इतिहासाची साधने इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 1 question answers
Class 9 history questions and answers | History guide for class 9 maharashtra board | History class 9 chapter 1 solution | 9th history chapter 1 question answers
प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारताचे
राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे आहे.
(अ) पुणे
(ब) नवी
दिल्ली
(क) कोलकता
(ड) हैदराबाद
उत्तर: भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.
(२)
दृक्-श्राव्य साधनांमध्ये.......... या साधनाचा समावेश होतो.
(अ) वृत्तपत्र
(ब) दूरदर्शन
(क) आकाशवाणी
(ड)
नियतकालिके
उत्तर: दृक्-श्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो.
(३) भौतिक
साधनांमध्ये .......... चा समावेश होत नाही.
(अ) नाणी
(ब) अलंकार
(क) इमारती
(ड) म्हणी
उत्तर: भौतिक साधनांमध्ये म्हणी चा समावेश होत नाही.
इतिहासाची साधने इयत्ता नववी स्वाध्याय | इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf | इयत्ता नववी इतिहास पहिला धडा स्वाध्याय
प्रश्न (ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
व्यक्ती |
विशेष |
जाल कूपर - टपाल तिकिट अभ्यासक |
|
कुसुमाग्रज - कवी |
|
अण्णाभाऊ साठे - लोकशाहीर |
|
अमर शेख - चित्रसंग्राहक |
उत्तर: अमर
शेख - चित्रसंग्राहक
दुरुस्त
केलेली जोडी : अमर शेख - शाहीर
प्रश्न २. टीपा लिहा.
(१) लिखित साधने
उत्तर:
१)इतिहास लेखनाचे
अत्यंत विश्वसनीय साधन म्हणून लिखित साधनांना ओळखले जाते.
२)वृत्तपत्रे,
ग्रंथ, रोजनिशी, पत्रव्यवहार, नियतकालिके अशा प्रकारच्या छापील साहित्याच्या लिखित
साधनात समावेश होतो.
३)लिखित
साधनांच्या माध्यमातून आपल्याला चळवळी, सांस्कृतिक जीवन, सामाजिक प्रथा, प्रशासकीय
धोरणे, समाजाची प्रगती, समाजजीवनातील घडामोडी यांसारख्या बाबींचा अभ्यास करता
येतो.
(२) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
उत्तर:
१)जगभरातील महत्त्वाच्या
घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे.
२) १९५३ नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी वृत्तलेख,
छायाचित्रे, आर्थिक , वैज्ञानिक विषयांवरील माहिती वृत्तपात्रांना पुरवण्याचे काम
पीटीआय ने केले आहे. १९९० च्या दशकात पीटीआय ने उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे
बातम्या देशभर पाठवायला सुरुवात केली.
३)पीटीआय या
वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात. पीटीआय ही एक
सरकार वृत्तसंस्था आहे. म्हणूनच हा मजकूर इतिहासलेखनासाठी महत्वाचा व उपयुक्त असतो.
इयत्ता नववी इतिहास पहिला धडा स्वाध्याय | इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय
Etihasachi sadhan swadhyay prashn uttare | Etihasachi Sadhane Swadhyay Iyatta Navavi
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
उत्तर:
१) भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये
विविध बदल घडून आलेले आहेत.
२) तिकिटांच्या आकारांतील वैविध्य, विषयांतील नावीन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे
आपणांस बदलत्या काळाविषयी सांगत असतात.
३) टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखाद्या
घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण,
अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक,
त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते.
अशा रीतीने टपाल
खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा
आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते.
(२) आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.
उत्तर:
१) दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना ‘दृक्-श्राव्य साधने’ असे म्हणतात.
२)अशा
माध्यमांमुळे चालू असलेल्या घटनांचे चित्रीकरण करता येते.
३)समाजकारण,
क्रीडा, राजकारण, कला, ऐतिहासिक वस्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना
आपल्याला गरजेच्या वेळी पुन्हा पाहता आणी ऐकता येतात.
४) भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व
अनुबोधपट उपयोगी आहे.
म्हणून आधुनिक
भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य
माध्यमे महत्त्वाची असतात.