4. नात्यांची घट्ट वीण स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Natyanchi Ghatta Vin swadhyay question answer 9th marathi

Iyatta 9vi Vishay Marathi Natyanchi Ghatta Vin swadhyay | इयत्ता 9vi मराठी नात्यांची घट्ट वीण स्वाध्याय

 Iyatta 9vi Vishay Marathi Natyanchi Ghatta Vin swadhyay   | 9th standard Marathi digest pdf | 9th class marathi question and answer lesson 4 | 9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta  9vi marathi Natyanchi Ghatta Vin swadhyay | Natyanchi Ghatta Vin swadhyay Iyatta 9vi marathi guide


प्र. १. आकृती पूर्ण करा.


अ)नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे नाजूक

1)                भक्कम

2)                 मुलायम

3)                धारधार

 


आ) नात्याच्या विणेची पाठातील वैशिष्ट्ये

 

1)               नकळत विणली जाते

2)               प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाते.

3)               जवळीक साधत जाते.

4)                नात्यातील वीण, स्वकीय, परकीय असा भेदाभेद करणारी आहे.

 

9vi mrathi swadhyay 4  9th standard marathi 4 lesson pdf  9th class marathi question and answer pdf download  9th std marathi digest pdf navneet  9th class marathi question and answer lesson 4



  प्र. २. ‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.

उत्तर:

        आपुलकी , जिव्हाळा, भावनिक बंध प्रेम, आदर , काळजी अशा विविध भावना नात या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होतात. नात्यांमध्ये कधी प्रेम तर कधी वैर असते, कधी कौतुक असते, कधीही घृणा असते तर कधी व्याकुळता असते कधी लटका राग असतो.

 

प्र. ३. खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.

 

(अ) ‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला  घडवताना करते.

उत्तर : 

            प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.

 

(आ) जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.

उत्तर: 

            मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून ‘बाप’ नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो.



  • नात्यांची घट्ट वीण स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी नात्यांची घट्ट वीण स्वाध्याय
  • इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती
  • नात्यांची घट्ट वीण मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय नात्यांची घट्ट वीण
  • इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती


प्र. ४. वर्गीकरण करा.


आई , गुरू, भाऊ ,वडील ,मित्र, बहीण, शेजारी, आजी, हितचिंतक, मैत्रीण.


जन्माने प्राप्त नाती

सान्निध्याने प्राप्त नाती

१.आई

१.गुरु

२.भाऊ

२.मित्र

३.वडील

३.मैत्रीण

४.बहीण

४.शेजारी

५.आजी

५.हितचिंतक

 

9th standard marathi 4 lesson pdf | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | 9th class marathi question and answer lesson 4

प्र. ५. खाली दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. 


उत्तर:


तारुण्यातील नात्याचा प्रवास

वार्धक्यातील नात्याचा प्रवास

तारुण्य म्हणजे जीवनातील जोशपूर्ण काल होय.

वार्धक्य म्हणजे अनुभव संपन्न जीवन होय.

तारुण्यात मानवी मन अहंभाव व बाह्य प्रतिष्ठा जोपासते.

वार्धक्यामध्ये विविध भावना विकारांचे बाह्य आवरण गळून पडते.

तारुण्यातील नात्यांमध्ये व्याव्हारीकातेचा भाव दिसून येतो.

उतारवयात अहंभाव नष्ट होतो आणि मन निखळ , निकोप होऊन जाते.


प्र. ६. स्वमत.


(अ) माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर: 

            जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला स्वतःचे पालनपोषण करता येणे, संरक्षण करता येणे शक्य नसते. तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते. त्याच्या बालपणीच्या काळात आई-बाबा व आजी-आजोबा त्याला मदत करतात. त्याच्यावर चांगले संस्कार करतात. म्हणजेच बालवयात ही नाती खूप महत्वाची आहेत. तरुण वयामध्ये अनेक कामे करावी लागतात. या काळामध्ये मित्र, शेजारी यांसारखी नाती उपयुक्त ठरतात. मार्गदर्शन करण्यासाठी गुरूची आवश्यकता असते. वार्धक्यात मानून कमकुवत बनत जातो. तेव्हा त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात.

            अशा प्रकारे माणसाच्या जडणघडणीत नात्याचं महत्त्व खूप आहे.




(अ)  तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते  सविस्तर लिहा.  

उत्तर: 

            अक्षरा ही माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. आम्ही पहिली च्या वर्गापासून एकत्रच शिकत आहोत. आम्ही एकाच बाकर बसतो. जेवणाच्या सुट्टीत एकत्र डबा खातो. रोज शाळेत भेटतोच पण कधी शाळेबाहेर भेट झाली तर गप्पांमध्ये रंगून जातो. अभ्यास करताना मला कोणता मुद्दा समजला नसेल तर तो मुद्दा अक्षरा मला समजावून सांगते. तिला गणित विषय थोडा कठीण वाटतो म्हणून ती माझ्याकडून गणिते समजावून घेते. चांगल्या कामाबाबत आम्ही एकमेकांचे कौतुक करतो. आणि जर आमच्यापैकी कोणी चुकत असेल तर त्याची चूक त्याला समजावून सांगतो. आम्ही कामे एकजुटीने करतो.



✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏ 


  • 9vi mrathi swadhyay 4
  • 9th standard marathi 4 lesson pdf
  • 9th class marathi question and answer pdf download
  • 9th std marathi digest pdf navneet
  • 9th class marathi question and answer lesson 4

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.