फणस फळाची माहिती मराठी | Jackfruit Information in Marathi

Jackfruit information in marathi pdf Jackfruit Information Fanasachya zadachi Mahiti फणस झाडाविषयी माहिती फणस या फळाविषयी माहिती.
Admin

Jackfruit Marathi Information | फणस फळाची संपूर्ण माहिती.


            फणसाची फळांना बाहेरून काटेरी आणि आत मधुर गरे असतात. फणस या झाडाच्या कापा फणस आणि बरका फणस अशा दोन जाती आहेत.

Jackfruit Information | Jackfruit Information in Marathi

  • फणसाच्या झाडाचे वर्णन :

महाराष्ट्रामध्ये कोकण आणि गोवा येथे फणसाची मोठ्या प्रमाणावर झाडे आढळतात. फणसाचे झाड साधारपणे ४० ते ५० फुट इतके उंच वाढते. फणसाच्या झाडाला अनेक फांद्या असतात. याची पाने हिरवी, जाड व लंबगोलाकार असतात.


Jackfruit Information in Marathi Esay Jackfruit information in marathi pdf Jackfruit Information Jackfruit Information in Marathi फणस झाडाविषयी माहिती फणस या फळाविषयी माहिती. फणस झाडाची माहिती मराठी फणसाच्या झाडाची माहिती Fanasachya zadachi Mahiti


फणसाच्या खोडालाच फळे येतात. या फळांचा आकार साधारणपणे दंडगोलाकार असतो. या फळांवरील असलेल्या काट्यांच्या आकारावरून जाणकार लोक तो फणस कोणत्या जातीचा आहे तसेच तो पूर्ण तयार झाला आहे की नाही  हे ओळखतात, काही फळे खूप मोठी म्हणजे वजनदार असतात. पौष महिन्यापासून ते अगदी जेष्ठ-आषाढ महिन्यापर्यंत फणसाच्या झाडाला फळे येतात.

फणस झाडाची माहिती मराठी | फणसाच्या झाडाची माहिती | Fanasachya zadachi Mahiti

  • इतर उपयोग :

            फणस पिकल्यावर तो फोडून आतील गरे खाण्यासाठी वापरतात. फणस पिकून मऊ झाल्यावर आतील गरे काढतात. या गऱ्यांपासून पोळ्या, गऱ्याचे वडे असे अनेक पदार्थ बनवतात. हिरव्या फणसाची भाजी करतात.  कच्च्या फणसाचे गरे बारीक चिरून, खोबऱ्याच्या तेलात तळून त्याला तिखट, मीठ लावतात. हे खाण्यास कुरकुरीत व चविष्ट लागतात. काही ठिकाणी तर फणसाच्या  गऱ्यांपासून आईस्क्रीम बनवतात.

    फणसाच्या गऱ्यामध्ये बी असते या बी ला आठळी म्हणतात. या आठळ्या भाजून तसेच मीठ घालून उकडून खातात किंवा आठळ्यांची भाजी करतात. फणसाचा बाहेरील काटेरी आवरण (चारखंड) गाई-म्हशींना खायला देतात; त्यामुळे त्या भरपूर प्रमाणात दूध देतात, फणसाच्या झाडाचे लाकूड टिकावू असते. याचा उपयोग घरे बांधण्यासाठी, फर्निचर, होड्या इ. तयार करण्यासाठी केला जातो. फणसाचे झाड उत्तम प्रकारे वाढण्यासाठी उष्ण व दमट हवामान तसेच तांबड्या मातीची आवश्यकता असते. त्यामुळे कोकण व गोवा या ठिकाणी फणसाची फळे मोठ्या प्रमाणावर येतात.

***********

Post a Comment