5.वसंतहृदय चैत्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Vasanthruday chaitra Swadhyay Iyatta Dahavi

Vasanthruday chaitra swadhyay pdf Vasanthruday chaitra swadhyay pdf Swadhyay class 10 marathi chapter 5 Vasanthruday chaitra question answer
Admin

Iyatta Dahavi Vishya Marathi Vasanthruday chaitra Swadhyay | वसंतहृदय चैत्र स्वाध्याय इयत्ता दहावी


(१) पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये

झाडाचे/वेलीचे नाव

(अ) निळसर फुलांचे तुरे

कडूनिंबाचे झाड

(आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी

पिंपळाचे झाड

(इ) गुलाबी गेंद

मधुमालती

(ई) कडवट उग्र वास

कारंजाचे झाड

(उ) दुरंगी फुले

घाणेरी

(ऊ) तीन पाकळ्यांचे फूल

माडाचे झाड

(ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे

फणस

 

वसंतहृदय चैत्र स्वाध्याय १०वी  इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय 5  वसंतहृदय चैत्र या धड्याचे प्रश्न उत्तर  मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

 (२) खालील संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


(१) चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे.

उत्तर: 

        वसंत ऋतूतील मनमोहक निसर्गसौंदर्य, विविध वृक्षानावर व वेलींवर बहरणारी विविधरंगी फुले आणि झाडांवर येणारी पालवी यांचे खरेखुरे उत्कट दर्शन या मासात होते म्हणून चैत्र हा महिना वसंत हृतुचा आत्मा आणि तन-मन प्रफुल्लित करणारा मधुमास आहे. असे म्हटले जाते.

 

(२) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.

उत्तर: 

        वसंत ऋतूत आपल्या आसपासचे निसर्ग दृश्य आपले मन मोहून टाकते. विविध रंगाची उधळण केलेला निसर्ग आपल्याला एखाद्या चित्रलिपीप्रमाणे भासतो. विविध रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या झाडांवर पक्षी आपले घरटे बनवतात आणि त्या घरट्यांचे निरीक्षण करताना मन तेथेच रेंगाळते. पुढे सरकावे असे आपणास वाटतच नाही इथे आपण जणू विराम घेतो म्हणून काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात असे म्हटले आहे.

 

(३) योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

(१) लांबलचक देठ

(आ) कैऱ्याचे गोळे

(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी

(इ) करंजाची कळी

(३) भुरभुरणारे जावळ

(अ) माडाच्या लोंब्या

 

 (४) खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द

अर्थ

निष्पर्ण

पाने निघून गेलेला

निर्गंध

सुगंध निघून गेलेला

निर्वात

हवा नसलेला

निगर्वी

गर्व नसलेला

नि:स्वार्थी

स्वार्थ नसलेला

 

(५) खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

(रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे)


(अ) लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.

उत्तर: लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच.


(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.

उत्तर: गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती रुंजी घालत असतात.


(इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.

उत्तर: मोठ्या माणसांची कुचेष्टा करणे हासुद्धा अपराधच


(ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.

उत्तर: सध्या घरामध्ये उंदरांना पेव फुटल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.

 

(६) खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.


शब्द

प्रत्यय

त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द

(१) अतुलनीय

नीय

प्रशंसनीय

(२) प्रादेशिक

इक

ऐतिहासिक

(३) गुळगुळीत

ईत

सरसरीत

(४) अणकुचीदार

दार

ठेकेदार

 

(७) खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटींत लिहा.


(अ)अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते.

विशेष नाम

सामान्य नाम

(आ) अजय आजच मुंबईहून परत आला.

विशेष नाम

विशेष नाम

(इ) गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते.

विशेष नाम

भाववाचक नाम

(ई) रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे.

विशेष नाम

भाववाचक नाम

 

 

(८) खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.

जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.

(अ) कर्ण- कान

(आ) सोबती- मित्र

(इ) मार्ग- वाट

ई) हर्ष-आनंद

 

(९) स्वमत.

 

(अ) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

            चैत्रातल्या पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्ल्वांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेन्द्च झाडावर फुलले आहेत, अस भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच किंबहुना पिंपळपानांच्या सळसळी वरूनच झाडांच्या पानांची सळसळ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे.

            आनंददायक , आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य हे सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.

 

(आ) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.

उत्तर:

        वसंत ऋतूत आसपासची नैसर्गिक दृश्य आपले मन मोहून टाकतात. विविध अशा रंगांची उधळण केलेला निसर्ग हा आपल्याला चित्रलिपीप्रमाणे भासतो. विविध रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या झाडांवर पक्षी आपला घरटे व निवारा बनवतात आणि त्या घरट्यांचे निरीक्षण करताना आपले मन तेथेच रेंगाळते. पुढे सरकावे असे आपणास वाटतच नाही इथे आपण जणू विराम घेतो म्हणून काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात असे म्हटले आहे.

 

(इ) वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा

उत्तर:

        वसंत ऋतू म्हटला तर डोळ्यासमोर निसर्गाचे मनमोहक चित्र उभे राहते. असे निसर्गाचे रुप पाहायचे म्हणजे कोकणाची आठवण येते. असाच चैत्र महिन्यात मामाच्या गावी कोकणात जायचा योग आला. नारळाच्या बागा, आंब्याची , फणसाची बाग, काजूची बाग यांनी कोकणातील परिसर नटलेला आहे. झाडांवर नव पालवी तुटलेली होती. नारळाचे झाड खूपच सुंदर दिसत होते. आंब्यांना हापूस आंब्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. निसर्गाचे सौंदर्य डोळे भरून पहिले. पक्षीसुद्धा फळांना चोची मारून आस्वाद घेत होई. आठ दिवस झाले तरी परत येण्याची इच्छा नव्हती नाईलाजाने सर्वांचा तसेच निसर्गाचा निरोप घेऊन स्वगृही परतलो.


*********

Post a Comment