शैक्षणिक वाटचाल इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 5 question answers
Shaikshanik Vatchal Swadhyay Iyatta Navavi | Class 9 history questions and answers | History class 9 chapter 5 solution |9th history chapter 5 question answers
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) परम-८०००
हा महासंगणक तयार करणारे स्त्रज्ञ -
(अ) डॉ.विजय
भटकर
(ब)
डॉ.आर.एच.दवे
(क)
पी.पार्थसारथी
(ड) वरीलपैकी
कोणीही नाही.
उत्तर: परम-८००० हा महासंगणक तयार करणारे स्त्रज्ञ - डॉ.विजय भटकर
(२) जीवन
शिक्षण हे मासिक ........ या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
(अ) बालभारती
(ब) विद्या
प्राधिकरण
(क) विद्यापीठ
शिक्षण आयोग
(ड)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
उत्तर: जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
(३) आय.आय.टी.
ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
(अ) कृषी
(ब) वैद्यकीय
(क) कुशल
दर्जाचे व्यवस्थापक
(ड)
अभियांत्रिकी
उत्तर: अभियांत्रिकी
२. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
(१) भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
व्यक्ती |
कार्य |
मौलाना अबुल कलाम आझाद |
भारताचे पहिले शिक्षणमंत्री |
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन |
विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष |
प्रा.सय्यद राऊफ |
महाराष्ट्रात पहिली ते सातवीचा एकसारखा
अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी अभ्यासक्रमांचा मसुदा तयार करण्याचे काम केले. |
अनुताई वाघ. |
कोसबाड प्रकल्प |
(२) ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ या संस्थेची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा व ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहा
उत्तर:
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
उत्तर:
१) भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे, याची प्रचिती आपणांस स्वतंत्र भारतातील पहिल्या इ.स.१९५१ च्या जनगणनेत
आली.
२)देशातील
साक्षरतेचे प्रमाण वाढवणे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘खडू-फळा’ योजना सुरू करून प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला गती दिली.
३) १९९४ मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या
सार्वत्रिकीकरणासाठी ‘जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम’ (DPEP) सुरू करण्यात आला.
(२) NCERT ची स्थापना करण्यात आली.
उत्तर:
१) केंद्र
सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत, सर्वंकष धोरणासंदर्भात
मदत करणे.
२)सरकारला
शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे.
३)
शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण,
विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे.
यांसारखी कामे पार पाडता यावी म्हणून केंद्र शासनाने १ सप्टेंबर १९६१ रोजी दिल्ली येथे NCERT या संस्थेची स्थापना करण्यात आली.
(३) भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला.
उत्तर:
१) गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला
अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले.
२) संशोधन, मृदाशास्त्र, कृषिशास्त्र, वनस्पतिशास्त्र इत्यादींच्या अभ्यासाला
सुरुवात झाली.
२) संस्थेची
सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या
पद्धतींविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले.
या संस्थेने
केलेल्या शेतीविषयक संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना झाला.
शैक्षणिक वाटचाल इयत्ता नववी स्वाध्याय | शैक्षणिक वाटचाल प्रश्न उत्तरे
इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf | इयत्ता नववी इतिहास धडा पाचवा स्वाध्याय
४. टीपा लिहा.
(१) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
उत्तर:
१) देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा
नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
२)१९७० मध्ये भारत
सरकारचेशिक्षण व समाजकल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त
विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली.
३) १९७४ मध्ये सरकारने पी.पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखालील
समितीने केलेल्या सूचनांनुसार व शिफारशीनुसार २० सप्टेंबर १९८५ साली मुक्त
विद्यापीठ आकारास आले.
४) मुक्त
विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना
प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली.
५) विद्यापीठाने विविध शाखांमधून एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात ५८ प्रशिक्षण केंद्रे, परदेशात ४१ केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली.
(२) कोठारी आयोग
उत्तर:
१) १९६४ मध्ये डॉ.डी.एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली
एक आयोग नेमण्यात आला.
२) या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व
विद्यापीठ स्तरावरील १०+२+३ या आकृतिबंधाचा पुरस्कार केला.
३) कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा, हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश
करावा असे उपक्रम सुचवले.
४) अनुसूचित जाती- जमातींसारख्या उपेक्षित घटकांस
प्राधान्य देणे, सरकारी
अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी केल्या.
५)राष्ट्रीय
एकात्मता, शिक्षणाचे आधुनिकीकरण करणे , लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन करणे इत्यादी
शिक्षणाची उद्दिष्ट्ये कोठारी आयोगाने निश्चित केली होती.
(३) भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर
उत्तर:
१)अणुविज्ञानाच्या
संशोधनासाठी भारत सरकारने फंडामेंटल रिसर्च संस्थेची व अणुशक्तीची मंडळाची स्थापना
केली. डॉ. होमी भाभा हे या दोन्ही संस्थांचे संचालक होते.
२) या संस्थेने
न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयांत मोलाचे
संशोधन केले.
३) अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण
देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले.
४)अणुभट्ट्यांच्या
माध्यमातून अणुविज्ञानाचा तसेच किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती करून शेती, उद्योग
व वैद्यक या क्षेत्रांत त्याचा उपयोग केला जातो.
(४) बालभारती
उत्तर:
१) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम
संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे
झाली.
२) इयत्ता १
ली ते १२ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम
बालभारती करते.
३)मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू,
कन्नड, सिंधी, गुजराती,
तेलुगु या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात.
४)‘किशोर’ हे
विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते.
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) ‘खडू-फळा’
(ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता ?
उत्तर:
१) १९८८ मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा
प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘खडू-फळा’ योजना सुरू केली. ही योजना
‘ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ या नावाने ओळखली जाते. या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश
होता.
२)प्राथमिक
शाळांचा दर्जा सुधारणे.
३)किमान
शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे.
४) सुयोग्य
अशा दोन वर्गखोल्या , स्वच्छतागृह यांची उपलब्धता.
५) दोन
शिक्षकांपैकी एक स्त्री शिक्षिकेची नियुक्ती.
६) फळा, नकाशा, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यांसाठी सरकारने शाळांना निधी
उपलब्ध करून देणे.
(२) शेतीच्या
विकासात कृषी विद्यालये/महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात?
उत्तर: शेतीच्या
विकासात कृषी विद्यालये/महाविद्यालये पुढील महत्वाची भूमिका बजावतात:
१)कृषी
विद्यालये कृषी क्षेत्राचा विकास करण्यावर भर देतात.
२) सुसज्ज
प्रयोगशाळा उभारून त्यामध्ये गहू, कडधान्ये, गाळीताची पिके, भाजीपाला इत्यादींवर
प्रयोग केले जातात.
३) ही महाविद्यालये मृदाशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र इत्यादी विभागान्द्वारे उपक्रम राबवतात.
(३) भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा.
उत्तर:
१) स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी
१९४९ मध्ये ‘भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदे’ची (ICMR) स्थापना
झाली.
२) विविध रोगांवर संशोधन करणारी २६ केंद्रे देशभरात
सुरू झाली.
३) या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर
नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
४) प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना
देण्यासाठी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (AIIMS) या संस्थेची स्थापना झाली.
५)या संस्थेने
वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये स्थापन केली.
६)सुसज्ज
सार्वजनिक इस्पितळे सुरु केली.
७) सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध
करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र
महाविद्यालये स्थापन करण्यात आली.
८) हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या
संस्थेने काढली.
९) वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी १९५८ मध्ये
‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेचे पुनर्गठन केले.
१०)आयुर्वेद व कर्करोग शिक्षण क्षेत्रातील संस्थाही कार्यरत असून आपल्या क्षेत्रात संशोधनाचे व सेवेचे कार्य करीत आहेत.
(४) तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा.
उत्तर:
आमच्या शाळेत
आयोजित करण्यात येणारे उपक्रम
१)वृक्षलागवड
कार्यक्रम
२) बाल आनंद
मेळावा
३) स्वच्छता
उपक्रम
४) आरोग्य
साप्ताह
५) क्षेत्रभेट
उपक्रम
इयत्ता नववी इतिहास धडा पाचवा स्वाध्याय | इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय
Shaikshanik Vatchal swadhyay prashn uttare | Shaikshanik Vatchal Swadhyay Iyatta Navavi
✏✏✏✏✏