Iyatta 9vi Vishay Marathi Hasychitrantil mul swadhyay | इयत्ता 9vi मराठी हास्यचित्रांतली मुलं स्वाध्याय
Iyatta 9vi Vishay Marathi Hasya chitrantil mul swadhyay | 9th standard Marathi digest pdf Hasya chitrantil mul | 9th class marathi question and answer sthulvachan | 9th class marathi question answer pdf download 2023
प्र. १. खालील फरक लिहा.
व्यंगचित्र |
हास्यचित्र |
हास्याबरोबर काही गमतीदार
विचार मांडलेला असतो. |
केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो. |
प्र. २. वैशिष्ट्येलिहा.
व्यंगचित्रे
१)
व्यंगचित्रे हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे.
२)
केवळ हसवणे हा हेतू नसतो.
३)
आपल्याला काहीतरी सांगू पाहते.
४)
गमतीदार विचार मांडलेला असतो.
हास्यचित्रांतली मुलं स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी हास्यचित्रांतली मुलं स्वाध्याय | इयत्ता 9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती
प्र. ३.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
या पाठामध्ये
हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांच्या पहिल्या व्यंगचित्रामध्ये एक लहान मुलगा स्टुलावर
चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलीन वाजवत आहे. या चित्रांतून असे स्पष्ट होते
की –
१) लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे खूप आकर्षण
असते. ते बाह्य आकाराला भुलतात.
२) आणि वय वाढल्यावर त्यांच्या वृत्तीत प्रगल्भता
येते. बाह्य आकाराचे आकर्षण संपते. छंद अधिक खोल व सुक्ष्म होतो. असे या व्यंगचित्राच्या
माध्यमातून सांगितले आहे.
३) म्हणजेच, व्यगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हे सिद्ध होते.
प्र. ४. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेलेनिरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मला जेष्ठ
व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांनी रेखाटलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूप भावते.
शि.द.फडणिसांची रेषा भूमितीय असून ही खूप आकर्षक
व ठळक आहे. लहान रोपटे आणि लहान मुलगी यांमधील भावबंध त्यांनी अगदी अचूक रेखाटला आहे.
रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देतानाच्या तिह्च्या चेहऱ्यावरील निरागस भाव अप्रतिम
आहेत. भलीमोठी बाटली सावरत वाकून रोपट्याला
पाणी घालताना तिचे त्या रोपट्याविषयी प्रेम डोळ्यांतही दिसते आहे. रोपट्याला लहान बाळ
समजणे व आपली आई जसे आपले पोषण करते , तसे
त्या रोपट्याचे पोषण करणे. हा संदेश या व्यंगचित्रातून देण्यात आला आहे.
हास्यचित्रांतली मुलं मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय हास्यचित्रांतली मुलं | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
प्र. ५.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तर:
व्यंगचित्रांचे
रेखाटन करणे हे एक अद्वितीय कला आहे. व्यंगचित्रकाराला जीवनातील विसंगती अचूक टिपता
येणे गरजेचे आहे. तसेच त्या विषयाविषयी अपर करुणा असायला हवी. गुण-दोष दाखवताना माणसांची
खिल्ली न उडवता, समंजसपण असायला हवा. रेषा समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांतून
यशस्वीपणे मांडता आले पाहिजे.
प्र. ६. ‘लहान
मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत
स्पष्ट करा.
उत्तर:
लहान मुले
ही निरागस असतात. त्यांच्या आवडी-निवडी व सवयी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला
आवश्यक असते. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक
टिपता येणे गरजेचे आहे. लहान मुलांचे मानसशास्त्र समजणे ही चीत्राकारासाठी पहिली अट
आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते असे मला देखील वाटते.
Iyatta 9vi Vishay Marathi Hasya chitrantil mul swadhyay | 9th standard Marathi digest pdf Hasya chitrantil mul | 9th class marathi question and answer sthulvachan | 9th class marathi question answer pdf download 2023
विचार करा.
सांगा.
v शेजारील
चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
उत्तर: या चित्रातून
पाणी टंचाई ची समस्या प्रतिबिंबित होते.
v ही
समस्या का निर्माण झाली असावी?
उत्तर: ही समस्या
निर्माण होण्याची कारणे:
१)
पाण्याचा अतिवापर करणे.
२)
पाणी वाया घालवणे.
३)
पाणी जमिनीमध्ये जीरण्यासाठी प्रयत्न न
करणे.
४)
पावसाच्या पाण्याचा साठा न करणे.
v पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर... कल्पना करा व लिहा.
उत्तर:
पाण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागला तर सर्वांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडून जाईल. पाणी मिळवण्यासाठी रांगेत उभे रहायला लागल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल. इतर कामे करण्यासाठी वेळ अपुरा पडेल. पाण्यावर पैसा खर्च झाल्याने इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा अपुरा पडेल. माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल.
9th standard marathi sthulvachan lesson pdf | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Hasya chitrantil mul class marathi question and answer sthaulvachan
v ही
समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
उत्तर:
पाणी
टंचाईची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय करता येतील.
१)
पाण्याचा वापर जपून करावा.
२)
पाण्याचा अपव्यय करू नये.
३)
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते
जमिनीमध्ये जिरवावे.
४)
जलप्रदूषण करू नका.
५)
पाण्याचे महत्व सर्वांना पटवून द्या.
v या
समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.
उत्तर:
१)
पाणी अडवा पाणी जिरवा.
२) पाणी साठवा
, पाणी वाचवा.
३) पाण्याची
बचत म्हणजे जीवनाची बचत
४) पाणी
म्हणजे जीवन आहे, त्याचा वापर जपून करा.
भाषाभ्यास
(४)
चेतनगुणोक्ती अलंकार :
खालील ओळी
वाचा व समजून घ्या.
उदा., ‘‘ नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार ।’’ (कृ. ब. निकुम्ब)
(१) वरील
ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या?
उत्तर:
1.
दुःख
2.
सुख
(२) अचेतन
गोष्टी कोणत्या क्रिया करतात?
उत्तर:
- दुःख उशागती बसलेले
- सुख दार ठोठावते.
Iyatta 9vi Vishay Marathi Hasya chitrantil mul swadhyay
- 9th standard Marathi digest pdf Hasya chitrantil mul
- 9th class marathi question and answer sthulvachan
- 9th class marathi question answer pdf download 2023
(३) अचेतन
गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?
उत्तर: होय
चेतनगुणोक्ती
अलंकाराची वैशिष्ट्ये-
(१) अचेतन
वस्तूंना सचेतन मानले जाते.
(२) त्या वस्तूसजीव प्राण्याप्रमाणे किंवा
माणसाप्रमाणे वागतात.
अचेतन वस्तूवर
जेव्हा सचेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो, तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ अलंकार होतो.
खालील वाक्य
वाचून दिलेल्या चौकटींत उत्तरे लिहा.
मंगल मंगल गीत
म्हणे,
अस्फुट रजनी मूकपणे.
(१) प्रस्तुत
उदाहरणातील अचेतन गोष्ट-
उत्तर: रजनी
(२) अचेतन
गोष्टीने केलेली कृती-
उत्तर: मंगल गाणे
म्हणते
(३) अचेतन गोष्टीने
केलेली कृती कशी आहे
उत्तर:मानवीय
--------------**************------------