चिमणी पक्षी माहिती मराठी | Sparrow information in marathi

Sparrow information in marathi for project, Sparrow information in marathi, चिमणी पक्षी निबंध, चिमणीची माहिती , चिमणी पक्षी मराठी माहिती Chimani Paksh
Admin

                Chimani Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत तसेच नाचण पक्ष्याची माहिती देखील या लेखाच्या माध्यामातून तुम्हांला मिळेल.  ही माहिती Sparrow information in marathi for project   यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग Sparrow information in marathi wikipidia  माहिती सविस्तर जाणून घेऊया.  तसेच चिमणी पक्षाची माहिती च्या खाली वटवट पक्षी (Ashy Priniya bird information in marathi )या पक्षाची देखील माहिती देण्यात आली आहे.


Sparrow information in marathi for project, Sparrow information in marathi, चिमणी पक्षी निबंध, चिमणीची माहिती , चिमणी पक्षी मराठी माहिती Chimani Paksh

 Information about sparrow in marathi | चिमणी बद्दल माहिती

हिंदी नाव :- गौरिया

इंग्रजी नाव :- Sparrow

            चिमणी हा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. चिमणी ही दिसायला एकदम छोटी असते. पंरतु चिमणी ही सर्वात मेहनती पक्षी आहे.


चिमणी चे वर्णन :-

                चिमणी या पक्षाला दोन पाय, दोन डोळे व एक चोच आणि दोन पंख असतात. नर व मादी यांच्या रंगसंगतीत थोडाफार फरक असतो. नर मादीपेक्षा थोडा मोठा व गुबगुबीत असतो. याची चोच जाड व काळसर रंगाची असते. पंख गडद, चॉकलेटी व  काळ्या-पांढऱ्या रंगाच्या पिसांनी बनलेले असतात.

    मादी चिमणी मातकट-तपकिरी रंगाची असते. वरून काळ्या व पिवळसर रंगाच्या रेघा असतात. पोटाकडील भाग पांढरट रंगाचा असतो. मादी चिमणीच्या पायांचा रंग गुलाबी असतो. पायाची बोटे थोडी लांबट असतात. डोळ्यांचा रंग काळा असतो. चिमणीची चोच थोडी गुलबट रंगाची असते.


चिमणी चे अन्न :- 

                चिमणी या पक्ष्याचे मुख्य अन्न दाणे (धान्य). गहू, ज्वारी, कधी लहान किटक, भाजीपाला व फुलांच्या कळ्याही खातात.


चिमणी चे घरटे :-

चिमणीचे घरटे इतके सुटसुटीत नसते. चिमण्या सुतळी, दोरा, कापूस, वाळलेले गवत, काड्या, कपड्यांचे लहान तुकडे, इतर पक्ष्यांची पिसे इत्यादी गोष्टींचा वापर करून घरटी बांधतात. यांची घरटी घराच्या छपरावर, भिंतीच्या छोट्याशा कपारीत, झुडपात तर कधी घराच्या खिडकीच्या कोपऱ्यात बांधलेली आढळतात.

नर व मादी हे दोघे मिळून घरटे बांधतात. पिलांची देखभालसुद्धा दोघे मिळून करतात. चिमणी एका वेळी साधारण ३/४ अंडी घालते.


चिमणी ची इतर माहिती :-

चिमणी मनुष्यवस्तीत घरटे बांधणे पसंत करते. चिमणी चिव चिव असा आवाज करते. ती नेहमी उड्या मारत चालते. चिमणी जातीत नर पक्ष्याला चिमणा असे म्हणतात. हे पक्षी जोडीने किंवा गटागटाने राहतात. तयार झालेल्या गव्हाच्या लोंब्या खाऊन हे पक्षी बरेच नुकसान करतात; परंतु पीकनाशक कीटक व अळ्या हे पक्षी खातात.संध्याकाळ झाली की चिमण्यांचे थवेच्या थवे आकाशातून आपल्या घरट्याकडे जाताना दिसतात; ते दृश्य अगदी मनमोहक दिसते. चिमणीचे आयुष्यमान किमान पाच वर्षे असते.


People Also Ask | चिमणी  बद्दल सारखे विचारले जाणारे प्रश्न :


१)चिमण्या कोणते अन्न धान्य खातात ?

गहू, मका, बाजरी, विविध प्रकारच्या बिया इत्यादी अन्न चिमण्या खातात.


२) चिमण्यांची गरज का आहे?

अन्न जाळे आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी चिमण्यांची गरज आहे.


३) चिमणी काय काय खाते?

चिमणी शाकाहारी ( गवत, फळांच्या बिया, फळे, गवत , फुलांच्या कळ्या) तसेच मांसाहारी (किडे ,कीटक) अन्न खाते.


४) चिमण्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत?

एकूण ४३ विविध प्रजातीच्या चिमण्या आढळतात.


**********

वटवट पक्षी माहिती मराठी | Ashy Priniya bird Information In Marathi

Vatvat Pkshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ही माहिती Ashy Priniya bird Information in Marathi in Short यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग वटवट पक्षी बद्दल माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Ashy Priniya bird Information in Marathi | वटवट पक्षी मराठी माहितीAshy Priniya bird information in marathi Wikipedia  Ashy Priniya bird information in marathi pdf

Ashy Priniya bird Information in Marathi | वटवट पक्षी मराठी माहिती

हिंदी नाव :- वटवट पक्षी

इंग्रजी नाव :- Ashy Priniya

 

आपल्या परिसरात चिमणीच्या आकाराचे अनेक प्रकारचे पक्षी असतात; त्यांपैकी एक पक्षी म्हणजे वटवट पक्षी होय.


वटवट पक्षी वर्णन :-

वटवट या पक्ष्याला दोन डोळे, दोन पाय व एक शेपटी असते. या पक्ष्याच्या पाठीचा रंग राखाडी असतो. खालचा भाग पांढरट असतो. या पक्ष्याच्या गळ्याचा खालील भाग थोडा पांढरट पिवळसर असतो.


वटवट पक्षाचे अन्न :-

जमिनीवरील लहान झुडपे व गवत यांमधील कीटक व त्यांची अंडी हे वटवट पक्ष्याचे प्रमुख अन्न होय.


वटवट पक्षाचे घरटे : 

वटवट पक्षी घरटी बांधण्यासाठी सुरक्षित जागा शोधतात त्यांचे घरटे सर्वसाधारणपणे जमिनीपासून एक-दीड मीटर उंच असते. गवत, झाडाची पाने, कापूस, फुलांच्या पाकळ्या यांच्या मदतीने हा पक्षी घरटे बांधतो. या पक्ष्याच्या घरट्याचा आकार नरसाळ्यासारखा असतो.


वटवट पक्षाचे वैशिष्ट्य :-

वटवट पक्ष्याच्या शेपटीची रचना वेगळीच असते. या पक्ष्याची शेपटी नेहमी थोडीशी वर उचललेली असते. त्याच्या टोकावरील पिसे पांढरट तांबूस रंगाची असतात.


वटवट पक्षाची इतर माहिती :-

भारतात सर्वसाधारणपणे हिमालयात गुजरातमध्ये या पक्ष्याचे वास्तव्य जास्त आढळते. महाराष्ट्रात 'हिवाळी पाहुणे' म्हणून या पक्ष्याला ओळखले जाते. जून ते नोव्हेंबर हा वटवट पक्ष्याच्या विणीचा हंगाम असतो; या काळात मादी वटवट पक्षी विटकरी रंगाची एक किंवा दोन अंडी एका वेळी घालते. वटवट पक्ष्याच्या पंखावरील पिसांचा रंग राखाडी असतो; परंतु थंडीच्या दिवसांत त्यांचा रंग तपकिरी होतो, या पक्ष्याचे जवळ जवळ पंधरा-वीस प्रकार आढळतात. हा पक्षी झाडाझुडपांत बसल्यावर सारखा आवाज काढतो, म्हणून त्याला वटवट  पक्षी असे म्हणतात.


*********


Post a Comment