Iyatta 9vi Vishay Marathi Abhiyantyanche daivat doctor vishshweshwarayya swadhyay | इयत्ता 9vi मराठी अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय
Iyatta 9vi Vishay Marathi Abhiyantyanche daivat doctor vishshweshwarayya swadhyay \ 9th standard Marathi digest pdf Abhiyantyanche daivat swadhyay | 9th class marathi question and answer Dupar | 9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta 9vi marathi Abhiyantyanche daivat swadhyay
प्र. १. समर्पक उदाहरण लिहा.
(अ) विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम -
उत्तर:
विश्वेश्वरय्या
यांनी स्वतःचे शिक्षण घेण्यासाठी शिकवण्या करून पैसे उभे केले.
(आ) माणुसकीचे दर्शन -
उत्तर: गरजेपुरते
पैसे ठेवून उरलेले सर्व पैसे गरिबांच्या शिक्षणासाठी वापरले.
प्र. २. खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा.
(१) आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली.
उत्तर: चूक
ज्ञान
(२) सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे.
उत्तर:
सुखासीनता, विलास यांना महत्व न देण्याची वृत्ती.
(३) शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.
उत्तर:
कष्टाळूपणा, जिद्द.
(४) अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले.
उत्तर:
बुद्धिमान
(५) वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते.
उत्तर:
कार्यतत्परता
(६) सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली.
उत्तर:
सहानुभूती
Abhiyantyanche daivat doctor vishshweshwarayya swadhyay Iyatta 9vi marathi guide \ अभियंत्यांचेदैवत स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय \ इयत्ता 9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती
प्र. ३. माहिती लिहा.
(१) विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके
उत्तर:
1. कृष्णसागर धरण
2. विश्वेश्वरय्या कालवा.
3. मुसा नदीचा बंदोबस्त
4. शिवसमुद्रम धबधब्याजवळील वीजकेंद्र.
विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे
१) म्हैसूरचे दिवाण
२) नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार
३) भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष
४) मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष
इयत्ता 9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती | अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
प्र. ४. खालील शब्दांच्या अर्थांतील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा.
(अ)
आव्हान-आवाहन
उत्तर:
आव्हान :
प्रतिस्पर्ध्याला लढायला बोलावणे.
भैरू पैलवानाने
कुस्तीसाठी शाम पैलवानाला आव्हान दिले.
आवाहन : एखादे
चांगले काम करण्यासाठी बोलावणे.
कोरोना काळात सर्वांनीघरात
राहण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले.
(आ)
कृतज्ञ-कृतघ्न
उत्तर:
कृतज्ञ: उपकाराची
जाणीव असणारा.
आपल्याला
संकटाच्या काळात मदत करणाऱ्यांच्या बाबतीत नेहमी कृतज्ञ असायला हवे.
कृतघ्न :
केलेले उपकार विसरणारा
आपल्याला
संकटाच्या वेळी उपयोगी पडणाऱ्या माणसांशी आपण कृतघ्न होऊ नये.
(इ)
आभार-अभिनंदन
उत्तर:
आभार: धन्यावद
कार्यक्रमाची
सांगता करत असताना उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करतात.
अभिनंदन:
कौतुक करणे.
धावण्याच्या
स्पर्धेत माझा पहिला नंबर आल्यावर शाळेतील सर्वांनी माझे कौतुक केले.
(ई)
विनंती-तक्रार
उत्तर:
विनंती :
विनवणी करणे.
बंद पडलेली बससेवा पुन्हा सुरु व्हावी यासाठी गावाच्या वतीने आम्ही पत्राद्वारे राज्य परिवहन मंडळाला विनंती केले.
तक्रार :
गाऱ्हाणे मांडणे
सतत गावातील बस
उशिरा येत असल्याची तक्रार आम्ही राज्य परिवहन मंडळाकडे केली.
प्र. ५. खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.
He is an
engineer of integrity, character and broad outlook.
उत्तर:
विश्वेश्वररय्या हे निष्ठावान चारित्र्यसंपन्न व विशाल दृष्टीकोन असलेले अभियंता
आहेत.
इयत्ता नववी मराठी स्वाध्याय अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या \ इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती \ 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Abhiyantyanche daivat doctor vishshweshwarayya class marathi question and answer sthaulvachan
प्र. ६. स्वमत.
(अ) ‘विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.
उत्तर:
विज्ञानयुगातील
विश्वकर्मा व आपल्या विषयातील चूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या
जीवनाचा व कार्याचा परिचय लेखकांनी प्रस्तुत पाठातून करून दिला आहे.
विश्वेश्वरय्यांची
सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम,
प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती.
आपल्या
आयुष्यामध्ये भरकटलेले जीवन न जगता आपण ठरवलेल्या ध्येयाला अनुसरून कृती करणे
म्हणजेच सुनियंत्रित आचरण. त्यासाठी वक्तशिरपणा, काटेकोर नियोजन आणि कठोर परिश्रम
यांची आवश्यकता असते. आपल्याला कायम सुखाची ओढ असते. त्या सुखाचा विचार न करता आपण
कष्ट करत रहिले पाहिजे. आपण आपले मन कायम प्रसन्न ठेवायला हवे. प्रत्येक
गोष्टीमध्ये संयम बाळगायला हवा. मन भरकटू देऊ नये. जीवनात नेहमी आशावादी दृष्टीकोन
ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला यश मिळणार, आपले चांगले घडणार. हा आशावाद कायम
बाळगायला हवा. हे मला विश्वेश्वरय्या यांच्या पंचसुत्रीतून शिकायला मिळाले.
(आ)
‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या
डोळ्यांत आनंदाचे पाणी आले’, या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर:
सक्कर
या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करता यावा म्हणून नगरपालिकेने सिंधू नदीच्या
काठावर असलेल्या एका डोंगरावर जलाशय बांधला. सिंधू नदीचे पाणी पंपाच्या सहाय्याने
त्या जलाशयात साठवले जाऊ लागले. त्या ठिकाणापासून पाईप लाईन च्या माध्यमातून सक्करवासियांना
पुरवले जाऊ लागले. पण घरात पोहोचलेले पाणी वाळूमिश्रित, गढूळ व घाणेरडे होते.
जलाशयात जमा होणाऱ्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र
त्या प्रक्रियेसाठी येणारा खर्च अवाढव्य होता आणि तो नगरपालिकेला परवडणारा नव्हता.
म्हणजे नागरिकांच्या नशिबी हेच घाणेरडे पाणी होते. तेवढ्यात विश्वेश्वरया यांनी हे
आव्हान स्वीकारले. त्यांनी नदीतच विहीर खोदली. नदीचे पात्र व विहिरीचा ताल यांना
जोडणारा बोगदा बांधला. मग विहिरीत नैसर्गिक रीतीने स्वच्छ झालेले पाणी जमा होऊ
लागले. विहिरीतले हे पाणी लोकांपर्यत
पोहचू लागले. हे अमृतासारखे स्वच्छ, शुद्ध पाणी पाहून सक्करकरांचे डोळे आनंदाने
पाणावले. अशक्य असलेली गोष्ट विश्वेश्वरय्या यांच्यामुळे शक्य झाली. हे कृतज्ञताही
त्या अश्रूंमध्ये होती.
(इ) विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
विश्वेश्वरय्या
हे जगविख्यात अभियंता होते. अनेक गुणांमुळे ते जागतिक कीर्ती मिळवू शकले.
त्यांच्या अनेक गुणांपैकी एक गुण मला खूप आवडतो तो म्हणजे समोर उभ्या ठाकलेल्या
कोणत्याही समस्येला ते सर्व ताकदीनिशी सामोरे जायला सदोदित तत्पर असायचे. त्यांचा
हा गुण मला खूप आवडतो. त्यांच्या या गुणामुळे त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या व
क्लिष्ट समस्या चालत आल्या. प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याच्या त्यांचा मार्ग
भिन्न होता. त्यांनी प्रत्येक ठिकाणी केलेले कार्य हे नाविन्यपूर्ण होते. त्यातून
त्यांची अभियांत्रिकी प्रतिभा दिसून येते. सगळी बुद्धी पणाला लावून ते काम करीत
असत. त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्याकडून अशक्य कामे सुद्धा पार पडली.
प्रत्येकाने हा गुण अंगी बाळगला तर प्रयेकजण आपापल्या जीवनात यशस्वी होतील.
जीवनातला श्रेष्ठ आनंद त्यांना लाभेल.
(ई) ‘झिजलात
तरी चालेल पण गंजू नका’, या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश
सविस्तर लिहा
उत्तर:
पंडित जवाहरलाल
नेहरू यांनी निष्ठावान अभियंता हे उद्गार विश्वेश्वरय्या यांना उद्देशून काढले, ते
अक्षरशः सत्य आहेत. ते बुद्धिमान होते. त्यांची बुद्धीवर विलक्षण निष्ठा होती.
म्हणून ते म्हणतात झीजलात तरी चालेल पण गंजू नका.
या विधानाचा
अर्थ असा होतो की, स्वतःच्या कार्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी प्रत्येकाने
ठेवली पाहिजे. आर्म कार्याची, कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांना अजिबात मान्य नव्हती.
आपण जे आपले कार्यक्षेत्र निवडले आहे त्यामध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे. मग
उत्तुंग यश नक्की मिळणार. सतत काम करीत राहण्याने बुद्धी गंजत नाही. असे विश्वेश्वरय्यांना
सूचित करायचे आहे.
----------------------
समाप्त
----------------------