Chiku Marathi Information | चिकू फळाची संपूर्ण माहिती.
चिकू हे फळझाड मूळचे मेक्सिको मधील आहे. परंतु आत्ता भारतात देखील चिकूचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन घेतले जाते. चिकूच्या झाडाच्या कलकत्ता मोठी, पाला, द्वारापुडी, काळी पत्ती, छत्री अशा प्रकारच्या या चार ते पाच जाती आढळतात.
- चिकूच्या
झाडाचे वर्णन :
ही झाडे मोठी वाढत असून याचे खोड कळपट रंगाचे असते. चिकूच्या झाडाची पाने हिरवीगार असतात, या पानांचा आकार थोडासा लांबट असतो, आणि त्यांना छोटा देठ असतो. ही पाने टोकाला थोडीशी टोकदार असतात.
चिकूचे फळ हे
चॉकलेटी असते. ही फळे जातीनुसार गोलाकार व अंडाकृती लहान-मोठी असतात. आतील गर
तांबूस तपकिरी रंगाचा व चवीला गोड असतो. फळांमध्ये काळ्या रंगाचे मोठे बी असते.
काही फळांमध्ये एकापेक्षा अधिक म्हणजे दोन बिया असू शकतात.
चिकू या फळाविषयी माहिती. | चिकू झाडाची माहिती मराठी | Chiku zadachi Mahiti
- चिकूच्या
झाडाचे औषधी उपयोग :
चिकूचे
फळ खाल्ल्याने शक्ती येते. शरीरातील पित्ताचा त्रास कमी होतो. चिकूचे नेहमी सेवन
केल्याने बद्धकोष्ठता दूर होते. पित्तकारक
डोकेदुखी,
ताप, लघवीचा त्रास इत्यादीवर चिकू हे फळ उपयोगी पडते. एखाद्या आजारातून बरे
झाल्यावर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी चिकूचा ज्यूस देतात.
- चिकूच्या
झाडाची इतर माहिती :
चिकूचे झाड हे बारमाही फळझाड आहे. चिकू या
फळांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अ, ब व क जीवनसत्त्वे
मिळतात. चिकू ची झाडे घराशेजारी तसेच बागेमध्ये लावली जातात. चिकूच्या फळांची मागणी
बाजारात वाढत असल्याने शेतकरी पिक घेण्यासाठी चिकूच्या बागा तयार करतात.