४. आर्थिक विकास स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी | Aarthik Vikas Swadhyay Prashn Uttare 9vi

इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf इयत्ता नववी इतिहास धडा चौथा स्वाध्याय इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय Aarthik Vikas swadhyay prashn uttare
Admin

आर्थिक विकास इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 4 qestion answers

Aarthik Vikas Swadhyay Iyatta Navavi | Class 9 history questions and answers | History class 9 chapter 4 solution | 9th history chapter 4 question answers


१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून  विधाने पूर्ण करा.

 

(१) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख  ........... बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात  आले.

(अ) १२

(ब) १४

(क) १६

(ड) १८

उत्तर: १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख  १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात  आले.

 

Aarthik Vikas swadhyay prashn uttare Aarthik Vikas Swadhyay Iyatta Navavi Class 9 history questions and answers History class 9 chapter 4 solution 9th history chapter 4 question answers

(२) वीस कलमी कार्यक्रमाची.............  यांनी घोषणा केली.

(अ) पं.नेहरू

(ब) लालबहादूर शास्त्री

(क) इंदिरा गांधी

(ड) पी.व्ही.नरसिंहराव

उत्तर: वीस कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी  यांनी घोषणा केली.

 

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

(१) कावसजी दावर - पोलादाचा कारखाना

(२) डॉ.दत्ता सामंत - गिरणी कामगारांचे   नेतृत्व

(३) ना.मे.लोखंडे - गिरणी कामगारांना सुट्टी

(४) नारायण सुर्वे - कवितांद्वारे  श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन

उत्तर: कावसजी दावर - पोलादाचा कारखाना

 

आर्थिक विकास इयत्ता नववी स्वाध्याय | आर्थिक विकास प्रश्न उत्तरे
इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf | इयत्ता नववी इतिहास धडा चौथा स्वाध्याय

२. (अ) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

पंचवार्षिक योजना

कालावधी

उद्‌दिष्टे

पहिली

१९५१-१९५६

शेती, सामाजिक  विकास

दुसरी

१९५६-१९६१

औद्योगिकीकरण

तिसरी

१९६१-१९६६

विषमतेचे निर्मुलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ.

चौथी

१९६९-१९७४

शास्त्रीयसंशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन......

पाचवी

१९७४-१९७९

दारिद्र्यनिर्मूलन , देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.


 

(ब) टीपा लिहा.


(१) मिश्र अर्थव्यवस्था

उत्तर:

१) मिश्र अर्थव्यवस्था खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते.

२) आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्थे’ला भारताने प्राधान्य दिले.

३)या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्याव्स्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो.

४) नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो.

५) या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते.


(२) वीस कलमी कार्यक्रम

उत्तर:

१) १ जुलै १९७५ रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा केली . या कार्यक्रमात खालील प्रमुख तरतुदी करण्यात आल्या.

२) शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे.

३) कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे.

४) करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे.

५) जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे.

६) हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.


इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | Aarthik Vikas swadhyay prashn uttare | Aarthik Vikas Swadhyay Iyatta Navavi


३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१)स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.

उत्तर: स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला कारण :

१) मिश्र अर्थव्यवस्था खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते.

२)या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्याव्स्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो.

३) नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो.

४) या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते.

५) दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो.

        म्हणून स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.

 

(२) १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

उत्तर: १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले कारण :

१)बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर बँकांना मिळणारा नफ्याची सरकारी खजिन्यात भर पडणार होती, त्यामुळे एखादी योजना राबवताना तुट निर्माण झाली तर ती भरून  काढता येणार होती.

२) लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते.

३) लालबहादूरशास्त्री यांनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यांवर मात करण्यासाठी हरितक्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता.

४) प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या ‘काँग्रेस फोरम फॉर सोशॅलिस्ट ॲक्शन’ या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे अशी मागणी केली.

म्हणून , १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


(३) गिरणी कामगार संपावर गेले.

उत्तर:

१) ८० च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रांतील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती.

२) काही उद्योगांत कामगारांचे पगार वाढत होते. त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या.

३) १९८१ च्या दिवाळीत कामगारांना २०% बोनसची अपेक्षा होती.

४) कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून, कामगार वर्गाला विश्वासात न घेता ८ ते १७% वर तडजोड केली.

५) बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली.

म्हणून गिरिणी कामगार संपावर गेले.


४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

 

(१) आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले?

उत्तर: आठव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले:

१)प्रधानमंत्री रोजगार योजना

२)महिला समृद्धी योजना

३)राष्ट्रीय सामाजिक, आर्थिक साहाय्य योजना

४)मध्यान्ह आहार योजना

५) इंदिरा महिला योजना

६)गंगा कल्याण योजना

 

(२) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले?

उत्तर:

१) दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने.

२) सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना.

३) चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना.

४) पेरांबुरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना.

५) विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना.

६) शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आले.

इत्यादी प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरु करण्यात आले.

✏✏✏✏✏

Post a Comment