Iyatta Dahavi Vishya Marathi Aaji Kutumbach Aagal Swadhyay | आजी : कुटुंबाचं आगळ स्वाध्याय इयत्ता दहावी
आजी : कुटुंबाचं आगळ स्वाध्याय १०वी | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय 3 | आजी : कुटुंबाचं आगळ या धड्याचे प्रश्न उत्तर | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी
प्रश्न . (१) पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा.
बैठे खेळ
१) चिंचोके
२)मुंगळा
३)गजगे
४)खाप्रच्या भिंगर्या
५)जिबल्या
मैदानी खेळ
१)गोट्या
२)सूरपारंब्या
३)विटीदांडू
प्रश्न.(२) खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.
आजी
आजीचे दिसणे.
आजीची शिस्त.
आजीचे राहणीमान
उत्तर:
आजीचे दिसणे : आजीला साडेपाच फुट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा करपटली होती. तिचा पाठीचा कणा ताठ होता. केस पांढरे व चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. सर्व दात शाबूत होते व मोत्यासारखे चमकत होते.
२) आजीचे राहणीमान : पायामध्ये जुन्या वळणाच्या नळाच्या वाहणा, अंगात चोळी, हिरवं आणि लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरच गोंदण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का असे आजीचे राहणीमान होते.
३) आजीची शिस्त : आजीची शिस्त कडत होती. सगळ्यांना कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावत असे.
आजी : कुटुंबाचं आगळ कृती | इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download | दहावी मराठी आजी : कुटुंबाचं आगळ स्वाध्याय
प्रश्न. (३) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट |
‘ब’ गट(उत्तरे) |
(१) आळस |
(इ) उत्साह |
(२) आदर |
(ई) अनादर |
(३) आस्था |
(अ) अनास्था |
(४) आपुलकी |
(आ) दुरावा |
प्रश्न.(४) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा.
(अ) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.
उत्तर: सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष
असतो.
(आ) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे
अयोग्यच.
उत्तर: दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा
घेणे अयोग्यच.
(इ) कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.
उत्तर: कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती
इतरांच्या नजरेतून उतरतात.
प्रश्न.(५) कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित, आमची)
(अ) समुद्रकिनारी................. सहल गेली होती.
उत्तर: समुद्रकिनारी आमची सहल गेली
होती.
(आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद
................. झाला.
उत्तर: खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित
झाला.
(इ) विजय अजयपेक्षा ................. चपळ आहे.
उत्तर: विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे.
(ई) रवीला ................. कैऱ्या खायला खूप आवडतात.
उत्तर: रवीला आंबट कैऱ्या
खायला खूप आवडतात.
(उ) मला गाणी ऐकण्याची ................. आवड आहे.
उत्तर: मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.
(ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु ................. पाय अचानक मुरगळल्याने तो बाद
झाला.
उत्तर: राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.
प्रश्न.(६) खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थलिहून चौकटी पूर्ण करा.
अ) |
नवरा |
वर |
वरची बाजू |
आ) |
आकाशातील ग्रह |
ग्रह |
समज |
इ) |
किनारा |
काठ |
पदर |
ई) |
न भंगणारे |
अभंग |
एक छंद |
10th marthi Aaji Kutumbach Aagalswadhyay | Class 10 marathi chapter 2 question answer | Aaji Kutumbach Aagalkruti | 10th std marathi digest
प्रश्न.(७) स्वमत.
(अ) ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :
दुपार होईपर्यंत आपल्या घरातील सर्व कामे पूर्ण करून घरच्या व
आजूबाजूच्या बायका आणि आजी धाळजेत जमा व्हायच्या. निवडटिपण करताना गप्पाटप्पा होत
असत. अनेक बातम्या, गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी मिळून बातम्यांवर चर्चा करीत
असत. संपादक ज्याप्रमाणे वार्ताहराने आणलेल्या बातम्यांची शहानिशा करून मगच त्या
बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. त्याच पद्धतीने तिथे आलेल्या बातम्यांची
शहनिशा केल्यावर बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत असत.
(आ) तुलना करा/साम्य लिहा.
आगळ-वाड्याचे
कवच, आजी-कुटुंबाचे संरक्षक कवच
उत्तर:
आगळ |
आजी |
१) वाड्याचे संरक्षक कवच |
१) कुटुंबाची संरक्षक कवच |
२)घराबाहेर जाता येत नाही. |
२)शब्दाबाहेर जाता येत नाही. |
३)रात्री आधार, भीती वाटत
नाही. |
३)कठीण प्रसंग आधार. तिच्यामुळे
कुटुंब निर्भर. |
(इ) पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार
स्पष्ट करा.
उत्तर:
एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये १) वळण लागते
२) शिस्त लागते ३) समतेची वागणूक असते ४) भेदभाव नसतो ५) संरक्षण मिळते.
या सर्व गोष्टी पाठातून चित्रित झाल्या आहेत.
पण त्याच वेळी आजी १) हुकुमशाही
पद्धतीने वागते २) या पद्धतीमुळे व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा निर्माण होत असते. ३)
घरातील प्रत्येक सुनेला सर्व कामे करता आली पाहिजेत आणि त्यांची कामे आलटून पालटून
द्यायची. या गोष्टी मला न पत्न्यासारख्या आहेत.
Aaji Kutumbach Aagal swadhyay pdf download | Aaji Kutumbach Aagal swadhyay pdf | Swadhyay class 10 marathi chapter 3 | Aaji Kutumbach Aagal question answer
(ई) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा
उत्तर:
आगळ हे वाड्याचे
संरक्षक कवच असते. आगळ लावली की घराबाहेर हुंदडण्याची सवय बंद होते आणि रात्री
मात्र तिचा आधार वाटतो. कुटुंबाच्या संदर्भात आजीही कुटुंबाची संरक्षक कवच आहे. तिच्या
धाकामुळे मुले बाहेर हुंदाडायला जात नाहीत आणि कठीण प्रसंगात मात्र तिचा आधार
वाटतो. तिच्यामुळे निर्भय वातावरण राहते. हे साम्य आजी : कुटुंबाचं आगळ या शीर्षकातून
दिसून येते म्हणून हे शीर्षक समर्पक आहे.
हे सुद्धा पहा :