७. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Aantarrastriy Varresha Swadhyay class 9

आंतरराष्ट्रीय वाररेषा प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 7Aantarrastriy Varresha Swadhyay class 9 Std 9 geography chapter 7 question answer
Admin

9vi bhugol swadhyay 7 Aantarrastriy Varresha | स्वाध्याय आंतरराष्ट्रीय वाररेषा इयत्ता नववी भूगोल

  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 7
  • आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय 9वी    
  • Aantarrastriy Varresha Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 7 question answer in marathi

 

Aantarrastriy Varresha Swadhyay class 9 Std 9 geography chapter 7 question answer in marathi Chapter 7 geography 9th class marathi 9th class bhugol chapter 7 Aantarrastriy Varresha question answer 9th std bhugol chapter 7 quesiton answer Geography chapter Aantarrastriy Varresha question answer in marath


प्रश्न १. खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धांतील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा

 


Aantarrastriy Varresha Swadhyay class 9 Std 9 geography chapter 7 question answer in marathi Chapter 7 geography 9th class marathi


उत्तर: 


अ) मंगळवार १६ ऑगस्ट सकाळचे ६.००


ब) २४ डिसेंबर रात्रीचे २.००


 

प्रश्न २. खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा.


(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल?

(१) पूर्वेकडून पश्चिमेकडे.

(२) पश्चिमेकडून पूर्वेकडे.

(३) दक्षिणेकडून उत्तरेकडे.

(४) उत्तरेकडून दक्षिणेकडे.

उत्तर: (१) पूर्वेकडून पश्चिमेकडे.

 

 

(आ) जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील?

(१) बुधवार सकाळचे सहा.

(२) बुधवार रात्रीचे नऊ.

(३) गुरुवार दुपारचे दोन.

(४) गुरुवार संध्याकाळचे सहा.

उत्तर: बुधवार रात्रीचे नऊ.

 

(इ) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो?

(१) ०°

(२) ९०° पूर्व

(३) ९०° पश्चिम

(४) १८०°

 उत्तर: (४) १८०°

 

 

(ई) पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?

(१) पूर्व

(२) पश्चिम

(३) उत्तर

(४) दक्षिण

उत्तर: (२) पश्चिम

 

 

(उ) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते?

(१)  जी. पी. एस. प्रणाली

(२) संरक्षण खाते.

(३) वाहतुकीचे वेळापत्रक.

(४) गोलार्ध ठरवण्यासाठी.

उत्तर: (३) वाहतुकीचे वेळापत्रक.

 

9th class bhugol chapter 7 Aantarrastriy Varresha question answer | 9th std bhugol chapter 7 quesiton answer | Geography chapter Aantarrastriy Varresha question answer in marath


प्रश्न ३. भौगोलिक कारणे लिहा.

 

(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची  ठरत आहे.

उत्तर:

१)आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते.

२)जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते.

३)आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते.

 


(आ) पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

उत्तर:

१)  आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

२) ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती, तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते.

३) शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते.

४) त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरु होतो व संपतो. म्हणजेच पृथ्वीवरील नवीन दिवस हा पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

 

आंतरराष्ट्रीय वाररेषा प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 7 | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 7 | आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय 9वी    


प्रश्न ४. थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत?

उत्तर:

१)अंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरु होते. या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो.

२)१८० अंश रेखावृत्ताची रेषा काही देशांत जमिनीवरून जाते त्यामुळे ही रेषा आंतरराष्ट्रीय वाररेषा धरली तर एकाच देशात/प्रदेशात/भूभागात दोन वेगळे वार व तारखा असा गोंधळ झाला असता.

३)  त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना ती पूर्णपणे समुद्रातून जावी ही प्रमुख बाब विचारात घेतली गेली आहे.

४) त्याचप्रमाणे एकाच देशाचा बेटांचा समूह हासुद्धा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या आखताना ती रेषा एकाच बाजूस असावी अशी बाबा विचारात घेतलेली आहे.

५) त्यामुळे १८९ अंश रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना ही काही प्रसंगी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वळवण्यात आली आहे.

 

Aantarrastriy Varresha Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 7 question answer in marathi | Chapter 7 geography 9th class marathi


आ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल?

उत्तर:

१)  पूर्वेकडे प्रवास करत असताना जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली,  तर आहे त्या वार व तारखेचा मागचा वार व तारीख ग्राह्य धरू.

२)  पश्चिमेकडे प्रवास करत असताना जर जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली,  तर आहे त्या वार व तारखेचा पुढचा वार व तारीख ग्राह्य धरू.

 

 

(इ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही?

उत्तर:

१)  आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती, तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती.

२) पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते.

३) शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्तासारखी सरळ नाही.

 

आंतरराष्ट्रीय वाररेषा प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 7 | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 7


(ई) आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही?

उत्तर:

१)आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती, तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती.

२)पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते.

३) शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही.

 


(उ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते?

उत्तर:

१)काही ठराविक ठिकाणांचा अपवाद वगळताना १८० अंश रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागरपृष्ठावरून जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषासुद्धा सागरावरून आखण्यासाठी १८० अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली गेली.

 

 


प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर  करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

उत्तर:


मार्ग

आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल का ?

(अ) मुंबई- लंडन- न्यूयॉर्क- लॉसएंजिलिस- टोकियो.

होय

(आ) दिल्ली- कोलकाता- सिंगापूर- मेलबर्न.

नाही

(इ) कोलकाता- हाँगकाँग- टोकियो- सॅनफ्रॅन्सिस्को.

होय

(ई) चेन्नई- सिंगापूर- टोकियो- सिडनी- सांतियागो

होय

(उ) दिल्ली- लंडन- न्यूयॉर्क

नाही





*****************



Post a Comment