5. एक होती समई स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Ek hoti samai swadhyay question answer 9th marathi | Ek hoti samai swadhyay question answer 9th marathi

Ek hoti samai swadhyay Iyatta 9vi marathi guide एक होती समई स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी एक होती समई स्वाध्यायIyatta 9vi marathi Ek hoti
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi Ek hoti samai swadhyay | इयत्ता 9vi मराठी एक होती समई स्वाध्याय

 एक होती समई स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी एक होती समई स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती | एक होती समई मराठी स्वाध्याय ९वी


 

प्र. १. चौकटी पूर्ण करा.


(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख -

उत्तर: अनुताई वाघ

 

(आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था -

उत्तर: ग्राम  बाल शिक्षा केंद्र

 

(इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे -

उत्तर: प्राथमिक शिक्षण

 

(ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे -

उत्तर: आदिवासी बालके


 

Iyatta 9vi Vishay Marathi Ek hoti samai swadhyay  9th standard Marathi digest pdf  9th class marathi question and answer lesson 5  9th class marathi question answer pdf download 2023  Iyatta  9vi marathi Ek hoti samai swadhyay  Ek hoti samai swadhyay Iyatta 9vi marathi guide  एक होती समई स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता 9vi मराठी एक होती समई स्वाध्याय  इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf  इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती  एक होती समई मराठी स्वाध्याय ९वी  इयत्ता नववी मराठी स्वाध्याय एक होती समई  इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती



प्र. २. खालील घटनांचे परिणाम लिहा.

 

घटना

परिणाम

(अ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले.

डोंगराएवढे दुःख त्यांनी फेकून दिले आणि त्या जीद्दीने उभ्या राहिल्या.

(आ) ताराबाईंचे निधन.

कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले.

(इ) अनुताईंचे निधन.

अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या.

 

  •  Iyatta 9vi Vishay Marathi Ek hoti samai swadhyay | 9th standard Marathi digest pdf
  • 9th class marathi question and answer lesson 5 | 9th class marathi question answer pdf download 2023
  • Iyatta  9vi marathi Ek hoti samai swadhyay | Ek hoti samai swadhyay Iyatta 9vi marathi guide

प्र. ३. कार्यक्षेत्र लिहा.


शिक्षणक्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे

१)  महिला विकास
२)   बाल कल्याण
३)   अंधश्रद्धा निर्मूलन
४) आरोग्य

 

प्र. ४. का ते लिहा.


(अ) शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.

उत्तर: 

            शिक्षण हे एकांगी असता कामा नये ते सर्वांगीण असले पाहिजे. तसेच शिक्षण हे केवळ चाकोरीबद्ध पद्धतीने न शिकवता अनेक प्रोग केले पाहिजेत. असा दृष्टीकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले. त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते. म्हणून शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.



(आ) अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.

उत्तर: 

            अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला कारण, त्या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी जमातीतील रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा यांची पालेमुळे खूप खोलवर रुजली होती. अज्ञानामुळे तेथील लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करत नव्हते. तेथील समाज हा अंधश्रद्धेने ग्रासलेला होता. असे परिवर्तन त्यांच्या अंगवळणी पडणे सहज शक्य झाले नाही. या सुधारणांमुळे आपले नुकसान होईल अशा भीतीपोटी आदिवासींनी शिक्षणाला विरोध केला.


 

प्र. ५. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा.

भातुकलीचा खेळ, ज्ञानयज्ञ, ज्ञानगंगा, पाऊलखुणा

 

  • भातुकलीचा खेळ : 

            भातुकली हा खेळ लहान मुलांचा विशेषतः मुलींचा खेळ. या खेळामध्ये खोटा खोटा संसार मांडला जातो. संसारोपयोगी छोटी छोटी भांडी आणली जातात. प्रत्यक्ष संसारात जशी मोठी माणसे व्यवहार करतात , तसे त्यांचे अनुकरण करीत हा खेळ खेळला जातो. या खेळामध्ये बाहुला-बाहुलीचे लग्न देखील लावले जाते. खोटे-खोटे जेवण देखील बनवले जाते. थोडक्यात, भातुकलीचा खेळ म्हणजे एक खोटा आभासमय संसार.

 

  • ज्ञानयज्ञ : 

            विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यामध्ये आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहचवतो अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरु केले. त्या कार्यांत त्यांनी आपले सर्वस्व ओतले. यज्ञात आहुती देतात, तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली. म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय.

 

  • ज्ञानगंगा : 

            गंगा ही नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी पिण्याने पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे. गंगा नदी  घरोघर पोहचवणे म्हणजे सर्वांचे दुख, दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झला आहे. अनुताईंनी आदिवसी बालकांपर्यंत शिक्षण पोहचवले. एका प्रकारे अनुताईंनी त्या बालकांचे जीवन पवित्र केले, म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटले आहे.

 

  • पाऊलखुणा :

            चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा असा पाऊलखुणा या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो. त्या खुणांवरून कोण चालत गेले हे सांगता येते. अनुताईंनी शिक्षणप्रसाराच्या ज्या मार्गाचा अवलंब केला तो मार्ग आणि त्यांनी काय, काय केले ते त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजे, त्यांच्या पाऊलखुणा आहेत. या  पाऊलखुणा जपल्या पाहिजेत.

 

 

प्र. ६. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा.


(अ) व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या-

उत्तर: व्रतस्त


(आ) नेमाने स्वत:ला बांधणारा-

उत्तर: नेमस्त

 

(इ) गावातील रहिवासी-

उत्तर: ग्रामस्थ


(ई) तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा-

उत्तर: ततस्थ


 इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती | एक होती समई मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय एक होती समई | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती |  इयत्ता नववी मराठी स्वाध्याय एक होती समई


प्र. ७. खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

उदा., (१) सापेक्ष X निरपेक्ष (२) अनावृष्टी X अतिवृष्टी

उत्तर:

 

(१) अनाथ X  सनाथ

(२) दुश्चिन्ह X  सुचिन्ह

(३) सुपीक X नापीक

(४) पुरोगामी X प्रतिगामी

(५) स्वदेशी X परदेशी

(६) विजातीय X सजातीय



प्र. ८. स्वमत.


(१) अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: 

            आपल्या पाच किंवा सात वातींनी समई आपल्या भोवतालचा परिसर उजळून टाकते. अंधारला दूर करण्याचे सामर्थ्य समईमध्ये आहे.  अनुताई वाघ यांचे व्यक्तिमत्व हे समई सारखे होते. त्या कडक शिश्तीच्या नव्हत्या, मुलांना ओरडून, त्यांच्यावर रागवून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अपार माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची उब मिळेत असे. अनुताईंच्या सहवास त्या मुलांना जणू समई चा प्रकाशच वाटे. म्हणून अनुताईंना दिलेली समईची उपमा अगदी योग्य आहे.

 


(२) ‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा

उत्तर: 

        समईच्या प्रकाशात असलेला परिसर उदात्त भावनेने भारलेला असतो. आपल्या पाच किंवा सात वातींनी समई आपल्या भोवतालचा परिसर उजळून टाकते. तिच्या शांत, शीतल व मंद प्रकाशामुळे मन प्रसन्न होते. एखादी वात जरी विझली तरीहि इतर वाती आपापले कार्य करीतच असतात. अंधारला दूर करण्याचे सामर्थ्य समईमध्ये आहे.  खूप वेळापर्यंत ती जळत राहते म्हणून समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतिक आहे असे म्हणता येईल.

 

 9vi mrathi swadhyay 5 | 9th standard marathi 5 lesson pdf | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Ek hoti samai class marathi question and answer lesson 5

..भाषाभ्यास..


उपमेय व उपमान यांच्यातील साधर्म्यावर आधारित काही अलंकारांचा आपण अभ्यास केला. आता इतर काही

अलंकार पाहूया.

(३) दृष्टान्त अलंकार :

खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., चंदनाचे हात । पायही चंदन

तुका म्हणे तैसा । सज्जनापासून

पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

 

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

सज्जन आणि चंदन

 

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण- सुगंधित

(आ) संतांचा विशेष गुण- त्यांच्यात अवगुण नसतो.

 

चंदन सर्वांगाने सुगंधित-त्रिकालाबाधित सत्य

सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असते हे पटवून देण्यासाठी वरील उदाहरण दिले आहे.

 

दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये-

(१) एखादी गोष्ट पटवून देणे.

(२) ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे.

एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते, तेव्हा ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.

 

·       खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा.


लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

 

(१) संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात.

उत्तर: लहानपण दे

 

(२) रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो.

उत्तर: अंकुशाचा मार

 

(३) मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते.

उत्तर: साखरेचा रवा

 

(४) संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात.

उत्तर: नम्रपणा असावा


(५) मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात.

उत्तर: थोर ऐरावताला अंकुशाचा मार

 

✏✏✏✏✏✏✏✏✏


Post a Comment