Iyatta 9vi Vishay Marathi Kirti kthiyacha drushtant swadhyay | इयत्ता 9vi मराठी कीर्ती कठीयाचा दृष्टांत स्वाध्याय
Iyatta 9vi Vishay Marathi Kirti kthiyacha drushtant swadhyay | 9th standard Marathi digest pdf | 9th class marathi question and answer lesson 3 | 9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta 9vi marathi Kirti kthiyacha drushtant swadhyay | Kirti kthiyacha drushtant swadhyay Iyatta 9vi marathi guide
प्र.१. कोणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
(१) वानरेया –
नागदेवाचार्य
(२) सर्वज्ञ –
चक्रधर स्वामी
(३) गोसावी – चक्रधर
स्वामी
प्र. २. आकृती पूर्ण करा.
लोकांनी स्तुती केल्यावर फुशारून जाण्याची सवय |
ß |
कठीयाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट |
à |
निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती |
प्र. ३. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
प्रस्तुत
दृष्टान्तातून आपल्याला असा उपदेश मिळतो की, कोणताही जीव हा विकारापासून वेगळा राहत
नाही, तो कोणत्या न कोणत्या विकाराच्या जाळ्यात अडकलेला असतो. परंतु आपण आपले मन विकारांपासून
दूर ठेवले पाहिजे. तसेच आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांचा गर्व बाळगणे हा देखील एक
प्रकारे विकारच आहे. म्हणून मानवाने सर्व विकारांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.
प्र. ४. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
उत्तर:
कठीया : पुजारी
सी : थंडी
काइसीया :
कसली
कव्हणी : कोणी
प्र. ५.
‘आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो’, हा विचार प्रस्तुत पाठाच्या
आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
या पाठातील
दृष्टांताद्वारे सांगितले आहे की एक पुजारी असतात ते मंदिराची देखबहाल करत असतात.
तेथील साफसफाई करतात. हे सर्व पाहून त्या गावातील गावकरी त्या पुजाऱ्याची स्तुती करतात.
लोकांनी त्यांची स्तुती करावी म्हणून ते प्रत्येक दिवशी अधिक चांगले काम करू लागतात. त्यांना स्वतःमध्ये असलेल्या
चांगल्या गुणांचा गर्व होतो. त्याचेच फळ म्हणून
त्यांना कामाची कीर्ती हा एकच परिणाम त्यांना मिळतो. अन्य कोणतेही फल त्यांना लाभत
नाही अश प्रकारे पुजाऱ्यामधील हाच गुण त्यांचा अवगुण झला.
प्र. ६. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
उत्तर:
माझी वर्गात रीना नावाची मुलगी होती. ती नृत्यकलेत पारंगत होती. दरवर्षी नृत्याच्या स्पर्धा शाळेमध्ये आयोजित केल्या जात असत. सहावी , सातवी मध्ये असताना दोन वर्षे सलग तिचा नृत्य स्पर्धेमध्ये एक नंबर आला. सलग दुसऱ्यावर्षीही एक नंबर आल्याने सर्व शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. सर्वांनी खूप कौतुक केल्याने तिला तिच्या नृत्यकलेवर गर्व होऊ लागला. दिवसेंदिवस ती तिचा नृत्याचा सराव कमी करू लागली, पण त्याचा परिणाम असा झाला की आठवी मध्ये गेल्यावर जेव्हा दरवर्षी प्रमाणे नृत्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या तेव्हा तिचा चौथा नंबर आला.
अशा प्रकारे तिच्यातला हा गुण तिचा अवगुण ठरला.
..भाषाभ्यास..
(२) व्यतिरेक
अलंकार :
खालील उदाहरण
वाचा व समजून घ्या.
उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’
वरील
उदाहरणातील
उपमेय- देवाचे
नाव
उपमान- अमृत
व्यतिरेक
अलंकाराचे वैशिष्ट्य- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते.
- वरील उदाहरणात
परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे मानले आहे.
- जेव्हा
कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले जाते तेव्हा तिथे‘व्यतिरेक’ अलंकार होतो.
खालील उदाहरण
अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.
तू माउलीहून
मयाळ । चंद्राहूनि शीतल ।
पाणियाहूनि
पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।
उपमेय |
उपमान |
समान गुण |
तू (परमेश्वर / गुरू) |
माउली |
मायाळूपणा |
चंद्र |
शीतलता |
|
पाणी |
पातळपणा |