मोर पक्षी माहिती मराठी | Peacock Information In Marathi

Mor Pkshi Mahiti Marathi, Peacock Information in Marathi, Rasahtriya Pakshi Mor Mahiti , मोर पक्षी माहिती मराठी, Majha Aavadta Pakshi Mor Mahiti, मोर
Admin

Mor Pkshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ही माहिती Peacock Information in Marathi For Project यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग Rasahtriya Pakshi Mor Mahiti  सविस्तर जाणून घेऊया.


Mor Pkshi Mahiti Marathi, Peacock Information in Marathi, Rasahtriya Pakshi Mor Mahiti , मोर पक्षी माहिती मराठी, Majha Aavadta Pakshi Mor Mahiti, मोर

Peacock Information in Marathi | मोर पक्षी मराठी माहिती

  • हिंदी नाव : मोर
  • इंग्रजी नाव : Peacock
  • शास्त्रीय नाव : Paro Cristatus

 

मोर हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी  आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच मोर हा पक्षी खूप आवडतो. मोर हा सुंदर आणि मनमोहक पक्षी आहे. मोर हा पक्षी जमिनीवरून चालू शकतो तसेच इतर पक्ष्यांप्रमाणे हवेत उडू शकतो.


Peacock Information In Marathi  In Short | Peacock Information In Marathi 10 Lines


मोराचे वर्णन :-

मोर हा पक्षी त्यांच्या पिसाऱ्यासह सहा ते सात फुट इतका लांब असतो. मोराची मान, गळा आणि छातीकडील भाग हा हिरवट-निळसर रंगाच्या पिसांनी झाकलेला असतो. याच्या डोक्यावर लहान पिसांचा तुरा असतो. मोराचे डोळे गोल व काळेभोर असतात. मोर ज्या पंखांच्या सहाय्याने उडतो ते पंख राखतट तपकिरी रंगाचे असतात.

हा पक्षी पिसाऱ्यासह सहा-सात फूट लांब असतो. याची मान, गळा व छाती हिरवट-निळसर रंगाची असते. डोक्यावर लहान पंखाचा सुंदर तुरा असतो. डोळे गोल व काळेभोर असतात. मोराचे उडणारे पंख राखट-तपकिरी रंगाचे असतात. त्याखाली पुन्हा विटकरी रंगाचे पंख असतात. त्याच्यामागे लांब पंखांचा सुंदर पिसारा असतो. या पिसाऱ्यात हिरव्या, निळ्या व सुवर्ण रंगाची शेकडो लांब पिसे असतात. याची चोच टोकदार असते. याचे पाय काळपट असतात. प्रत्येक पायांना चार नखे असतात. मोराला लांबचा आवाज ऐकू येतो.

मोर हा पक्षी मूळ भारतातील  असला तरीही तो बांग्लादेश , श्रीलंका या देशांत सुद्धा आढळतो. आफ्रिकेमध्ये पांढऱ्या रंगाचे मोर आढळतात. भारतातील प्राणीसंग्रहालायांमध्ये पांढरे मोर पाहायला मिळतात.

 

मोर पक्षाचे अन्न :

मोर धान्य, झुडपांचे कोवळे तुरे, किडे, सरडे, सापसुरळ्या, लहान लहान सापही खातो. मोर हा पक्षी सकाळी व संध्याकाळी अन्नशोधण्यासाठी बाहेर पडतो. मोर हा शाकाहारी तसेच मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचा पक्षी आहे.

 

मोराचे धार्मिक महत्त्व :-

भारतीय संस्कृतीत मोराला पवित्र स्थान आहे. भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोराचे पीस धारण केलेले दिसते. मोर हे देवी सरस्वतीचे वाहन आहे. मोर हा पक्षी पक्षी ऐश्वर्य-सौंदर्याचे प्रतीक आहे.

 

इतर माहिती :-

हा पक्षी एकटा किंवा चार-पाच जणांच्या थव्यांनी सदाहरित जंगलात दिसतो. खेड्यापाड्यांत शेतात, गवताळ प्रदेशात आढळतो. मोर हा पक्षी अनेक प्रकारचे आवाज काढतो. सकाळी व सायंकाळी मियाँऊऽ मियाँऊऽ, तर संकटात सापडल्यावर क्राँकऽ क्राँकऽऽ असे आवाज काढतो. याची दृष्टी व श्रवणशक्ती अगदी तीव्र असते.

आषाढ, महिन्यामध्ये आकाशात ढग दाटून आल्यावर मोर आपला पिसारा फुलवून थुईथुई नाचायला लागतो. मादी जातीतील मोराला लांडोर असे म्हटले जाते.  मोराची अंडी दुधी रंगाची असतात. मोराच्या पिसाचे पंखे बनवतात, तसेच घरात शोभेसाठी याची पिसे ठेवली जातात. पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

मोराचा मखमली पिसारा व त्याचा पाचूसारखा हिरवा रंग, त्याची उंच मान, डोक्यावर तुरा सर्व गोष्टींमुळे तो सुंदर दिसतो. मोराच्या याच रूपामुळेच त्याला राष्ट्रीय पक्ष्याचा मान मिळाला आहे. मोर या पक्षाचे आयुर्मान किमान तीस वर्षे इतके असते.

 

 

People Also Ask |मोराबद्दल सारखे विचारले जाणारे प्रश्न :

1)               मोर कुठे राहतात?

मोर हा पक्षी सदाहरित वनांमध्ये एकटा किंवा चार-पाच जणांच्या थव्यांनी आढळतो. खेडेगावांतील शेतात तसेच  गवताळ प्रदेशात आढळतो.

 

2)               मोर काय खातो ? मोराचे अन्न काय आहे ?

मोर धान्य, झुडपांचे कोवळे तुरे, किडे, सरडे, सापसुरळ्या, लहान लहान सापही खातो. मोर हा शाकाहारी तसेच मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचा पक्षी आहे.

 

3)               मोराला किती रंग असतात?

मोराचे एकूण १५ रंग ज्ञात आहेत. मोराचा मखमली पिसारा व त्याच्या पिसाऱ्या मध्ये सोनेरी, हिरवा, निळा, आकाशी, काळा, पांढरा  आणि अनेक प्रकारचे रंग असतात.


4)               मोर किती वर्षे जगतो ?

मोर किमान ३० वर्षे जगतो.


5)               भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे ?

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.



Majha Aavadta Pakshi Mor Mahiti | Mor Pakshi Chi Mahiti


*************

Post a Comment