Uttamlakshan Swadhyay Iyatta Dahavi Vishya Marathi | उत्तमलक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी
(१) आकृत्या पूर्ण करा.
अ)संत
रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी |
अपकीर्ती टाळावी |
सत्कीर्ती वाढवावी |
|
सत्याची वाट धरावी |
आ) कधीही करू नयेत अशा गोष्टी
१)पुण्य मार्ग सोडू नये
२)पैज किंवा होड लावू नये.
३)कुणावरही आपले ओझे लादू नये.
४)असत्याचा अभिमान बाळगू नये.
तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
गुण
१)कामे वेळेवर पूर्ण करणे.
२)गरजूंना मदत करणे.
३)स्वतःची कामे स्वतः करणे.
दोष
१)कधीकधी आळस येणे.
२)कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे.
३)कोणत्याची गोष्टीचा लगेच राग येणे.
(२) खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
(अ) तोंडाळ
उत्तर: तोंडाळ व्यक्तींशी भांडू नये.
(आ) संत
उत्तर: संतसंग खंडू नये.
(३) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टी |
दक्षता |
१)
आळस |
आळसात सुख मानू नये. |
२)
परपीडा |
परपीडा करू नये. |
३)
सत्यमार्ग
|
सत्यमार्ग सोडू नये. |
(४) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.
‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’
उत्तर:
उत्तमलक्षण या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी सर्वगुणसंपन्न आदर्श व्यक्तीची अनेक महत्वाची लक्षणे सांगितली आहेत.
समाजात वावरत असताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात.
१) लोकांचे मन मोडू नये.
२) लोकांनी केलेली विनंती धुडकावु नये. उलट जनभावनांचा आदर करावा.
३) तसेच वाईट मार्गाने संपत्ती जमवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते.
४) पुण्यमार्गाचे आचरण करावे. कधीही पुण्यमार्ग सोडू नये.
असा संदेश या काव्यातून दिला गेला आहे.
(आ) ‘सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर:
उत्तमलक्षण या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी सर्वगुणसंपन्न आदर्श व्यक्तीची अनेक महत्वाची लक्षणे सांगितली आहेत.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजातील माणसांमध्ये वावरतांना त्याला समाज नियमांचे भान ठेवावे लागते. अशा समुहांमध्ये आदर्श व्यक्तीने कसे वर्तन करावे हे सांगतना संत रामदास म्हणतात, सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे इतरांसमोर ठेवावे परंतु बोलताना, आपले मत मांडताना सुद्धा निरर्थक पणे कोणतेही वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये.
(इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा
उत्तर:
उत्तमलक्षण या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी सर्वगुणसंपन्न
आदर्श व्यक्तीची अनेक महत्वाची लक्षणे सांगितली आहेत. आळस हा माणसाचा शत्रू आहे असे प्रतिपादन केले
आहे.
जो व्यक्ती दुसऱ्यावारी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ या उक्तीप्रमाणे आळसामुळे माणसाची प्रगती खुंटते, माणूस नाकारता होतो. त्याला समाजात मान मिळत नाही. यामुळे बरीच कार्ये अडून राहतात. मनाला व शरीराला विकार जडतात. त्यात आळस हा एक प्रमुख षडविकार आहे. परिणामी दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये.
10th marthi Uttamlakshan swadhyay
Class 10 marathi chapter 4 question answer
Vasanthruday chaitrakruti
10th std marathi digest
वसंतहृदय चैत्र कृती
इयत्ता दहावी मराठी गाईड pdf
दहावी मराठी उत्तमलक्षण स्वाध्याय
उत्तमलक्षण स्वाध्याय १०वी
इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय 4
उत्तमलक्षण या धड्याचे प्रश्न उत्तर
मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी