Java Plum Marathi Information | जांभूळ फळाची संपूर्ण माहिती.
आपल्या
निसर्गात ऋतुमानानुसार फळांचे उत्पादन होत असते. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी
करणारे एक फळ म्हणजे जांभूळ होय.
- जांभळाचे वर्णन
:
जांभळाचे झाड सुमारे ६० ते ७० फुट उंचीपर्यंत वाढते. या झाडाचे खोड खूप मोठे, पांढरट रंगाचे असते. झाड मोठे झाल्यावर सालीवर काळे ठिपके दिसू लागतात. झाडाची पाने ४ ते ६ इंच लांबीची आणि १ ते २ इंच जाडीची असतात. पानांचा आकार लंबगोल, टोकदार असतो. पानांवर शिरा असतात. जांभूळ हे फळ लांबट असते तर काही जातीची जांभळे हे गोलाकार असतात. जांभळाच्या झाडांना पांढऱ्या रंगाची फुले येतात. कच्ची फळे हिरवी व पिकल्यानंतर जांभळट काळ्या रंगाची दिसतात. या फळांची चव गोड असते.
जांभूळ झाडाविषयी माहिती \ जांभळ झाडाची माहिती मराठी \ Jambhul falachi Mahiti
- जांभूळ औषधी
उपयोग :
जांभळाचे
विविध औषधी उपयोग आहेत. ज्या लोकांना गॅसेसचा त्रास होत असेल त्यांनी जांभळाला मीठ
लावून खावे. कावीळ झाली असल्यास रोज सकाळी मीठ व जांभळे खावीत. झालेल्यांना रोज सकाळी मीठ
व जांभळे द्यावीत. दातदुखी, हिरड्या सुजणे, दात
कमजोर होणे, दात किडणे यावर जांभळाच्या झाडाच्या सालीचा काढा करून गुळण्या कराव्यात.
त्रास कमी होतो व मुखशुद्धी होते. जांभळाच्या बियांचे चूर्ण मधुमेहावर उपयोगी पडते.
खराब झालेल्या पाण्यात जांभळाच्या फांद्या टाकल्या तर पाणी स्वच्छ होते. जांभूळ हे
फळ पित्तशामक आहे.
विंचू चावल्यास जांभळाच्या पानांचा रस लावल्याने
सूज कमी होते, वेदनाही कमी होतात.