राखी बगळा पक्षी माहिती मराठी | Grey Heron information in marathi

Grey Heron information in marathi, बगळा पक्षी निबंध , बगळ्याची माहिती, करकोचा पक्षी माहिती मराठी, Stork bird Information In Marathi, Karkocha Pkshi
Admin

Bagala Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत तसेच नाचण पक्ष्याची माहिती देखील या लेखाच्या माध्यामातून तुम्हांला मिळेल.  ही माहिती Grey Heron information in marathi for project यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग Grey Heron information in marathi wikipidia  माहिती सविस्तर जाणून घेऊया. तसेच बगळा पक्षाची माहिती च्या खाली करकोचा पक्षी (Stork information in marathi ) या पक्षाची देखील माहिती देण्यात आली आहे.

 

Grey Heron information in marathi, बगळा पक्षी निबंध , बगळ्याची माहिती, करकोचा पक्षी माहिती मराठी, Stork bird Information In Marathi, Karkocha Pkshi

Information About Grey Heron marathi | राखी बगळा माहिती

 

हिंदी नाव :- नारी/कैबुड/ऐजॅन

इंग्रजी नाव:- Grey Heron


                    राखी बगळा हे पक्षी आपल्या वेगवेगळ्या आकर्षक व मनमोहक रंगांमुळे माणसांना आकर्षित करतात. या पक्षांच्या रंगावरूनच या पक्ष्यांना नावे दिली गेली आहेत. त्यातील एक पक्षी म्हणजे राखी बगळा होय.

        बगळा म्हणजे तो पांढराच असणार, असे आपल्याला वाटते; परंतु या पक्ष्यामध्ये 'राखी बगळा' आणि मध्यम बगळा, लहान बगळा, गायबगळा, जांभळा बगळा असे काही प्रकार आहेत.

 

बगळा पक्षी वर्णन :-

राखी बगळ्याचे पाय फिकट पिवळ्या रंगाचे असतात. या बगळ्याची शरीराची खालची बाजू ही राखट पांढऱ्या रंगाची असते. डोके व मान मात्र शुभ्र पांढऱ्या रंगाची असते. या पक्षाची मान चांगली लांब, निमुळती आणि 'एस्' आकाराची असते. याचे डोके अरुंद असते. चोच जाड व मजबूत भाल्यासारखी टोकदार व पिवळसर रंगाची असते. या दोन बगळ्यांमधील फरक म्हणजे राखी बगळ्याच्या डोक्यावर काळा तुरा असतो.


बगळा पक्षाचे अन्न :-

            राखी बगळा या पक्षाचे पाण्यातील बेडूक, खेकडे व मासे हे प्रमुख अन्न आहे.

 

बगळा पक्षाचे घरटे :-

            राखी बगळा या पक्षाचे घरटे माचासारखे काटक्यांचे बनविलेले असते. हा पक्षी पाण्यात असल्याने किनाऱ्यावरील झाडांवर आपले घरटे बांधतो. हा पक्षी एका वेळी ३ ते ५ अंडी घालतो. त्याची अंडी गडद निळसर हिरव्या रंगाची असतात.


बगळा पक्षी इतर माहिती :-

        राखी बगळा हा पक्षी पाणथळ जागेत एकेकटाच आढळतो. तो नेहमी गुडघ्याइतक्या पाण्यात डोके खांद्यामध्ये ठेवून जणू गाढ झोपेत असल्याप्रमाणे निश्चलपणे उभा राहतो. परंतु पाण्यात आजूबाजूला कोठलेही भक्ष्य आले तर ते पकडण्यासाठी तो आपली लांब मान चटकन बाहेर काढतो.

        या पक्ष्यातील नर व मादी ओळखणे सोपे असते. मादी राखी बगळ्याच्या डोक्यावरील तुरा व छातीवरील काळ्या-पांढऱ्या रंगांची पिसे उठावदार नसतात. नर पक्ष्याचे पंख राखाडी असून कडेला काळ्या रंगाची उठावदार पिसे असतात. उडताना हा पक्षी पाय मागे व डोके आत घेऊन उडतो. हे पक्षी भारतातल्या भारतात हे स्थलांतर करतात. कर्नाटकमधील आलमट्टी धरणामध्ये हे पक्षी पहावयास मिळतात. याचे आयुष्यमान किमान ५ ते ८ वर्षे असते.

 **********


करकोचा पक्षी माहिती मराठी | Stork bird Information In Marathi

Karkocha Pkshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ही माहिती Stork bird Information in Marathi in Short यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग धनेश पक्षी बद्दल माहिती सविस्तर जाणून घेऊया.


Karkocha Pkshi Mahiti Marathi,tork bird Information in Marathi in Short, करकोचा पक्षी माहिती मराठी | Stork bird Information In Marathi

Stork Bird Information in Marathi | करकोचा पक्षी मराठी माहिती

 

हिंदी नाव :- गुंगला/पुंगिल/हरगिल

इंग्रजी नाव :- Stork

 

करकोचा हा पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. करकोचा या उघडाचोच करकोचा, पक्ष्याच्या पांढरा करकोचा, काळ्या, पांढऱ्या मानेचा व रंगीत करकोचा अशा रंगांनुसार याच्या उपजाती आहेत.

 

करकोचा पक्षाचे वर्णन :-

करकोच्याला दोन पाय, दोन डोळे, एक लांब अणुकुची-दार चोच असते. याची उंची किमान दोन ते तीन फूट असते. पाय व चोच लाल असते. शरीरावर पांढरी पिसे असतात.

 

करकोचा पक्ष्याचे अन्न :-

    करकोचा या पक्षाचे मुख्य अन्न मासे व बेडूक हे होय. पाण्यातले किडे, खेकडे, गोगलगाया इत्यादी प्राणीसुद्धा पकडून तो खातो.

 

करकोचा पक्षी घरटे :-

        करकोचा या पक्षाचे घरटे तळ्याच्या काठावरील झाडावर असते. या पक्षाचे घरटे हे काटक्या, गवत व पाने वापरून बनवलेले असते. करकोचा हा पक्षी चार-पाच अंडी घालतात. या पक्षाची अंडी ही मळकट पांढऱ्या रंगाची व कधी कधी ठिपके व रेघा असलेली अशी असतात.

 

करकोचा पक्षी इतर माहिती :-

        करकोचा हा पक्षी स्थलांतरित आहे. हा पक्षी तळी, तलाव या ठिकाणी आढळतो. हा पक्षी स्वरतंतू नसल्यामुळे आवाज काढत नाही; परंतु विणीच्या हंगामात नर व मादी घशातून गुर्रगुर्र व चोचीच्या उघडझापीने कट्कट् असा आवाज करतात. हे पक्षी चिखलात अगर उथळ पाण्यात दिवसभर चालताना आढळतात.करकोचा हा पक्षी  टोळ, किटक तसेच किटकांची अंडी पण खातो. शेतातील नुकसान करणारे कीटक खात असल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत नाही. म्हणून या पक्ष्याला शेतकऱ्यांचा मित्र असे म्हणतात.  करकोचा हा पक्षी विणीच्या हंगामात चिंच व वडाच्या झाडावर समूहाने घरटी बांधतात, त्या वसाहतीला 'सारंगगार' म्हणतात.


*********


Grey Heron information in marathi for project | बगळा पक्षी मराठी माहिती

Post a Comment