Iyatta 9vi Vishay Marathi Vandya vande mataram | इयत्ता 9vi मराठी वंद्य ‘वन्दे मातरम्’
इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती | 9th standard Marathi digest pdf | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet
१.
वंद्य ‘वन्दे मातरम्’
ग.
दि. माडगूळकर (१९१९-१९७७) : प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, पटकथालेखक, कादंबरीकार,
गीतरामायणकार. ‘जोगिया’, ‘चैत्रबन’, ‘वैशाखी’, ‘पूरिया’
इत्यादी गीतसंग्रह; ‘गीतगोपाल’, ‘गीतसौभद्र’
ही काव्यनिर्मिती; ‘कृष्णाची करंगळी’, ‘तुपाचा नंदादीप’ हे कथासंग्रह; ‘आकाशाची फळे’,
‘उभे धागे आडवे धागे’ या कादंबऱ्या प्रसिद्ध. भारत सरकारने
‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. आपल्या अलौकिक प्रतिभेमुळे
‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग. दि. मा. यांचे प्रखर
राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर
भारतपुत्रांच्या कृतज्ञतेविषयीचे हे गीत आहे. प्रस्तुत गीत ‘चैत्रबन’ या
काव्यसंग्रहातून घेतले आहे.
१. वंद्य ‘वन्दे मातरम्’ (गीत)
वेदमंत्रांहून
आम्हां वंद्य ‘वन्दे मातरम्’!
माउलीच्या
मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यांत
लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी
सिद्ध केला मंत्र ‘वन्दे मातरम्’!
याच
मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी
निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीनां
एक लाभो शस्त्र ‘वन्दे मातरम्’!
निर्मिला
हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी
ते
हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा
तयांच्या आरतीचे गीत ‘वन्दे मातरम्’!