डाळिंब फळाची संपूर्ण माहिती | Dalimb Falachi Mahiti
डाळिंब हे एक औषधी फळझाड आहे.
- डाळिंबाचे वर्णन
:
डाळींबाची
झाडे १२ ते १५ फुट इतकी उंच वाढतात. डाळिंबाच्या झाडाचे खोड हे धुरकट तांबड्या
रंगाचे असते. या झाडाच्या फांद्या काटेरी असतात. पाने हिरव्या रंगाची २ ते ३ इंच लांब असतात. या झाडाची फुले लाल
रंगाची असतात. डाळिंब हे फळ गोलाकार असते , फळाला वरून साल असते आणि आतमध्ये अनेक
पापुद्रे असतात त्यांमध्ये असंख्य दाणे असतात. या दाण्यांचा रंग लाल व गुलाबी
असतो.
- डाळींबाचे प्रकार
:
डाळिंबाचे
रसानुसार गोड, आंबट गोड आणि आंबट असे तीन प्रकार पडतात.
- डाळींबाच्या जाती
:
व्यवहारात डाळिंबाच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. पांढऱ्या दाण्याची मस्कती डाळिंबे व 'बेदाणा' जातीची काबुली डाळिंबे.
डाळिंब या फळाविषयी माहिती | डाळिंब झाडाची माहिती मराठी | Dalimb zadachi Mahiti
- डाळींबाचे औषधी
उपयोग :
डाळींबाची फुले
, फळे, मुळे आणि फळांवरील सालीचा उपयोग औषध म्हणून केला जातो. डाळींबाचे फळ हे रुचिवर्धक
आणि भूक वाढविणारे आहे. लहान मुलांना अतिसार झाल्यास डाळींबाच्या झाडाच्या कोवळ्या
फुलाचे चूर्ण शेळीच्या दुधात द्यावे. उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि शक्ती
वाढविण्यासाठी डाळींबाचा रस उपयुक्त ठरतो. खोकल्यावर उपाय म्हणून डाळींबाचा रस उपयुक्त
ठरतो. डाळींबाच्या सालीचे चूर्ण कफनाशक आहे. दम्याच्या त्रासावर डाळिंब हे फल
उपयुक्त आहे. नाकातून रक्तस्राव होत असल्यास सालीचे चूर्ण उपयोगी पडते.
डाळिंबाच्या रसात खडीसाखर घालून प्यायल्याने पित्त कमी होते. या झाडापासून दाडिमादि
चूर्ण,
दाडिमाद्यतेल, दाडिमाष्टक चूर्ण, दाडिमडिघृत, दाडिमावलेह ही आयुर्वेदिक औषधे बनविली
जातात.
************