२.बोलतो मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Bolato Marathi Swadhyay Iyatta Dahavi

 Iyatta Dahavi Vishya Marathi Bolato Marathi Swadhyay | बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी

Bolato marathi swadhyay pdf download | Bolto marathi swadhyay pdf | Swadhyay class 10 marathi chapter 2 | Bolto marathi question answer

 

प्रश्न. १) आकृत्या पूर्ण करा.


(अ) भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय

उत्तर:

१)योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे

२)क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे.

 

Iyatta Dahavi Vishya Marathi Bolato Marathi Swadhyay | बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी Bolato marathi swadhyay pdf download | Bolto marathi swadhyay pdf | Swadhyay class 10 marathi chapter 2 | Bolto marathi question answer

(आ) कृती मराठी भाषेची श्रीमंती

उत्तर:

१)मराठी ढंगाचे शब्दप्रयोग

२)मराठी वाक्प्रचार

 

प्रश्न.(२) शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा.

(१)             भाषेतील गंमत जाणून घेता येते.

(२)           खूप नवीन माहिती मिळते.

(३)             शब्दांची पालेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते.

(४)           आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत.

(५)           शब्द मनात पक्का रुजतो.

 

10th marthi bolto marathi swadhyay | Class 10 marathi chapter 2 question answer | Bolto marathi kruti | 10th std marathi digest

प्रश्न.(३) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.


(अ) मराठी भाषेची खास शैली

उत्तर: वाक्प्रचार


(आ) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा

उत्तर : हवा


(इ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन

उत्तर: शब्दकोश

 बोलतो मराठी कृती | इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download | दहावी मराठी बोलतो मराठी स्वाध्याय


प्रश्न.(४) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

(अ) ऐट, डौल, रुबाब, चैन

उत्तर: चैन


(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल

उत्तर : हस्त


(इ) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय

उत्तर: विनोद


(ई)संपत्ती, संपदा, कांता, दौलत

उत्तर: कांता


(उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध

उत्तर: प्रज्ञा

 

प्रश्न.(५) खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

(अ) रस्ते

उत्तर:

एकवचनी रूप: रस्ता

घाटातला रस्ता खूपच अरुंद आहे.


(आ)वेळा

उत्तर :

एकवचनी रूप:वेळ

शाळा भरण्याची वेळ झाली.


(इ) भिंती

उत्तर:

एकवचनी रूप:भिंत

समोर दगडाची भिंत आहे.


(ई) विहिरी

उत्तर:

एकवचनी रूप:विहीर

आमची विहीर खूप खोल आहे.

 

(उ) घड्याळे

उत्तर:

एकवचनी रूप:घड्याळ

सुजयने त्याच्या मित्राला घड्याळ भेट म्हणून दिले.

 

(ऊ) माणसे

उत्तर:

एकवचनी रूप: माणूस

माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे.

 

प्रश्न.(६) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

(अ) पसरवलेली खोटी बातमी-

उत्तर:अफवा


(आ)ज्याला मरण नाही असा-

उत्तर:अमर


(इ) समाजाची सेवा करणारा-

उत्तर:समाजसेवक


(ई) संपादन करणारा-

उत्तर: संपादक


बोलतो मराठी स्वाध्याय १०वी | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय २ | बोलतो मराठी या धड्याचे प्रश्न उत्तर | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

 

प्रश्न.(७) स्वमत.


(अ) ‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.

उत्तर:तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा अर्थ समजूतदार व हुशार आहात असा होतो.

आई मुलाला तू शहाणा आहेस असे म्हणते. या वेळी शहाणा या शब्दाचा अर्थ समजूतदार असा होतो.

परंतु प्रत्येक वेळी शहाणे म्हणजे समजुतदार असे नव्हे.

काहीवेळा अनेकवेळा सांगूनही माणूस चुका करतो.तेव्हा समोरचा म्हणतो ‘तुम्ही शहाणे आहात’ यावेळी शहाणे शब्दाचा अर्थ मूर्ख असा होतो.

शहाणे शब्दाच्या अशा दोन अर्थछटा दिसून येतात.

 

(आ) ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.

उत्तर:मी ‘टेन्थ मध्ये आहे’ या वाक्यातून तोच अर्थबोध होतो जो ‘ मी दहावीत आहे’ या वाक्यातून होतो. ‘हे किती छान आहे’ असे म्हणण्याऐवजी’ हे किती सुपर आहे’ असे म्हटले जाते. ज्या ठिकाणी आवश्यकता नसताना परभाषेतले शब्द वापरले तर यातून आपण नकळतपणे आपल्या मातृभाषेचा अपमान करत असतो.

म्हणून  गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत मी सहमत आहे.

 

(इ) लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा

उत्तर:लेखिका म्हणतात होय माझी मराठी भाषा खूप श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. वाक्प्रचार हे मराठी भाषेची खास शैली आहे. मारणे हे एकच क्रियापद गप्पा मरणे, थापा मारणे, पोहताना हातपाय मारणे इत्यादी ठिकाणी विविध प्रकारे वापरले जाते. मराठीतील वाक्प्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे. नुसते ‘पोट’ या अवयवावर किती तरी वाक्प्रचार आहेत. पोटी येणे(जन्म) , पोटात येणे (मत्सर) . मराठी भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून मराठी भाषा अधिकाधिक श्रीमंत चालली आहे असे लेखिका म्हणतात.


हे सुद्धा पहा : 

इयत्ता दहावी सर्व विषयांची पुस्तके pdf 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.