3. बाह्यप्रक्रिया भाग-१ स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Bahyaprakriya Bhag 1 Swadhyay class 9

बाह्यप्रक्रिया भाग-१प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 3 इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 3 Bahyaprakriya Bhag 1 Swadhyay Std 9 geography
Admin

9vi bhugol swadhyay 3 Bahyaprakriya Bhag 1 | स्वाध्याय 3.  बाह्यप्रक्रिया भाग-१ इयत्ता नववी भूगोल

  • बाह्यप्रक्रिया भाग-१प्रश्न उत्तरे
  • स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 3
  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 3


प्रश्न १. थोडक्यात उत्तरेलिहा.


(अ) कायिक विदारण म्हणजेकाय?

उत्तर:

१) खडकांचे फुटणे, तुटणे, खडकाचे भाग विलग होणे, यांसारख्या प्रक्रिया खडकांच्या रासायनिक स्वरुपात कोणतेही बदल न होता घडून येतात त्याला कायिक विदारण असे म्हणतात.

२)अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड-विखंडन या कायिक विदारांच्या प्रक्रिया आहेत.


 

Chapter 3 geography 9th class marathi 9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag 1 question answer 9th std bhugol chapter 3 quesiton answer Geography chapter Bahyaprakriya Bhag 1 question answer in marathi


(आ)रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते?

 उत्तर:

१) रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्यांचे नैसर्गिक विघटन होणे, म्हणजे रासायनिक अपक्षय होत.

२)कर्बनन, द्रविकर्ण आणि भ्स्मिकर्ण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत.

३) पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असताना त्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात.

४)मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात.

५) खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. या प्रक्रियेस भ्स्मिकरण असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे रासायनिक विदारण होते.

 

(इ) जैविक विदारण कसे घडून येते?

उत्तर:

१)मानव, वनस्पती आणि प्राणी या सजीवांकडून जैविक विदारण घडून येते.

२) जुन्या वस्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढल्याने खडकांच्या कणांत ताण निर्माण होतो  व खडक फुटू लागतात.

३)उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी-कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्वप्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. त्यांच्या खननामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते.

४)अनेकदा खडकांवर शेवाळे/हरिता, दगडफूल  इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते.

 

9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag 1 question answer | 9th std bhugol chapter 3 quesiton answer | Geography chapter Bahyaprakriya Bhag 1 question answer in marathi

 

(ई) विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा.

उत्तर:

१) खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात.

२) विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे, या प्रक्रियेला ‘विस्तृत झीज’ असे म्हणतात.

३) कायिक विदारण ,रासायनिक विदारण आणि जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार आहेत.

४) मंद गतीने होणारी विस्तृत झीज आणि तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीज चे प्रकार आहेत.

 

 

प्रश्न २. चूक की बरोबर तेलिहा. चुकीची विधानेदुरुस्त करा.


(अ) भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.

उत्तर: चूक.

भुकंपावर प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होतो.

 

(आ)  आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.

उत्तर: बरोबर

 

(इ) शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.

उत्तर: बरोबर

 

(ई) खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.

उत्तर:बरोबर

 

(उ) अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते.

उत्तर: चूक .

बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते.

 

Bahyaprakriya Bhag 1 Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 3 question answer in marathi | Chapter 3 geography 9th class marathi


प्रश्न ३. खालील ओघतक्ता पूर्ण करा

उत्तर:

 

 

Chapter 3 geography 9th class marathi 9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag 1 question answer 9th std bhugol chapter 3 quesiton answer Geography chapter Bahyaprakriya Bhag 1 question answer in marathi


प्रश्न  ४. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.


(अ) काही प्राणी जमिनीत बिळेतयार करून राहतात.

उत्तर: जैविक विदारण

 

(आ) खडकातील लोहावर गंज चढतो.

उत्तर: रासायनिक विदारण

 

(इ) खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो.

उत्तर: कायिक विदारण

 

(ई) थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडेजातात.

उत्तर: कायिक विदारण

 

(उ) ओसाड प्रदेशात वाळूतयार होणे.

उत्तर: कायिक विदारण .

 

 

प्रश्न५. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.

उत्तर:------------------------

 


******************


Post a Comment