9vi bhugol swadhyay 2 Antargat halchali | स्वाध्याय अंतर्गत हालचाली इयत्ता नववी भूगोल
- अंतर्गत हालचाली प्रश्न उत्तरे
- स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा २
- इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय २
- अंतर्गत हालचाली स्वाध्याय 9वी
प्रश्न १. अचूक पर्यायासमोरील चौकटीत ✔ अशी खूण करा.
(अ)
अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत?
भूरूपांवर |
|
गतीवर |
✔ |
दिशेवर |
|
(आ) मंद
हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय
निर्माण होतो?
दाब |
|
ताण |
✔ |
पर्वत |
|
(इ) खचदरी
निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते?
ताण |
✔ |
दाब |
|
अपक्षय |
|
(ई) खालीलपैकी
‘वली पर्वत’ कोणता?
सातपुडा |
|
हिमालय |
✔ |
पश्चिम घाट |
|
(उ) विस्तीर्ण
पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे?
पर्वतनिर्माणकारी |
|
खंडनिर्माणकारी |
✔ |
क्षितिजसमांतर |
|
प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.
(अ)हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या.कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.
उत्तर:
१) हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप झाला
असता, जमीन हादरते.
२) प्राथमिक लहरींच्या मार्गातील
पदार्थांतील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होते. याउलट
दुय्यम लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल हे लहरींच्या दिशेशी लंबरूप
व उर्ध्वगामी होत असते.
३) भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर
सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात. त्यामुळे भूकंपानंतर
हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी जोरजोरात मागे-पुढे
हल्ल्य व त्यानंतर वेगाने खाली कोसळल्या.
(आ) मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.
उत्तर:
अ) मेघालय पठार निर्मिती
१) अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजसमांतर व
एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण
होतो,
त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून आेळखले जातात.
अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जालहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग
तयार होतात. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो.
२) मेघालय पठार हे अशा प्रकार निर्माण झाले आहे. मेघालय पठार मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहे.
आ) दख्खन पठार निर्मिती
१) ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस
ज्या वेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो, त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात.
२) ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ
तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार
होतात.
३) भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या
ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे.
(इ) बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.
उत्तर:
१) वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा., जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
२) भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो.
३)त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणवर तप्त असे घन , द्रव आणि वायू पदार्थ भू पृष्ठावर फेकले जाण्यास वाव मिळतो. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.
Antargat halchali Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 2 question answer in marathi | Chapter 2 geography 9th class marathi
(ई) बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
उत्तर:
१) काही काळासाठी शांत असतो व पुन्हा
कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/ निद्रिस्त ज्वालामुखी
म्हणतात.
२) बॅरन बेटावर असणारा ज्वालामुखी हा काही
काळ शांत आणि कधीतरी एकदम जागृत होतो. या ज्वालामुखी चा उद्रेक हा केंद्रीय
स्वरूपाचा असतो.
३) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या
आक्रात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
(उ) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.
उत्तर:
१) ज्वालामुखी तसेच भूकंपक्षेत्राचा विस्तारही
या सीमावर्ती भागात दिसून येतो.
२)ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी मोठ्या
प्रमाणवर उर्जेचे उत्सर्जन होते यामुळे भूकवचास हादर बसू शकतात.
३) अशा प्रकारे, ज्वालामुखीच्या
उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.
अंतर्गत हालचाली प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा २
इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय २ | अंतर्गत हालचाली स्वाध्याय 9वी
प्रश्न ३. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा.
(अ) किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात.
उत्तर:शीघ्र
भू-हालचाली
(आ) हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे.
उत्तर: मंद भू-हालचाली
(इ) पृथ्वी च्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो.
उत्तर: शीघ्र
भू-हालचाली
(ई) प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते.
उत्तर:
मंद भू-हालचाली
प्रश्न ४. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा.
(अ) पृथ्वीचा
पृष्ठभाग हलतो.
(आ) भूपट्ट
अचानक हलतात.
(इ)
प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.
(ई) कमकुवत
बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.
(उ) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.
उत्तर:
(आ) भूपट्ट
अचानक हलतात.
(इ)
प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.
(ई) कमकुवत
बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.
(उ) साठलेली
ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.
(अ) पृथ्वीचा
पृष्ठभाग हलतो.
प्रश्न ५. फरक स्पष्ट करा.
(अ) गट पर्वत व वली पर्वत
उत्तर:
गट पर्वत |
वली पर्वत |
१)अंतर्गत
हालचालींमुळे क्षितिजसमांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण
होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. |
१) पृथ्वीच्या
अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिजसमांतर
व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. |
२. दोन
समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग वर उचलला जातो, तेव्हा हा
उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसणारे गटपर्वत होत. |
२. दाब
तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली
पर्वतांची निर्मिती होते. |
३.उदा. भारतातील
मेघालय पठार, युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. |
३. उदा. हिमालय, अरवली,
रॉकी, अँडीज, आल्प्स
हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. |
9th class bhugol chapter 2 Antargat halchali question answer | 9th std bhugol chapter 2 quesiton answer | Geography chapter Antargat halchali question answer in marathi
(आ) प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी
उत्तर:
प्राथमिक भूकंप लहरी |
दुय्यम भूकंप लहरी |
१. भूगर्भात
ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. |
१. प्राथमिक
लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हटले जाते. |
२. या
लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू
शकतात. |
२.या लहरी फक्त घन माध्यमातून प्रवास करू शकतात. |
३. या
लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या
दिशेने पुढे-मागे होतात. |
३. या
लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या
दिशेने म्हणजेच वरखाली होतात |
४.प्राथमिक भूकंप लहरी या दुय्यम भूकंप
लहरींपेक्षा कमी विध्वंसक असतात. |
४. प्राथमिक
लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. |
(इ) भूकंप व ज्वालामुखी
उत्तर:
भूकंप |
ज्वालामुखी |
१. भूपृष्ठाच्या
अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट
मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथे
ऊर्जेचे उत्सर्जन होऊन भूपृष्ठ कंप पावते म्हणजेच भूकंप होय. |
१. पृथ्वीच्या
प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ
पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. |
२.भूकंपामुळे काही प्रदेश थोड्या प्रमावर
उंचावतात, तर काही प्रदेश खचतात. |
२.शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे ही
ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होतात. |
३.भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असा
नाही. |
३.ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी शिलारस भूपृष्ठावर
येतो. |
प्रश्न ६. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.
उत्तर:भूकंप
होण्याची खालील प्रमाणे आहेत:
१) भूपट्ट सरकल्यामुळे किंवा भूपट्ट
एकमेकांवर आदळल्यामुळे भूकंप होतो.
२) भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे
यामुळेहि भूकंप होतो.
३) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण
निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतो.
४) ज्वालामुखींचे उद्रेक झाल्याने देखील भूकंप
होतात.
(आ) जगातील
प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत?
उत्तर:
१)जगातील
प्रमुख वली पर्वत हे पर्वतनिर्मान्कारी मद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.
२) उदा., हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स इ. वली पर्वत हे पर्वतनिर्मान्कारी मद भू-हालचालींमुळे निर्माण
झाले आहेत.
(इ) भूकंपाची
तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे?
उत्तर:
१) भूकंपाची तीव्रता हे अधिक असल्यास
घरांची पडझड मोठ्या प्रमाणावर होते.
२) भूकंप होत असताना भूकंपाच्या प्राथमिक लहरींनंतर
दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहचतात या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक
असतात.
३) या लहरींच्या मार्गातील पदार्थांतील
कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरुप व उर्ध्वगामी असते. त्यमुळे भूपृष्ठावरील
इमारती घरे वरखाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते.
(ई) भूकंपाचे
भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते?
उत्तर:
भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे :
अ) भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम :
१) जमिनीला तडे पडतात.
२) भूमिपात होऊन दरडी कोसळतात.
३) काही
वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा., विहिरींना पाणी येते किंवा
विहिरी कोरड्या पडतात.
४) काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.
५) सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार
होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
६) हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात.
आ)मानवी जीवनावर होणारे परिणाम:
७) इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी
होते.
८) वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.
९) संदेशवहन व्यवस्था कोलमडते.
(उ) भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर: भूकंप
लहरींचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
१) प्राथमिक भूकंप लहरी : १]
भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात.२] या
लहरी घन,
द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात.३] या लहरींच्या
मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने
पुढे-मागे होतात.४]प्राथमिक भूकंप लहरी या दुय्यम भूकंप लहरींपेक्षा कमी विध्वंसक
असतात.
२) दुय्यम भूकंप लहरी:१] प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हटले जाते.२]या लहरी फक्त घन माध्यमातून प्रवास करू शकतात. ३] या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात.४] प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.
३)भूपृष्ठ लहरी:1] प्राथमिक
व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते.
2] या लहरी भूकवचात पृथ्वीच्या
परिघाच्या दिशेत प्रवास करतात. ३] भूपृष्ठ लहरी अतिशय विनाशकारी असतात.
- Std 9 geography chapter 2 question answer in marathi
- Chapter 2 geography 9th class marathi
(ऊ) ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.
उत्तर:
ज्वालामुखींचे वर्गीकरण खालील प्रमाणे केले जाते.
अ]
उद्रेकानुसार वर्गीकरण: उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे
दोन प्रकार पडतात:
(१) केंद्रीय ज्वालामुखी :
१)उद्रेकाच्या
वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो.
२)बाहेर आलेला
लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी
पर्वत तयार होतात.
३)उदा: जपानमधील फुजियामा, टांझानियातील
कि लीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची
उदाहरणे आहेत.
(२) भेगीय ज्वालामुखी :
१)ज्वालामुखीचा उद्रेक होताना
लाव्हारस ज्या वेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो, त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात.
२) ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या
दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
३)उदा : भारतातील
दख्खनचे पठार.
अ] उद्रेकाच्या
कालावधीनुसार वर्गीकरण : उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे
तीन प्रकार पडतात.
१) जागृत ज्वालामुखी :
१)वर्तमानात
वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी
होय.
२)उदा., जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
२) सुप्त/ निद्रिस्त ज्वालामुखी :
१) ज्वालामुखी
हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/ निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात.
२)उदा., इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.
३)मृत ज्वालामुखी :
१)ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला
नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला
मृत ज्वालामुखी म्हणतात.
२)उदा., टांझानियातील किलीमांजारो.
प्रश्न ७. आकृतीच्या साहाय्याने अपिेकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा.
उत्तर:
प्रश्न ८. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा.
(अ) माउंट
किलीमांजारो.
(आ) मध्य
अटलांटिक भूकंपक्षेत्र.
(इ) माउंट
फुजी.
(ई) क्रॅकाटोआ
(उ) माउंट
व्हेसुव्हियस
उत्तर:
**********************