केळी फळाची माहिती | Banana Information in Marathi
केळी हे आपल्या
सर्वांच्याच ओळखीचे आहे. केळे हे फळ सर्वांना आवडते.
केळी या
फळाच्या पुढील जाती आढळतात : सोनकेळी, राजेळी, वेलची इ. अशा केळीच्या पुष्कळ जाती आहेत.
- केळीच्या
झाडाचे वर्णन :
केळीच्या
झाडाचे खोड जाड असते. केळीच्या झाडाला फांद्या नसतात. केळीच्या खोडातूनच हिरवीगार
पाने उगवतात. पानांना मधोमध जाड शिरा असतात. पाने दोन्ही बाजूंनी पसरट व रुंद
असतात. केळीच्या खोडाला खुंट म्हणतात, ते हिरव्या रंगाचे
असतात. खोडाच्या वर फळे येतात.
केळीच्या झाडाच्या मुळाशी अनेक कोंब येतात. हे कोंब काढून दुसरीकडे लागवड केल्यावर केळीची नवीन रोपे तयार करतात. केळीच्या फुलांना केळफूल असे म्हटले जाते. हे फूल शंखाकृती असते. या फुलाच्या एकेक पाकळ्या गळून पडल्या की एकेक फळ लागून फणी दिसू लागते आणि केळ्याचा घड तयार होतो. एका घडावर शंभर ते दीडशे केळी असतात.
Banana Information in Marathi Esay | Banana information in marathi pdf
- केळ्याचे औषधी
उपयोग :
केळ हे फळ थंड
आहे. शरीरामध्ये उष्णता वाढल्यावर केळे खायला देतात. गोवर आला असता केळ हे फळ
उपयुक्त ठरते. यामध्ये अनेक क्षार असतात त्यांचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे
उपयोग होतो. पंडूरोग झाल्यास केळ खायला दिले जाते.
केळी झाडाची माहिती मराठी | केळी च्या झाडाची माहिती
- केळ्याचे इतर
उपयोग :
केळीच्या केळफुलांची भाजी आणि भजी केली जाते. कच्च्या केळ्यांची भाजी करतात. ताटा ऐवजी केळीच्या पानांचा उपयोग जेवणासाठी करतात. पूजेच्या वेळी नैवेद्य म्हणून केळ वापरतात. केळे हे फळ खाण्यासाठी, तसेच जेवणात केळी, दूध व साखर घालून तयार केलेले शिकरण पक्वान्न म्हणून वापरतात. पूजेच्या वेळी चौरंगाला केळीचे खुंट बांधून सुशोभित करतात. तसेच लग्न-समारंभ व इतर शुभकार्यांत केळीचे खुंट वापरले जातात.
- इतर माहिती :
कोकण, जळगांव , वसई, कर्नाटक, धुळे या भागांत केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.