घार पक्षी माहिती मराठी | Pariah information in marathi

Pariah information in marathi , घारीची माहिती , घार पक्षी मराठी माहिती, Tree Pie Bird Information in Marathi | टकाचोर पक्षी मराठी माहिती, Takachor
Admin

    Ghar Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत तसेच नाचण पक्ष्याची माहिती देखील या लेखाच्या माध्यामातून तुम्हांला मिळेल.  ही माहिती Pariah information in marathi for project   यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग Pariah information in marathi wikipidia  माहिती सविस्तर जाणून घेऊया.  तसेच घार पक्षाची माहिती च्या खाली टकाचोर पक्षी (Tree Pie information in marathi ) या पक्षाची देखील माहिती देण्यात आली आहे.

Pariah information in marathi , घारीची माहिती , घार पक्षी मराठी माहिती, Tree Pie Bird Information in Marathi | टकाचोर पक्षी मराठी माहिती, Takachor

Information About Grey Heron marathi | घार माहिती


हिंदी नाव :- कनकव्वा / छील

इंग्रजी नाव :- Pariah

शास्त्रीय नाव :- Milvus migrans


        घार हा पक्षी भारतात सर्वत्र आढळणारा सर्वपरिचित असा पक्षी म्हणजे घार.

जाती :- घार या पक्षाच्या नागरी व कापशी घार या दोन जाती आहेत.


घार पक्षी वर्णन :-

            या पक्ष्याला दोन पाय, दोन डोळे, एक चोच असते. घारीच्या शेपटीला दोन टोके असतात. घारीच्या पायांचा रंग पिवळा असतो. घार पक्षी किमान दोन फूट इतका लांब असतो. याच्या चोचीचा पुढचा भाग काळ्या रंगाचा असतो. नर वा मादी दोन्ही पक्षी सारखेच दिसतात.


घार पक्षाचे अन्न :-

        घार लहान पक्ष्यांची शिकार करते. मैलेल्या जनावरांचे मांस, उंदीर, सरडे, पंखाच्या मुंग्या हे तिचे मुख्य अन्न आहे.


घार पक्षाचे घरटे :-

        घार झाडाच्या उंच शेंड्यावर काटक्यांचे घरटे बांधते. तिच्या घरट्यात दोरा, कापूस, चिंध्या इ. आढळते. घार मादी एका वेळेस मातकट-पांढऱ्या रंगाची तीन ते चार अंडी घालते.


घार पक्षी इतर माहिती :-

        घार आकाशात उंच उडते. घार 'इवी विरं विरं विर्र' असा आवाज काढते. नागरी जातीच्या घारी माणसांच्या वस्तीत आढळतात. कापशी जातीच्या घारी विरळ पानगळीच्या जंगलात, खेड्यातील शेतांच्या परिसरात आढळतात.

                नागरी घारींच्या विणीचा हंगाम सप्टेंबर ते एप्रिलपर्यंत असतो: तर कापशी घारींच्या विणीचा हंगाम वर्षात कधीही असतो. घार आकाशात उंच उडत असली तरी तिचे लक्ष आपल्या पिल्लांकडे असते. म्हणूनच घारी झाडाच्या शेंड्यावर घरटी बांधतात. "घार हिंडते आकाशी, परि चित्त तिचे पिल्लापाशी." असे म्हटले जाते. नागरी घारीचा पिलांवर फार जीव असतो. पिल्लांना वाढविण्याचे काम नर व मादी दोघेही करतात.

                नागरी घार पक्ष्यांच्या पिल्लांची शिकार करतात; परंतु कापशी धार पक्ष्यांच्या पिल्लांच्या वाटेला जात नाहीत. लहान रानउंदीर, सरडे, टोळ, किडे हे कापशी घारींचे खाद्य असते. घारीचे पंजे ताकदवान असतात. घार आकाशात उडताना तासन् तास पंख हलवत नाही. घारीचे आयुष्य सरासरी १५ ते २५ वर्षे असते.

 
********


टकाचोर पक्षी माहिती मराठी | Tree Pie bird Information In Marathi

                    Takachor Pkshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ही माहिती Tree Pie bird Information in Marathi in Short यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग टकाचोर पक्षी बद्दल माहिती सविस्तर जाणून घेऊया.

टकाचोर पक्षी माहिती मराठी | Tree Pie bird Information In Marathi,Takachor Pkshi Mahiti Marathi

Tree Pie Bird Information in Marathi | टकाचोर पक्षी मराठी माहिती

 

हिंदी नाव :- महालाती

इंग्रजी नाव :- Tree Pie


                    टकाचोर हा पक्षी आपल्या आजूबाजूला उंच झाडांवर वास्तव्य करतो. टकाचोर हा पक्षी काक कुळातला आहे. टकाचोर या  पक्ष्याच्या टकाचोर, पांढऱ्या पोटाचा हिमालयीन टकाचोर व इतर अनेक जाती आहेत.


टकाचोर पक्ष्याचे वर्णन :-

     या पक्ष्याला दोन पाय, दोन डोळे असतात. याची लांबी सुमारे एक ते दीड फूट असते. टकाचोर या पक्षाच्या डोके , मान व छातीवरील पिसांचा रंग काळा असतो. उर्वरित शरीरावरील पिसांचा रंग कातासारखा काळपट लाल असतो. या पक्ष्याची चोच कावळ्याच्या चोचीसारखी काळी व लहान असते.


टकाचोर पक्ष्याचे अन्न :-

    टकाचोर  हा पक्षी उंच झाडांवर घरटे बांधतो. घरटे बांधण्यासाठी तो काटेरी काटक्या वापरतो. त्याला आतून पिसे व शेवरीच्या कापसाचे तसेच मऊ पानांचे अच्छादन घालतो. मादी टकाचोर ही चार किंवा पाच अंडी घालते. फेब्रुवारी ते जुलै हा या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो.


टकाचोर पक्षी इतर माहिती :-

        पांढऱ्या पोटाचा टकाचोर पक्षी आपल्याकडे आढळतो. वड, पिंपळ, उंबर, पेरू, पिंपरी, जांभूळ या झाडांची फळे हा पक्षी खातो. त्याच्या विष्ठेद्वारे बाहेर पडलेले बी कुठेही रुजते. अशा प्रकारे जंगलवाढीस हा पक्षी मदत करतो. जंगलात, माळरानात, शेतांमधील झाडीत हे पक्षी आढळतात. छोट्या पक्ष्यांची घरटी शोधून त्यातील पिल्लांची शिकार हे पक्षी करतात.


********


Post a Comment