६. आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी राज्यशास्त्र | Aantarrashtriy Samasya Swadhyay Prashn Uttare

आंतरराष्ट्रीय समस्या इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र स्वाध्याय | Iyatta 9 vi Rajyashastra swadhyay chapter 6

आंतरराष्ट्रीय समस्या इयत्ता नववी स्वाध्याय | आंतरराष्ट्रीय समस्या प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf



प्रश्न  १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा.


(१) पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरुपाची आहे.

(अ) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद

(ब) कावेरी पाणीवाटप

(क) निर्वासितांचे प्रश्न

(ड) आंध्र प्रदेशातील नक्षलवाद

उत्तर: निर्वासितांचे प्रश्न

 

आंतरराष्ट्रीय समस्या इयत्ता नववी स्वाध्याय आंतरराष्ट्रीय समस्या प्रश्न उत्तरे इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा ६ स्वाध्याय इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय आंतरराष्ट्रीय समस्या

(२) पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी  हक्कांमध्ये होत नाही.

(अ) रोजगाराचा अधिकार

(ब) माहितीचा अधिकार

(क) बालकांचे अधिकार

(ड) समान कामासाठी समान वेतन

उत्तर: माहितीचा अधिकार

 

(३) पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर  साजरा केला जातो?

(अ) शिक्षक दिन

(ब) बालदिन

(क) वसुंधरा दिन

(ड) ध्वजदिन

उत्तर: वसुंधरा दिन

 



Class 9 history questions and answers | History guide for class 9 maharashtra board | 9vi Rajyashastra swadhyay chapter 6

प्रश्न२. पुढील विधाने चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.


(१) पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

उत्तर: बरोबर; कारण :

१)औद्योगिककारणामुळे सर्व देशांचे वातावरण प्रदूषित होत आहे.

२)तेलाच्या व व्युच्या गळतीमुळे तसेच अणुउर्जा भट्ट्यामधून होणारा किरणोत्सार यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

३)हा धोका एका राष्ट्रपुरता मर्यादित राहत नसून जगातील सास्र्व राष्ट्रांवर त्याचे दीर्घकालीन  परिणाम होत आहेत. म्हणून जगतीकार्नाच्या या काळात पर्यावरणीय ऱ्हासावर  उपायोजना शोधण्यासाठी जगातील सर्च राष्ट्रांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

 

(२) निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात.

उत्तर: चूक; कारण :

१) निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो.

२) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते.

३) गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, महागाई वाढते.

४)स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

त्यामुळे निर्वासितांना आसरा देण्यास अाणि त्यांचे पुनर्वसन करण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाहीत.



प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.


(१) मानवी हक्क

उत्तर:

१) मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क.

२) मानवी हक्क संकल्पनेचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेपासून झाला.

३)मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो.

४) नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी असते.

 

(२) पर्यावरणीय ऱ्हास

उत्तर:

१) मोठ्या प्रमाणावर होत असलेले औद्योगिकीकरण, वाढत चाललेली ऊर्जेची गरज यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो आहे.

२) शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांमुळे दुषित अन्नपदार्थ तयार होत आहेत.

३) वाहनांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग, यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

४)तेलगळती किंवा रासायनिक वायूंची गळती या सर्वांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या पर्यावरणीय ऱ्हासाचे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत.

 

(३) दहशतवाद

उत्तर:

१) राजकीय उद्‌दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला ‘दहशतवाद’ असे म्हणतात.

२) दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय.

३)भौगोलिक सीमांची मर्यादा दहशतवादाला नसते.

४) देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था दहशतवाद नाकारतो.

 



Aantarrashtriy Samasya swadhyay prashn uttare | Aantarrashtriy Samasya Swadhyay Iyatta Navavi


प्रश्न ४. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 

पर्यावरणीय ऱ्हास

कारणे

दृश्य परिणाम

उपाययोजना

१. वाहनांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण

१. वनस्पती व प्रजाती नष्ट होणे.

१. जंगलांची वाढ करणे.

२.अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग

२. ओझोनचा थर विरळ होत जाणे.

२. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण रोखणे.

३. तेलगळती किंवा रासायनिक वायूंची गळती

३.जागतिक तापमानवाढ

३.जैवविविधतेचे रक्षण करणे.

४.रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर

४. नवीन रोगांची निर्मिती.

४. वृक्षारोपण करणे.

 



प्रश्न ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


(१) मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची  भूमिका स्पष्ट करा.

उत्तर:

१) भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे.

२) संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे.

३) १९९३ मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला.

४) या कायद्यांतर्गत ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोग’ व राज्य मानवी हक्क आयोग’ स्थापन करण्यात आले आहेत.

 

(२) दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून  दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा

उत्तर:

दहशतवादामुळे होणारे परिणाम

१) दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेलादेखील धोका निर्माण होतो.

२)मोठ्या प्रमाणवर जीवित व वित्तहानी होते.

३) राष्ट्रांची आर्थिक स्थिती ढासळते.

४) समाजाचा विकास खुंटतो.

५) मानवी हक्कांवर गदा येते.

 

दहशत वादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना

१)दहशत वादाला आळा घालण्यासाठी सर्व राष्ट्रांच्या सुरक्षा यंत्रणांनी परस्पर सहकार्य केले पाहिजे.

२)दहशतवादी कृत्यांना वेळीच प्रतिबंध केला पाहिजे.

३) देशातील सर्व जनतेला समानतेची वागणूक, आणि सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.



आंतरराष्ट्रीय समस्या इयत्ता नववी स्वाध्याय | आंतरराष्ट्रीय समस्या प्रश्न उत्तरे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.