नारळ फळाची माहिती मराठी | Coconut Fruit Information in Marathi

नारळ या फळाविषयी माहिती. नारळ झाडाची माहिती मराठी नारळाच्या झाडाची माहिती Naral zadachi Mahiti Coconut information in marathi pdf Fruit Information
Admin

नारळ फळाची माहिती मराठी | Coconut Fruit Information in Marathi


नारळाचे झाड हे बहुतांश घराच्या समोर लावलेले आपल्याला पहायला मिळते. नारळ हा वृक्ष सर्वांना परिचित वृक्ष आहे. नारळ हे फळ सर्वांना आवडते.

नारळाच्या जाती : सिंगापुरी

Coconut Information in Marathi Esay  Coconut information in marathi pdf  Fruit Information in Marathi  नारळ फळाची संपूर्ण माहिती.  नारळ झाडाविषयी माहिती  नारळ या फळाविषयी माहिती.  नारळ झाडाची माहिती मराठी  नारळाच्या झाडाची माहिती  Naral zadachi Mahiti


  • नारळाच्या झाडाचे वर्णन :

नारळाची झाडे सर्वसाधारणपणे ५० ते ६० फूट इतकी उंच वाढतात. नारळाच्या जातीवर झाडाची उंची अवलंबून असते. सिंगापुरी जातीच्या नारळाचे झाड हे कमी उंचीचे असते; परंतु या झाडाला फलधारणा लवकर होते. काही नारळांच्या झाडांना फलधारणा होण्यासाठी किमान दहा दहा वर्षांचा कालावधी लागतो. हे झाड सरळ व उंच वाढते.

नारळाच्या झाडाच्या पानांना झावळ्या म्हणतात. पाने हिरव्या रंगाची असतात. एका लांब टणक दांड्याला दोन्ही बाजूंनी लांब लांब पात्या असतात. टणक दांड्याला हिरकूट असे म्हटले जाते.

नारळाच्या झाडाला सुरुवातीला बारीक फुले येतात त्यानंतर फलधारणा होते. ही फुले झुपक्यामध्ये येतात. यानंतर नारळ हे फळ तयार होते.  नारळाचे कोवळे फळ हे हिरवे असते. पूर्ण तयार झाल्यावर याचा रंग तपकिरी पांढरा होतो.

  • लागवड : 

            कोंब आलेल्या नारळाची लागवड केल्यास नवीन नारळाचे झाड तयार होते. नारळ वाढीसाठी रेताड जमीन, विषम हवामान आवश्यक असते. समुद्र किनारी विशेषतः महाराष्ट्रातील कोकणकिनारपट्टीवर नारळाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात.


  • नारळाच्या झाडाचे वैशिष्ट्य :

नारळाच्या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही. म्हणून या झाडाला 'कल्पवृक्ष' म्हणतात.


  • धार्मिक महत्त्व :

आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक मंगलकार्यात, प्रत्येक पूजेच्या वेळी तसेच कोणत्याही व्यक्तींचा सत्कार करताना, सवाष्ण बाईची ओटी भरताना नारळ हे फळ लागते.


  • औषधी उपयोग :

        नारळ या फळाचा औषधी फळ म्हणून देखील वापर केला जातो. हिरव्या नारळाचे ( शहाळ्याचे) पाणी आजारी माणसाला प्यायला दिल्याने ते शक्तिवर्धक म्हणून काम करते. नारळाचे पाणी पिऊन त्यावर खोबरे खाल्ल्याने पोटातील जंत, कृमी नष्ट होतात. नारळाच्या पाण्याचा पित्तशामक म्हणून देखील वापर केला जातो. तहान भागवण्यासाठी देखील नारळाच्या पाण्याचा वापर केला जातो.

नारळाच्या खोबऱ्यापासून  तेल काढले जाते या तेलाचा वापर केसांना लावण्यासाठी केला जातो , हे तेल केसांना लावल्याने केसांना चमक येते. त्वचारोगांवर उपचार म्हणून देखील नारळाचे तेल उपयोगी पडते.

नारळ फळाची संपूर्ण माहिती.

  • नारळाचे इतर उपयोग :

नारळाच्या ओल्या खोबऱ्यापासून करंज्या, नारळी भात, वड्या, मोदक इत्यादी खाद्यपदार्थ बनवतात. ओल्या खोबऱ्याची चटणी करतात. सुके खोबरे मसाल्यात वापरतात. नारळाचे दूध पौष्टिक असते. पोहे, उपीट, भाजी, आमटी यांमध्ये  सजावटीसाठी खोबऱ्याचा कीस वापरतात.

नारळ झाडाची माहिती मराठी | नारळाच्या झाडाची माहिती | Naral zadachi Mahiti

  • नारळाच्या झाडाची इतर माहिती :

            नारळाच्या झावळ्यांपासून केरसुण्या, तसेच त्याच्या झापाच्या पात्या चटईप्रमाणे विणून या झापांचा उपयोग मांडवावर किंवा घरांवर छत म्हणून होतो. खोडापासून पन्हाळे, नारळाच्या शेंडीपासून काथ्या तयार केला जातो; त्यांना सुंभ म्हणतात. नारळाच्या वरच्या टणक भागाला करवंटी म्हणतात. या करवंट्या स्वच्छ करून त्यापासून विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार केला जातात . समुद्रकिनारपट्टीच्या भागात नारळाचे उत्पादन जास्त प्रमाणात येते. समुद्राचे पाणी खारट असले तरीही नारळामध्ये गोड पाणी असते. एकाच ठिकाणी अनेक नारळांची झाडे लावलेल्या ठिकाणाला नारळाच्या बागा म्हणतात. बाजारपेठेत नारळाच्या झाडापासून तयार केलेल्या वस्तूंना भरपूर मागणी आहे.

 

People Also Ask | नारळ फळाबाबत सारखे विचारले जाणारे प्रश्न :


1.    नारळ खाण्याचे काय फायदे आहेत?

-नारळाचे खोबरे खाल्ल्याने केस रेशमी व मुलायम होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.


2.    नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे का म्हणतात?

-नारळ या झाडाच्या प्रत्येक अवयव उपयोगात येतो एकही भाग वाया जात नाही म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात.


3.    नारळाच्या झाडला दुसरे नाव काय आहे?

-नारळाच्या झाडला माड असेही म्हणतात.


4.    नारळ वाढण्यास किती वेळ लागतो?

-नारळाच्या झाडावर फळे लागण्यासाठी ८ ते १० वर्षे इतका कालावधी लागतो.


5.    केरळला नारळाची भूमी का म्हणतात?

-केरळ या शब्दाचा उगम ‘केरा’ म्हणजे नारळ आणि ‘आलम’ म्हणजे जमीन या शब्दापासून झाला आहे . म्हणून केरळला नारळाची भूमी म्हणतात.


6.    एक झाड किती नारळ उत्पन्न करू शकते?

-एक निरोगी नारळाचे झाड वर्षाला कमीत कमी ५० ते जास्तीत जास्त १५० नारळ देऊ शकते.

*********

 

Post a Comment