पोपट पक्षी माहिती मराठी | Parrot Information In Marathi

Parrot information in marathi Wikipedia parrot information in marathi 10 lines Majha aavdata pkshi popat marathi nibandh Popat chi mahiti marathi
Admin

Popat Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत तसेच नाचण पक्ष्याची माहिती देखील या लेखाच्या माध्यामातून तुम्हांला मिळेल.  ही माहिती Parrot information in marathi in short  यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग पोपट पक्षी माहिती सविस्तर जाणून घेऊया.  तसेच पोपट पक्षाची माहिती च्या खाली नाचण या पक्षाची देखील माहिती देण्यात आली आहे.

 

Peacock Information in Marathi | मोर पक्षी मराठी माहिती


हिंदी नाव : तोता

इंग्रजी नाव : Parrot

 

    आपल्या परिसरामध्ये अनेक पक्षी आढतात. यांमधील पोपट हा सगळ्यांनाच आवडणारा पक्षी म्हणजे पोपट होय. काही लोक पोपटाला पाळीव पक्षी म्हणून आपल्या घरात ठेवतात.

 

पोपट पक्षाचे वर्णन : 

पोपट हा हिरवा व पोपटी रंगाचा असतो. पोपटाची चोच आखूड, जाड व लाल रंगाची असते. पोपटाच्या गळ्याभोवती काळ्या रंगाचा पट्टा असतो. पोपटाची शेपटी लांब टोकदार असते. पोपटाला दोन डोळे व दोन पाय असतात.

 

पोपट पक्षाचे अन्न :-

        पोपट हा पक्षी शेतातील पिकांचे दाणे तसेच फळबागांमधील फळे खातो. पाळीव पोपट शेंगदाणे, हरभऱ्याची भिजलेली डाळ , मिरची, डाळींबाचे दाणे इत्यादी घटक खातो. पोपटाला पेरू हे फळ अत्यंत प्रिय आहे.

 

पोपट पक्षाची इतर माहिती :-

        जंगलांमध्ये ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध असते अशा ठिकाणी हा पक्षी समूहामध्ये वावरताना दिसतो. पाळीव पोपट हा ज्या प्रमाणे माणूस त्याला शिकवतो त्या प्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो. पोपटाची नजर तीक्ष्ण असते आणि स्मरणशक्ती तीव्र असते. पोपट या पक्ष्याला पदार्थांचा स्वाध कळतो . पोपट हा पक्षी फळांच्या बिया जंगलामध्ये पसरवत असल्याने जंगलवाढीसाठी उपयुक्त अशी कामगिरी करतो. पोपट हा पक्षी दूर-दूर  भ्रमण करत असतो. जानेवारी ते मार्च हा पोपटांचा विणीचा हंगाम असतो. पोपटाची मादी घरट्यात एका वेळी पाच ते सहा अंडी घालते. नर-मादी दोघेही आळीपाळीने अंडी उबवितात.

 

People Also Ask |  पोपटा बद्दल सारखे विचारले जाणारे प्रश्न :


·       पोपट काय काय खातो ?

    पोपट हा पक्षी शाकाहारी असला तरीही काही क्वचित प्रसंगी हा पक्षी किडे देखील अन्न म्हणून खातो. लहान मोठी फळे हे त्याचे अन्न होय. पेरू हे त्याचे आवडते खाद्य आहे.


·       पोपट कुठे राहतो ?

    पोपट हा पक्षी झाडाच्या ढोलीत आपले घरटे बांधून राहतो.


·       पोपट भारतात कुठे आढळतात?

    पोपट भारतात सर्वत्र आढळतात . महाराष्ट्र , केरळ , मध्यप्रदेश .


·       पाळीव पोपट काय खातात ?

    पाळीव पोपट भिजवलेला हरभरा, मिरची, पेरू इत्यादी घटक खातात.


·       भारतीय पोपटांचे किती प्रकार आहेत?

    भारतात पोपटांच्या ११ प्रजाती आढळतात.


·       पोपट शाकाहारी आहेत कि मांसाहारी ?

    पोपट हे शाकाहारी अन्न खातात परंतु क्वचित किडे, कीटक देखील खातात.


·       पोपटांचे पंख किती मोठे असतात?

    पोपटांच्या विविध प्रजातींचे पंख वेगवेगळ्या लांबीचे असतात. त्यापैकी  काही प्रजातीचे पंख ही ४१ ते ४५ इंच इतके लांब असतात.

 

 *******************

नाचण पक्षी विषयी माहिती मराठी | Tailed fly catcher Information In Marathi


नाचण पक्षी मराठी माहिती  Tailed fly catcher information in marathi

Nachan Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ही माहिती Tailed fly catcher information in marathi in short  यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग नाचण     पक्ष्याची माहिती  सविस्तर जाणून घेऊया.


Tailed fly catcher information in marathi pdf | नाचण पक्षी मराठी माहिती

मराठी नाव :- नाचण

इंग्रजी नाव :- फॅन टेलइ फ्लाय कॅचर | Fan Taled Flay Catcher


        आपल्या आजूबाजूच्या परिसरात विविध पक्षी आढळतात. त्यांपैकी एक पक्षी म्हणजे नाचण होय.


नाचण पक्षाचे वर्णन :-

नाचण हा पक्षी सर्वसाधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. या पक्ष्याचा रंग काळपट तपकिरी असतो. याच्या भुवयांचा रंग पंधरा असतो. याच्या भुवया जाड असतात. या पक्षाच्या छातीवर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. पोटाकडील भाग पांढरट असतो.


 नाचण पक्षाचे वैशिष्ट्य :-

नाचण या पक्षाच्या शेपटीचा आकार हा जपानी पंख्यासारखा असतो. हे या पक्षाचे खास वैशिष्ट्य आहे.


 नाचण पक्षाचे अन्न :-

कीटक, डास, माश्या, चिलटे असे उडणारे कीटक हे नाचण पक्ष्याचे मुख्य अन्न आहे.


नाचण पक्षाचे घरटे :-

नाचण या पक्ष्याचे घरटे सर्वसाधारणपणे जमिनीपासून दोन-तीन मीटर उंचीवर असते. या पक्ष्याच्या घरट्याचा आकार उभ्या  पेल्यासारखा असतो, हा पक्षी घरट्याला आतून व बाहेरून कोळ्याचे जाळे आणून त्याचा गिलावा करतो.


नाचण पक्षाची इतर माहिती :-

झाडे असलेला प्रदेश, उद्याने व पानगळतीची जंगले या ठिकाणी नाचण या पक्ष्याची घरटी आढळतात. या पक्ष्याच्या नर-मादीमध्ये फारसा फरक नसतो. हे पक्षी जोडीने राहतात. फेब्रुवारी ते जुलै या महिन्यांचा काळ हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. नाचण पक्षाच्या अंड्याचा आकार बोराएवढा व रंग पिवळा असतो. त्यावर गुलाबी रंगाचे ठिपके असतात. हे पक्षी झाडाच्या फांदयांमधून इकडून तिकडे उड्या मारतात, त्यामुळे या पक्ष्यांना 'नाचण पक्षी' म्हणून ओळखतात.

**************

पोपट पक्षी मराठी माहिती | पोपट माहिती मराठी | पोपटाची माहिती
 

Post a Comment