कोकीळ पक्षी माहिती मराठी | Koel Information In Marathi

Kokil Pkshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ही माहिती Koel Information in Marathi in Short यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग कोकिळा पक्षी बद्दल माहिती सविस्तर जाणून घेऊया. तसेच भारद्वाज पक्षाची माहिती  खाली देण्यात अली आहे.


Kokil pakshi chi mahiti , Cuckoo bird information in marathi

Kokila Bird  Information in Marathi | कोकीळ पक्षी मराठी माहिती


हिंदी नाव : कोयल

इंग्रजी नाव : Koel


        आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी आपल्याला दिसतात. या सर्व पक्षांमध्ये अतिशय सुरेल आवाजाचा पक्षी कोणता असेल तर तो कोकीळ पक्षी होय.

 

कोकीळ पक्षाचे वर्णन :-

        कोकीळ हा पक्षी थोड्याफार प्रमाणात कावळ्यासारखा दिसणारा पक्षी आहे. परंतु हा पक्षी कावळ्यापेक्षा थोडा लहान असतो. कोकीळ पक्षाची चोच पिवळट – हिरव्या रंगाची असते. कोकीळ पक्षाचे डोळे हे लालसर असतात. या पक्षाची शेपटी लांब असते. कोकिळ पक्ष्याला दोन पंख व दोन पाय असतात.


कोकीळ पक्षाचेअन्न :-

        कोकीळ हा पक्षी विविध प्रकारची फळे, अळ्या आणि किडे खातो.

 

कोकीळ पक्षाची इतर माहिती :-

        भारतामध्ये सर्वत्र कोकीळ हा पक्षी आढळतो. घनदाट वृक्षांवरून हा पक्षी फिरताना आढळतो. कोकीळ या पक्ष्यातील नर व मादी दिसायला पूर्णपणे वेगळे असतात. कोकिळा (मादी) भुरकट तपकिरी रंगाची असते. कोकिळेच्या शरीरावर पांढरे चट्टे व ठिपके असतात. चोच फिकट राखाडी रंगाची असते. डोळे लालबुंद असतात. नर कोकीळ दिसायला काकाळ्या रंगाचा असतो. नर व मादी या दोघांच्याही  शेपट्या लांब असतात. त्यामुळे फांदीवर बसल्यावर तोल सांभाळता येतो. कोकिळा घरटे कधीच बांधत नाही. कोकिळा नेहमी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. कावळा व कोकिळा यांची अंडी दिसायला सारखीच असतात. लोकांचा गैरसमज असतो की कोकिला गाते, परंतु कोकिळा कधीच गात नाही. कोकीळ (नर) हा 'कुहुकुहू' अशा सुरेल आवाजात गातो. मादी कोकिला ही 'क्वॅक्क्वॅक् असा कर्कश आवाज काढते.

        कोकीळ या पक्षाला विशेष करून केळी, वादाची फळे आणि इतर रसाळ फळे आवडतात. वसंत ऋतूची चाहूल लागताच कोकीळ पक्षाला कंठ फुटतो, तेव्हा त्याचा 'कुहुकुहू’ असा मंजुळ आवाज ऐकायला चांगला वाटतो. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना त्यांच्या सुरेल आवाजामुळे 'गानकोकिळा असे संबोधण्यात येते, कारण पक्ष्यांच्या दुनियेत सुरेल आवाज असणारा पक्षी म्हणजे 'कोकीळ पक्षी होय.


People Also Ask About Koel |  कोकीळ पक्षाबद्दल बद्दल सारखे विचारले जाणारे प्रश्न :


१)कोकीळ पक्षी काय खातो ?

कोकीळ पक्षी विविध प्रकारची फळे आणि बेरी खातात. तसेच कोकीळ पक्षी सुरवंट देखील खातात.


२)कोकीळ पक्षी कशासारखे दिसतात?

कोकीळ पक्षी थोड्याफार प्रमाणात कावळा या पक्षासारखे दिसतात.


३) कोकीळ पक्षी कसा आवाज काढतो?

कोकीळ पक्षी 'कुहुकुहू’ असा मंजुळ आवाज काढतो.


४)कोकिळा पक्षी किती अंडी घालतो?

कोकिळा पक्षी १२ ते २२ अंडी घालतात.


 **************


भारद्वाज पक्षी माहिती मराठी |
Skylark Bird Information In Marathi

Bharadwaj Pkshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ही माहिती Skylark Information in Marathi in Short यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग भारद्वाज पक्षी बद्दल माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Skylark Information in Marathi in Short ,Bharadwaj Pkshi Mahiti Marathi,

Bhardwaj  Bird  Information in Marathi | भारद्वाज पक्षी मराठी माहिती


हिंदी नाव :- मोहजाल

इंग्रजी नाव :- Skylark


आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आढळणारा एक पक्षी म्हणजे भारद्वाज पक्षी. भारद्वाज हा पक्षी शहरांमध्ये देखील आढळतो; परंतु या पक्षाची संख्या अत्यंत कमी कमी असते.


भारद्वाज पक्षाचे वर्णन :-

भारद्वाज हा पक्षी आकाराने डोमकावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. भारद्वाज या पक्षाची  शेपटी लांब असते. याच्या पंखांचा रंग मातेरी  असतो. आणि इतर शरीरावरील पिसांचा रंग काळा असतो. या पक्षाची चोच मजबूत व किंचित वाकलेली आणि  टोकदार असते. या पक्षाच्या चोचीचा व पायांचा रंग काळा असतो. पायांची नखे धारदार असतात. डोळे लाल रंगाचे असतात. हा पक्षी लहान असताना या पक्षाचे डोळे काळे असतात जस जसा हा पक्षी मोठा होत जातो तसे याचे डोळे लाल होतातात.


भारद्वाज पक्षाचे अन्न: 

भारद्वाज या पक्षाचे मुख्य अन्न किडे, मुंग्या, पाली, सरडे, छोटे साप हे होय. कधी इतर लहान पक्ष्यांची अंडी व पिल्ले देखील हा पक्षी खातो.


भारद्वाज पक्षाचे घरटे :-

भारद्वाज हा पक्षी आपले घरटे स्वतंत्रपणे काटेरी झाडांच्या बुंध्याजवळ किंवा झुडपांमध्ये बांधतो. हा पक्षी झाडाची पाने, गवत, काड्या यांपासून घरटे बनवितो. घरट्याचा आकार गोलसर असतो. घरट्याला बाजूने एक दार असते. हा पक्षी एका वेळी ३/४ अंडी घालतो. याच्या अंड्यांचा रंग हा पांढरा शुभ्र असतो.

 

इतर माहिती :-

भारद्वाज हा पक्षी जमिनीवरून तसेच झुडपातून चालताना आढळतो. जमिनीवरून चालताना याची शेपटी जमिनीला स्पर्श करते; या शेपटीचा उपयोग तो स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी करतो.

भारद्वाज हा पक्षी गावाबाहेर, शांत ठिकाणी आढळतो. हा 'उक् उक्' असा आवाज काढतो. नर व मादी मिळून दोघेही आपल्या पिल्लांची काळजी घेतात. भारद्वाज हा पक्षी शांत दिसत असला तरी तसा वरून शांत दिसणारा भारद्वाज पक्षी थोडा आक्रमकच असतो. शिकारी पक्षी सुद्धा या पक्ष्यापासून थोडे दूरच राहतात. भारद्वाज पक्षाचे दर्शन शुभ मानले जाते. हा पक्षी रुबाबदार दिसतो . हा पक्षी सर्वांना स्वतःकडे आकर्षित करतो. श्वसन नालीकेच्या रोगावर उपचार म्हणून याचा वापर औषध म्हणून केला जातो. हा पक्षी जास्त उंच उडू शकत नाही.


           **********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.