भारतापुढील अंतर्गत आव्हाने इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 3 question answers
Bhartapudhil Antargat Aavhane Swadhyay Iyatta Navavi | Class 9 history questions and answers | History class 9 chapter 3 solution | 9th history chapter 3 question answers
१. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) ‘आनंदपूर
साहिब’ या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या?
उत्तर: ‘आनंदपूर
साहिब’ या ठरावात अकाली दलाने पुढील मागण्या केल्या:
१) त्यानुसार चंदीगढ
पंजाबला द्यावे.
२) इतर
राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत.
३)सैन्यामधील शिखांचे
संख्याप्रमाण वाढवावे.
४)पंजाब
राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी.
(२) जमातवाद
नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे?
उत्तर: जमातवाद
नष्ट करण्यासाठी आपण पुढील गोष्टी केल्या पाहिजेत :
१) भिन्नधर्मीय
लोकांत आपण मिसळले पाहिजे.
२)परस्परांच्या
सण-उत्सवांत सहभागी झाले पाहिजे.
३)एकमेकांच्या
चांगल्या चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत.
४)आपल्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नांकडे आपणांस तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये.
भारतापुढील अंतर्गत आव्हाने इयत्ता नववी स्वाध्याय | भारतापुढील अंतर्गत आव्हाने प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf
(३) प्रदेशवाद
केव्हा बळावतो ?
उत्तर:
१) ‘प्रदेशवाद’ म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान
बाळगणे होय.
२) . आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा
अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. तेव्हा प्रदेश वाद बळावतो.
३) विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते.
४) स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करायचा प्रयत्न करतात. यातून प्रदेशवाद बळावतो.
Bhartapudhil Antargat Aavhane swadhyay prashn uttare | Bhartapudhil Antargat Aavhane Swadhyay Iyatta Navavi | Class 9 history questions and answers
२. टीपा लिहा.
(१) जमातवाद
उत्तर:
१) संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो.
२) जेव्हा आपल्या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो
तेव्हा त्याचे रूपांतर दुरभिमानात होते.
३) प्रत्येकाला
मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सर्व तुच्छ वाटतात. यातून जमातवाद निर्माण होतो.
४) धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो.
(२) प्रदेशवाद
उत्तर:
१) ‘प्रदेशवाद’ म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय.
२) आपल्या
प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप
प्राप्त होते. तेव्हा प्रदेश वाद बळावतो.
३) विकासातील
असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते.
४) स्थानिक
परंपरा,
संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करायचा
प्रयत्न करतात. यातून प्रदेशवाद बळावतो.
५) प्रदेश
वादामुळे देशाच्या एकात्मतेला तडा जातो.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करावे लागले.
उत्तर:
१) १९८० मध्ये पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान’ चळवळ
सुरु झाली आणी ती पुढे तीव्र बनली.
२) खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्याभोवती
सशस्त्र अनुयायी गोळा झाले आणी दहशतवादी
अतिरेकी कारवायांना सुरुवात केली.
३) भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळाचा आश्रय
घेतला . भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन
अतिरेकी कारवायांना सुरुवात केली.
४) परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबातील
शांतता धोक्यात आली.
५) सुवर्णमंदिरातून
दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी आणि पंजाबात शांतात प्रस्थापित करण्यासाठी केंद्र
सरकारला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करावे लागले.
(२) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.
उत्तर:
१) संकुचित
धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो.
२) धर्मांधता
हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो.
३) जमातवादामुळे परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले
जाते.
४) नागरिक
म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणेही अशक्य होऊन बसते.
५) सार्वजनिक शांतता नष्ट होते.
६) माणसामाणसांतील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो.
तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो.
म्हणून, जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.
४. पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा.
(१) MNF
उत्तर: ‘मिझो नॅशनल फ्रंट’
(२) NNC
उत्तर: ‘नागा नॅशनल कौन्सिल’
(३) PLGA
उत्तर: पीपल्स
लिबरेशन गुरिला आर्मी
Class 9 history questions and answers | History class 9 chapter 3 solution \ 9th history chapter 3 question answers
✏✏✏✏✏✏✏