्टीवर
मोठ्या प्रमाणावर सुपारीच्या बागा तयार करून सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. आणि सुपारी
निर्यात केली जाते.
*********
सुपारी झाडाविषयी माहिती \ सुपारी या फळाविषयी माहिती. | सुपारी झाडाची माहिती मराठी | Supari zadachi Mahiti